SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 681
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६७०) महापुराण विजयार्द्धात्तरश्रेणीमनोहरपुरान्तिके । श्मशाने शीतवैताली विद्यया तं शुभाकृतिम् ॥ ५४ कृत्वा व्यत्यक्षिपत्पापी जरतीरूपधारिणम् । तत्रास्पृश्यकुले जाता कापि जामातरं स्वयम् ॥ ५५ स्वं ग्राममृगरूपेण स्वसुताचरणद्वये । समन्ताल्लुठितं कृत्वा तां प्रसाद्य भृशं ततः ॥ ५६ तं पुरातनरूपेण समवस्थापयत्खला । तद्विलोक्य कुमारोऽसौ खगाः स्वाभिमताकृतिम् ॥ ५७ विनिवर्तयितुं शक्ता इत्याशङ्क्य विचिन्तयन् । यमाग्रयायिसङ्काशैःकाशप्रसव हासिभिः ॥ ५८ शिरोरुहैर्जराम्भोधितरङ्गाभतनुत्वचा । समेतमात्मनो रूपं दृष्ट्वा दुष्टविभावितम् ।। ५९ लज्जाशोकाभिभूतः सन् मङ्क्षु गच्छंस्ततः परम् । तत्र भोगवती भ्रातुर्हरिकेतोः सुसिद्धया ॥ ६० विद्यया शवरूपेण सद्यः प्रार्थितया करे । कुमारस्य समुद्रम्य निर्वान्तमविचारयन् ॥ ६१ उद्घृत्येदं विशङ्कस्त्वं पिबेत्युक्तं प्रपीतवान् । तं दृष्ट्वा हरिकेतुस्त्वां सर्वव्याधिविनाशिनी ॥ ६२ विद्या श्रति सम्प्रीतः प्रयुज्य वचनं गतः । ततः स्वरूपमापन्नः कुमारो वटभूरुहः ॥ ६३ गच्छन् स्थितमधोभागे दृष्ट्वा कञ्चिन्नभश्चरम् । प्रदेशः कोऽयमित्येवम पृच्छत्सोऽब्रवीदिदम् ॥६४ (४७-५४ श्मशानात श्रीपालाला नेले. व तेथे शीतवैतालीविद्येच्या द्वारे त्या श्रीपालाला त्या पापी विद्याधराने म्हातारीचे रूप धारण करणारा बनविले व त्याला श्मशानात टाकून दिले. त्याच श्मशानात अस्पृश्याच्या कुलात उत्पन्न झालेल्या कोणी विद्याधरीने आपल्या जावयाला कुत्रा बनविले व आपल्या मुलीच्या दोन पायावर त्याला लोळण घ्यावयास लाविले व अशा रीतीने तिने आपल्या मुलीला अतिशय प्रसन्न केले ।। ५०-५६ ।। त्या दुष्टेने पुनः त्याला पूर्वरूपात आणून ठेवले. हे श्रीपालाने पाहिले व त्याला हे विद्याधर आपली शरीराची आकृति इतर प्राण्याच्या रूपात बदलू शकतात अशी शंका त्याला आली. विचार करीत असताना त्याने आपल्या रूपाकडे पाहिले व आपण यमाच्या पुढे बळी जाणाऱ्या प्राण्याप्रमाणे झालो आहोत असे त्याला वाटले. आपले सर्व केस काशपुष्पाना हसणारे अर्थात् अतिशय पांढरे झाले आहेत असे त्याला दिसून आले. वृद्धावस्थारूपी समुद्राच्या तरंगाच्या कान्तीप्रमाणे आपल्या शरीराची कातडी बनली आहे असे आपले रूप पाहून त्या दुष्ट विद्याधराने हे आपले रूप बनविले आहे असे त्याला कळून चुकले ।। ५७-५९ ।। Jain Education International तो लज्जा आणि शोक यानी पीडित झाला. तेथून तो पुढे शीघ्र जाण्यासाठी निघाला. तेथे भोगवतीचा भाऊ हरिकेतु भेटला. त्याला एक विद्या सिद्ध झाली होती. त्याने तिला विनंती केली. तेव्हां विद्येने प्रेताचे रूप धारण केले व त्या कुमाराच्या हातावर वान्ती केली व विचार न करता ती वान्ती पी असे तिने सांगितले. कुमाराने ती वान्ती पिऊन टाकली. यानंतर हरिकेतु कुमाराला असे म्हणाला- सर्व व्याधींचा नाश करणाऱ्या या विद्येने तुझा आश्रय केला आहे. असे प्रीतीने बोलून तो तेथून निघून गेला. यानंतर कुमाराला आपले स्वरूप प्राप्त झाले व तो एका वडाच्या झाडाखाली आला. तेथे एक विद्याधर बसला होता. त्याला पाहून हा प्रदेश कोणता आहे असे कुमाराने विचारले. त्यावेळी तो विद्याधर त्याला असे बोलला ॥। ६०-६४ ॥ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy