SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 504
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४२-१०७) महापुराण निर्मलत्वं तु तस्येष्टं बहिरन्तर्मलच्युतिः । स्वभावविमलोऽनादिसिद्धो नास्तीह कश्चन ॥ १०१ योऽस्य जीवधनाकारपरिणामो मलक्षयात् । तदच्छेद्यत्वमाम्नातमभेद्यत्वं च तत्कृतम् ॥ १०२ अक्षरत्वं च मुक्तस्य क्षरणाभावतो मतम् । अप्रमेयत्वमात्मोत्थैर्गुणरुधरमेयता ॥ १०३ बहिरन्तर्मलापायावगर्भमलवासिता । कर्मनोकर्मविश्लेषात्स्यादगौरवलाघवम् ॥ १०४ तादवस्थ्यं गुणेरुद्धरक्षोभ्यत्वमतो भवेत् । अविलीनत्वमात्मीयैर्गुणैरप्यवपृक्तता १०५ प्राग्देहाकारमूतित्वं यदस्याहेयमक्षरम् । साभीष्टा परमा काष्ठा योगरूपत्वमात्मनः ॥ १०६ लोकानवासस्त्रैलोक्यशिखरे शाश्वती स्थितिः । अशेषपुरुषार्थानां निष्ठा परमसिद्धता ॥ १०७ बाह्यमल व अन्तर्मल अर्थात् ज्ञानावरणादि पुद्गलकर्मे व रागद्वेषमोहादिक अन्तर्मल या दोनप्रकारच्या मलापासून रहित मुक्तजीव असतात म्हणून त्यांच्या ठिकाणी निर्मलत्व हा गुण आहे. परन्तु स्वभावाने निर्मल आणि अनादिकालापासून सिद्ध कोणीही नाही ॥ १०१॥ सर्वकर्ममलांचा नाश झाल्यामुळे सिद्ध जीवांच्या प्रदेशांचे जे घनाकार परिणमन होते तेच अच्छेद्यत्व होय व या अच्छेद्यत्वामुळे अभेद्यत्व त्यांच्या ठिकाणी आहे ।। १०२ ॥ मुक्तजीवाचे प्रदेश क्षरण पावत नाहीत, म्हणून त्याच्या ठिकाणी अक्षरत्व आहे व त्याच्या आत्म्यापासून प्रकट झालेले जे अपरिमित उत्कृष्ट गुण त्यांची मोजणी करता येत नाही. म्हणून सिद्धांच्या ठिकाणी अप्रमेयता आहे ।। १०३ ॥ __ बाह्यमल व अन्तरंगमल यांचा नाश झाल्यामुळे त्यांना गर्भवास नाही हे सिद्ध होते व कर्मे आणि नोकर्मे ही दोन्ही त्यांच्या आत्म्यापासून कायमची वेगळी झाली आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी अगुरुलघुता आहे ॥ १०४ ॥ तो आत्मा आपल्या प्रशस्त गुणानी युक्त झाल्यामुळे तीच अवस्था त्याची नेहमी राहते म्हणून तो सिद्धात्मा आक्षोभच असतो व आपल्या गुणापासून तो केव्हाही वेगळा राहत नाही म्हणून अविलीनत्व गुण त्यामध्ये आहे ।। १०५ ॥ सिद्धावस्था प्राप्त होण्यापूर्वी जो शरीराचा आकार होता त्या आकारांत सिद्ध जीवाच्या प्रदेशांची मूर्ति राहते. तो आकार सिद्धात्म्याचा राहतो. तो कधी टाकता येत नाही व तो अक्षर असतो त्याचे कधी विघटन होत नाही. म्हणून तो आकार अक्षर आहे, क्षरण न पावणारा आहे व ही अवस्था याची परमकाष्ठा आहे परमहद्द व हे सिद्धात्म्याचे योगरूप आहे ।। १०६ ॥ त्रैलोक्याच्या शिखरावर सिद्धात्म्याचे नेहमी राहणे असते. हा त्यांचा लोकाग्रवास होय व येथे त्या सिद्धात्म्याच्या सर्व पुरुषार्थांची समाप्ति होते. ही त्यांची परमसिद्धता होय ।। १०७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy