SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 503
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४९२) महापुराण (४२-९४ सुखासुखं बलाहारौ देहावासौ च देहिनाम् । विवर्तन्ते तथाज्ञानं दृक्शक्ती च रजोजुषाम् ॥ ९४ एवंप्रायास्तु ये भावाः संसारिषु विनश्वराः । मुक्तात्मनां न सन्त्येते भावास्तेषां ह्यनश्वराः ॥ ९५ मुक्तात्मनां भवेद्धावः स्वप्रधानत्वमनिमम् । प्रतिलब्धात्मलाभत्वात्परद्रव्यानपेक्षणम् ॥ ९६ वेदनाभिभवाभावादचलत्वं गभीरता । स्यादक्षयत्वमक्षय्यं क्षायिकातिशयोदयः ॥ ९७ अव्याबाधत्वमस्यष्टं जीवाजीवरबाध्यता। भवेदनन्तज्ञानत्वं विश्वार्थाक्रमबोधनम् ॥ ९८ अनन्तदर्शनत्वं च विश्वतत्त्वाक्रमेक्षणम् । योऽन्यैरप्रतिघातोऽस्य सा मतानन्तवीर्यता ॥ ९९ भोग्येष्वर्थेष्वनौत्सुक्यमनन्तसुखता मता। नीरजस्त्वं भवेदस्य व्यपायः पुण्यपापयोः ॥ १०० ज्ञानावरणादिक कर्माना रज म्हणतात. यानी मलिन झालेल्या संसारीजीवाचे सुखदुःख, बल व आहार, शरीर व घर व ज्ञान आणि दर्शन या सर्व गुणात परिवर्तन होत असते ।। ९४ ॥ अशा रीतीचे संसारीजीवात जे भाव उत्पन्न होतात ते सर्व विनश्वर आहेत. पण मुक्तजीवामध्ये असे विकारी भाव नसतात पण जे मुक्तात्मे आहेत त्यांच्या ठिकाणचे ज्ञानादिगुण अत्यन्त निर्मल आणि ते नित्य असतात-विनाशरहित असतात ॥ ९५ ॥ ___ जे मुक्त जीव आहेत त्यांच्या ठिकाणी मुख्य भाव स्वप्रधानत्व हा आहे. अर्थात् सर्वश्रेष्ठ अशी स्वतन्त्रता आहे व त्याना आपल्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ति झाल्यामुळे इतर द्रव्याची अपेक्षा राहात नाही. ते स्वस्वरूपात रमत असतात ।। ९६ ॥ त्याना सुखदुःखादिक वेदनेपासून बाधा-त्रास होत नसल्यामुळे या मुक्तात्म्यात अचलत्व अर्थात् गंभीरपणा प्राप्त झालेला असतो व कर्माचा नाश झाल्यामुळे अतिशयांची प्राप्ति झालेली असते व ती अविनाशी अक्षय अशी असते ॥ ९७ ॥ . या मुक्तात्म्याना अव्याबाधत्व प्राप्त झालेले असते. म्हणजे जीव व अजीवापासून याना कोणतीही बाधा होत नाही व याना अनन्तज्ञान प्राप्त झाल्यामुळे जगातील सर्व पदार्थाचे युगपत् ज्ञान यांना होते ।। ९८ ।। पूर्ण वस्तूचे अर्थात् सर्व जीवाजीवादिकतत्त्वांचे एकदम अवलोकन करणे त्यांचे सामान्यधर्माचे युगपत् अवलोकन होणे याला अनन्तदर्शन म्हणतात. हा गुण मुक्तजीवात असतो व या मुक्तजीवात अनन्तवीर्यता हा गुण असतो अर्थात् दुसऱ्याकडून त्यांच्यावर प्रतिघात-अघात होत नाही ही त्यांची अनंतवीर्यता आहे ।। ९९ ॥ भोग्यपदार्थात उत्कंठा नसणे हे मुक्तात्म्याचे अनन्त सुख होय आणि पुण्य व पाप यांचा पूर्ण अभाव होणे त्याला नीरजकता म्हणतात. तो गुण सिद्धांच्या ठिकाणी असतो ॥१०॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy