________________
३७-१०१)
महापुराण
(३५५
निःश्रेणीकृत्य तज्जङ्घ सदूरुद्वारबन्धनम् । वासगेहास्थयानङ्गस्तच्छ्रोणी नूनमासदत् ॥ ९४ निःसृत्य नाभिवल्मीकात्कामकृष्णभुजङ्गमः। रोमावलीछलेनास्या ययौ कुचकरण्डकम् ॥ ९५ निर्मोकमिव कामाहेर्दधानोचं स्तनांशुकम् । भुजगीमिव तद्धृत्यै सैकामेकावलीमधात् ॥९६ बभ्रे हारलतां कण्ठलग्नां सा नाभिलम्बिनीम् । मन्त्ररक्षामिवानङ्गग्रथितां कामदीपिनीम् ॥ ९७ हाराकान्तस्तनाभोगा सा स्म धत्ते परां श्रियम् । सीतेव यमकाद्रिस्पृक्प्रवाहा सरिदुत्तमा ॥ ९८ बाहू तस्या जितानङ्गपाशौ लक्ष्मीमुदूहतुः । कामकल्पनुमस्येव प्ररोही दोप्रभूषणैः ॥ ९९ रेजे करतलं तस्याः सूक्ष्मरेखाभिराततम् । जयरेखा इवाबिभ्रदन्यस्त्रीनिर्जयाजिता ॥ १०० मुखमुद्धृ तनूदर्यास्तरलापाङ्गमाबभौ । सशरं समहेष्वासं जयागारमिवातनोः ॥ १०१
-------...
मदन हा तिच्या पिंडांना शिडी करून सुंदर मांड्या ह्या ज्याच्या दारे आहेत अशा तिच्या ढुंगणाला राहण्याचे आपले घर आहे असे समजून त्यात तो राहिला ॥ ९४ ॥
बेंबीरूपी वारुळातून मदनरूपी काळा सर्प निघून रोमावलीच्या मिषाने तो तिच्या स्तनरूपी करंड्याकडे गेला होता ।। ९५ ॥
त्या मदनरूपी सापाची जणु कात की काय अशी सूक्ष्म सुन्दर चोळी तिने धारण केली होती व त्या सापाच्या संतोषाकरिता जणु तिने एक पदरी कंठी सर्पिणीप्रमाणे धारण केली होती ॥ ९६ ॥
___मदनाने स्वतः गुंफून तयार केलेला व पतीच्या ठिकाणी कामोद्दीपन करणारा असा मंत्राने भारलेला जणु दोरा अशा प्रकारचा हार त्या सुभद्रा राणीने गळ्यात घातला होता व तो नाभीपर्यन्त रुळत होता ॥ ९७ ॥
हाराने जिच्या स्तनाचा विस्तार व्यापला आहे अशी ती सुभद्रादेवी उत्कृष्ट शोभेला प्राप्त झाली होती. जिचा प्रवाह यमकाद्रि नामक दोन पर्वताना स्पर्श करून वाहत आहे अशा उत्तम सीतानदीप्रमाणे ती सुभद्रादेवी शोभत होती. कारण तिच्या गळ्यातला हार तिच्या दोन स्तनाच्या मध्यभागाला स्पर्श करून रुळत असल्यामुळे तिने अपूर्व शोभा धारण केली होती ॥९८॥
ज्यानी मदनाच्या पाशाना आपल्या सौन्दर्याने जिंकले आहे असे तिचे दोन बाहू फार शोभा धारण करीत होते व ते चमकणान्या भूषणाना धारण करीत असल्यामुळे कामरूपी कल्पवृक्षाचे दोन अंकुर आहेत की काय असे वाटत होते ।। ९९ ॥
सूक्ष्मरेखांनी व्याप्त झालेला तिच्या हाताचा तळवा अन्य स्त्रियांना जिंकून उत्तम जय रेखाना जणु धारण करीत आहे असा शोभत असे ॥ १० ॥
त्या कृशोदरी सुभद्रादेवीचे चंचल कटाक्षानी युक्त आणि वर चढलेल्या भुवयानी युक्त असे मुख बाण व धनुष्याने सहित असे व जयसंपादन करणारे मदनाचे जणु मंदिर आहे असे शोभत होते ॥ १०१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org