SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 257
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३३-१५१) महापुराण (२४६ वन्दारूणां मुनीन्द्राणां स्तोत्रप्रतिरवैर्मुहुः । स्तोतुकामेव भक्त्या त्वां सैषा भात्यतिसंमदात् ॥ परार्ध्यरत्ननिर्माणामेनामत्यन्तभास्वराम । त्वामध्यासीनमानम्रा नाकभाजो भजन्त्यमी ॥ १५२ सशिखामणयोऽमीषां नम्राणां भान्ति मौलयः । सदीपा इव रत्नार्धाः स्थापितास्त्वत्पदान्तिके । मतानां सुरकोटीनां चकासत्यधिमस्तकम् । प्रसादांशा इवालग्ना युष्मत्पादनखांशवः ॥ १५४ नखदर्पणसङक्रान्तबिम्बान्यमरयोषिताम् । दधत्यमूनि वक्त्राणि तदुपाङघ्न्यम्बुजश्रियम् ॥ १५५ वक्त्रेष्वमरनारीणां सन्धत्ते कुसुमश्रियम् । युष्मत्पादतलच्छाया प्रसरन्ती जपारुणा ॥१५६ गणाध्यषितभूभागमध्यवर्ती त्रिमेखलः । पीठाद्रिरयमाभाति तवाविष्कृतमङ्गलः ॥ १५७ प्रथमोऽस्य परिक्षेपो धर्मचरलडकृतः । द्वितीयोऽपि तवामीभिदिश्वष्टासु महाध्वजैः ॥ १५८ श्रीमण्डपनिवेशस्ते योजनप्रमितोऽप्ययम् । त्रिजगज्जनताजस्रप्रावेशोपग्रहक्षमः ॥ १५९ हे प्रभो, आपणास वंदना करणाऱ्या मुनीश्वरांच्या स्तोत्रांच्या प्रतिध्वनींनी ही गन्धकुटी अतिशय आनन्दाने भक्तीने आपली स्तुति करीत असल्याप्रमाणे भवताना वाटते ।। १५१ ॥ अमूल्यरत्नानी निर्मिलेली व अत्यन्त चमकणारी प्रकाशयुक्त अशा या गन्धकुटीवर आपण विराजमान झालेले आहात व नम्र होऊन स्वर्गातील देव आपली उपासना करीत आहेत ।। १५२ ॥ चूडामणियुक्त अशी या देवांची ही मस्तके हे प्रभो आपल्या चरणाजवळ प्रदीपानी सहित असे रत्नार्ध स्थापन केल्याप्रमाणे शोभत आहेत ॥ १५३ ।। हे जिनदेवा, आपणास हे कोट्यवधि देव नमस्कार करीत असताना यांच्या मस्तकावर आपल्या पायांच्या नखांचे किरण प्रसादाच्या लेशाप्रमाणे शोभत आहेत ।। १५४ ॥ हे जिननाथ, आपल्या नखरूपीदर्पणात ज्यांचे प्रतिबिंब पडले आहे अशा देवांगनाची मुखे आपल्या चरणाजवळ कमलांची शोभा धारण करीत आहेत ॥ १५५ ।। हे जिनप्रभो, आपल्या चरणांच्या नखांची जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल कान्ति देवांगनांच्या मुखावर पुष्पांची शोभा धारण करीत आहेत ॥ १५६ ।। बारा सभांचा निवास जेथे आहे अशा भूमिप्रदेशाच्या मध्ये तीन मेखलानी शोभणारा व अनेक मंगलद्रव्ये जेथे प्रकट झाली आहेत असा हे प्रभो आपला पीठरूपी पर्वत शोभत आहे ॥ १५७ ॥ याचा पहिला विभाग धर्मचक्रानी शोभत आहे व दुसरा देखील आठ दिशात आठ महाध्वजानी शोभत आहे ॥ १५८ ॥ या श्रीमण्डपाची रचना जरी एक योजनप्रमाणाची आहे तरीही तीनही जगांच्या लोकांचा सतत प्रवेश झाला तरी त्याना समावून घेण्यास समाविष्ट करून घेण्यास समर्थ आहे ।। १५९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy