________________
४३-१२८)
अथ देशोऽस्ति विस्तीर्णः काशिस्तत्रैव विश्रुतः । पिण्डीभूता भयात्काललुण्टाकादिव भोगभूः ॥ १२१ तदापि खलु विद्यन्ते कल्पवल्लीपरिष्कृताः । द्रुमाः कल्पद्रुमाभासाश्चित्रास्तत्र क्वचित् क्वचित् ॥ १२२ तत्रैवाभीष्टमावर्ज्य यत्तत्रैवानुभूयते । स तज्जेतेति निःशङ्कं शङ्के स्वर्गापवर्गयोः ॥ १२३ वाराणसी पुरी तत्र जित्वा तामामरों पुरीम् । अमानैस्तद्विमानानि स्वसौधेरिव साहसीत् ॥ १२४ प्राक्समुच्चितदुष्कर्मा न तत्रोत्पत्तुमर्हति । प्रमादादपि तज्जोऽपि स्यात्कि पापी मनस्यपि ।। १२५ एवं भवत्रयश्रेयः सूचनी जिनवर्त्मनि । विनेयान् जिन विद्येव सान्यस्थान्यप्यवीवृतत् ॥ १२६ नाम्नैव कम्पितारातिस्तस्याः पतिरकम्पनः । विनीत इव विद्यायाः स्वाभिप्रेतार्थसम्पदः ॥ १२७ पुरोपार्जितपुण्यस्य वर्द्धने रक्षणे श्रियः । न नीतिः किन्तु कामे च धर्मे चास्योपयोगिनी ॥ १२८
महापुराण
त्या भरतक्षेत्रातच विस्तीर्ण व प्रसिद्ध असा काशीदेश आहे. दुष्ट कालरूपी लुटारूच्या भयामुळे एके ठिकाणी गोळा झालेली जणु भोगभूमी आहे असा तो काशीदेश शोभत होता ॥ १२१ ॥
(५२३
त्यावेळीही त्या काशीदेशात कोठे कोठे कल्पलतानी शोभत असलेले व कल्पवृक्षाप्रमाणे भासणारे अनेक प्रकारचे वृक्ष होते ॥ १२२ ॥
आपणास आवडणान्या वस्तूंची त्याच देशात प्राप्ति करून घेऊन त्याच देशात त्या वस्तूंचा उपभोग घेतला जात असल्यामुळे तो देश स्वर्ग आणि मोक्ष या दोघानाही जिंकणारा आहे असे निःसंशय वाटत असे ।। १२३ ।।
त्या देशात वाराणसी नांवाची नगरी आहे. तिने अमरांच्या पुरीला- देवनगरीला जिंकले होते व न मोजता येणाऱ्या अशा आपल्या चुनेगच्ची वाड्यानी ती नगरी अमरपुरीच्या विमानांना जणु हसत होती ।। १२४ ॥
ज्याने मागील जन्मात दुष्कर्म पापकर्म संचित केले आहे, असा जीव त्या नगरीत उत्पन्न होण्यास योग्य नसे. जर चुकून पापी मनुष्याचा जन्म झाला तर तो मनात देखील पापकर्म आणीत असेल काय ? ।। १२५ ।।
याप्रमाणे भूत, भविष्यत् आणि वर्तमान काल या तीन भवांच्या कल्याणाना सूचित करणारी ती नगरी जिनविद्या जिनवाणीप्रमाणे अन्य जागी राहणाऱ्या शिष्यानाही जिनेश्वरांनी सांगितलेल्या मार्गात प्रवृत्त करीत असे ॥ १२६ ॥
त्या नगरीचा राजा अकम्पन या नांवाचा होता. त्याने केवळ आपल्या नांवानेच शत्रूंना कम्पित केले होते व नम्र असा सुशिक्षित मनुष्य जसा विद्येचा स्वामी होतो तसे हा राजा आपणास आवडणाऱ्या वस्तूंनी भरलेल्या त्या नगरीचा स्वामी होता ।। १२७ ।।
Jain Education International
या अकंपन राजाची नीति पूर्वजन्मी मिळविलेल्या पुण्याची वाढ करणे आणि संपत्तीचे रक्षण करणे याच कार्यात फक्त उपयोगी पडत असे असे नाही तर काम व धर्मपुरुषार्थ यांच्या मध्येही ती उपयोगी पडत असे ॥ १२८ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org