________________
२५-११३)
महापुराण
(२१
अनन्तदीप्तिर्ज्ञानात्मा स्वयम्बुद्धः प्रजापतिः । मुक्तः शक्तो निराबाधो निष्कलो भुवनेश्वरः ॥११३
..................................
म्हणून शुचि आहेत. अथवा पापमल धुऊन टाकण्यास समर्थ अशी जी निर्लोभवृत्ति हीच जणु पाणी त्याने ते स्नान करीत असत म्हणून ते शुचि आहेत ॥ १४॥ तीर्थकृत्- ज्याने संसारसमुद्र तरून जाता येतो त्याला तीर्थ म्हणतात. तें तीर्थ म्हणजे आचारांग, सूत्रकृतांगादि द्वादशांगशास्त्रे होत. त्या तीर्थाची रचना भगवंतानी केली म्हणून भगवान् तीर्थकृत् आहेत ॥ १५ ॥ केवलीमोहादि चार घातिकर्माचा क्षय करून प्रभु केवलज्ञान संपन्न झाले म्हणून ते केवली आहेत ॥१६॥ ईशान- प्रभु अहमिन्द्रांचेही स्वामी आहेत म्हणून ईशान होत ॥ १७ ॥ पूजाह- प्रभु पूजित होण्या ग्यास अर्ह योग्य असल्यामुळे पूजार्ह हे नाव त्याना आहे. नित्यमहपूजा, चतुर्मुखपूजा, कल्पवृक्षपूजा, अष्टान्हिक पूजा इत्यादिक पूजांनी प्रभु पूज्य आहेत ॥ १८॥ स्नातक- स्नात स्नान केलेला अर्थात् द्रव्य कर्मे, ज्ञानावरणादि चार घाति कर्मे, रागद्वेष मोहादि भावकर्मे या कर्माना सहायक असे जे आहारादिक पदार्थ ज्यांना नोकर्म म्हणतात यांनी रहित असल्यामुळे स्नात पवित्र झाला आहे. क-आत्मा ज्यांचा असे प्रभु स्नातक होत अर्थात् केवलज्ञानी प्रभूला स्नातक म्हणावे ॥ १९॥ अमल- रस, रक्त, मांस, मेद, अस्थि-हाडे, मज्जा, शुक्रवीर्य असे सात धातु व विष्ठा, मूत्र, कर्णमल, नेत्रमल, अश्रु येणे, घाम येणे इत्यादि मलांनी रहित प्रभु असल्यामुळे त्यांचे अमल हे नाव योग्य आहे ।। २० ।।
अनंतदीप्ति- अपरिमित केवलज्ञानरूप तेज ज्यांचे असे. अथवा ज्यांच्या शरीरकान्तीचा नाश होत नाही असे किंवा अनन्त-अविनाशी अशा मुक्तिस्थानी ज्यांच्या गुणांची कांति आहे असे ॥२१॥ ज्ञानात्मा- प्रभु ज्ञानस्वभावाचे असल्यामुळे ते ज्ञानात्मा आहेत ॥ २२ ।। स्वयम्बुद्ध- गुरुवाचून बुद्ध म्हणजे संसार, देह, भोगापासून प्रभु विरक्त झाले ॥२३।। प्रजापति- त्रैलोक्यातील लोकाचे प्रभु स्वामी आहेत. अथवा प्रजा, भरत, बाहुबली, ब्राह्मी, सुंदरी आदिकांचे जिन आदिनाथ पिता होते म्हणूनही त्यांना प्रजापति म्हणावे. त्यांनी आपल्या मुलाना व मुलीना नानाप्रकारच्या शास्त्रांची माहिती दिली ॥ २४ ॥ मुक्त- भगवान् मिथ्यात्वादिक बंधकारणापासून सर्वथा मुक्त झाले आहेत म्हणून ते मुक्त आहेत ॥ २५ ॥ शक्त-प्रभु क्षुधा तृषादि बावीस परिषहांना सहन करण्यास समर्थ होते. म्हणून त्यांचे शक्त हे नाव योग्य आहे ।। २६ ।। निराबाध- कष्टापासून मुक्त झाले म्हणून प्रभु निराबाध होते ॥२७॥ निष्कल- प्रभु कालापासून रहित अविनाशी आहेत. अथवा ज्यांच्याठिकाणी सर्व प्रकारचे विज्ञान निश्चित असे आहे. अथवा प्रभु कामविकाराचे शत्रु असल्यामुळे ते निष्कल रेतरहित आहेत किंवा कवलाहार रहित असल्यामुळे ते अजीर्णाने रहित आहेत. प्रभु रत्नवृष्टिसमयी निष्क-हेम सुवर्ण ग्रहण करतात म्हणून त्यांना निष्कल म्हणावे. अथवा पंचाश्चर्य वृष्टिसमयी प्रभु दात्याला निष्क-सुवर्ण देतात म्हणून ते निष्कल आहेत. अथवा राज्यसमयी प्रभु निष्क-हजार पदरांचा पदकासहित हार गळ्यात घालीत होते म्हणून ते निष्कल नावाने शोभतात ।। २८ ॥ भुवनेश्वर- प्रभु त्रैलोक्याचे स्वामी असल्यामुळे भुवनेश्वर आहेत ।। २९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org