________________
३४-१९)
महापुराण
(२५५
सुरा जातरुषः केचित् कि किमित्युच्चरगिरः । अलातचक्रवर्द्रमुः करवालापितः करैः॥९ किमम्बरमविम्बमम्बरात्परिलम्बते । प्रतिसूर्यः किमुद्भूत इत्यन्ये मुमहुर्मुहुः॥१० कस्याप्यकालचक्रेण पतितव्यं विरोधिनः । करेणेव ग्रहेणाद्य यतश्चक्रेण वक्रितम् ॥ ११ अथवाद्यापि जेतव्यपक्षः कोऽप्यस्ति चक्रिणः । चक्रस्खलनतः कैश्चिदित्थं तज्ज्ञविकितम् ॥ १२ सेनानीप्रमुखास्तावत्प्रभवे तन्यवेदयन् । तद्वार्ताकर्णनाच्चक्री किमप्यासीत्सविस्मयः ॥ १३ । अचिन्तयच्च किं नाम चक्रमप्रतिशासने । मयि स्थिते स्खलत्यद्य क्वचिदप्यस्खलद्गति ॥ १४ सम्प्रधार्यमिदं तावदित्याहूय पुरोधसम् । धीरो घोरतरां वाचमित्युच्चराजगौ मनुः ॥ १५ वदतोऽस्य मुखाम्भोजाद् व्यक्ताकूता सरस्वती। निर्ययौसदलङ्कारा शम्फलीव जयश्रियः ॥ १६ चक्रमाक्रान्तदिक्वचक्रमरिचक्रभयङ्करम् । कस्मानास्मत्पुरद्वारि क्रमतेन्यकृतार्करुक् ॥ १७ विश्वदिग्विजये पूर्वदक्षिणापरवाद्धिषु । यदासीदस्खलद्वृत्तिरूप्याद्रेश्च गुहाद्वये ॥ १८ चक्रं तद्दधुना कस्मात्स्खलत्यस्मद्गृहाङ्गणे । प्रायोऽस्माभिविरुद्धेन भवितव्यं जिगीषुणा ॥ १९
कित्येक देव क्रुद्ध होऊन 'हे काय झाले हे काय झाले' असे शब्द मोठ्याने बोलू लागले व हातात तरवारी घेऊन कोलतीप्रमाणे गरगर फिरू लागले ॥ ९॥
हे आकाशमण्याचे बिंब अर्थात् सूर्याचे बिंब आकाशातून खाली लोंबत आहे की काय? किंवा हा दुसरा सूर्य जणु उत्पन्न झाला असा संशय कित्येक देवांच्या मनात उत्पन्न झाला ॥१०॥
किंवा कोणा तरी शत्रूचे भयंकर ग्रहाप्रमाणे असलेले अकस्मात् निघालेले चक्र येथे आले असावे. कारण हे चक्ररत्न येथेच अकस्मात् थांबले आहे. अथवा या चक्रवर्तीकडून जिंकण्यायोग्य एखादा शत्रु उरला असेल अन्यथा हे चक्र एकाएकी का थांबले आहे ? असा कांही तज्ज्ञ देवानी वितर्क केला ॥ ११-१२ ।।।
सेनापति वगैरे प्रमुख अधिकान्यांनी प्रभु भरताला ही हकीकत सांगितली व ती ऐकून चक्रवर्ती काही आश्चर्यचकित झाला ।। १३ ॥
___ ज्याला कोणीही शत्रु उरला नाही असा मी असता कोठेही न अडखळणारी गति ज्याची आहे असे हे चक्र आज का बरे अडखळले आहे असा विचार चक्रवर्ती करू लागला ॥ १४ ॥
याचा निश्चय केला पाहिजे असे ठरवून त्याने पुरोहिताला बोलाविले व त्या धैर्यशाली मनूने अधिक गंभीर असे भाषण याप्रमाणे उच्चस्वराने केले ॥ १५ ॥
भरतेश बोलत असता त्याच्या मुखकमलापासून उत्तम शब्दालंकार व अर्थालंकारांनी युक्त जणु जयलक्ष्मीची दूती अशी व्यक्त अभिप्रायाची सरस्वतीवाणी बाहेर पडली ॥ १६ ॥
जे शत्रुसैन्याला भयंकर वाटते, ज्याने सर्व दिशाना वश केले आहे, ज्याचे तेज सूर्याच्या तेजाला फिक्के करते ते चक्ररत्न आमच्या नगरद्वारामध्ये का प्रवेश करीत नाही? ॥ १७ ॥
जे पूर्वसमुद्र, दक्षिण समुद्र व पश्चिम समुद्र यात अस्खलित गतीचे होते. सर्व दिशांना जिंकण्याच्या कामी व विजयाईपर्वतांच्या दोन्ही गुहामध्ये कोठेही अडखळले नाही. ते आता आमच्या घराच्या अंगणात अडखळत आहे याचे कारण काय बरे असावे? बहुतकरून आमच्याशी विरूद्ध व आम्हास जिंकण्याची इच्छा करणारा कोणी तरी शत्रु असला पाहिजे ॥ १८-१९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org