SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 443
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३२) महापुराण (४०-१६ ततोऽमराप्रमेयोक्ती सा गर्भावासशब्दने । ततोऽक्षोभ्या विलीनोक्ती परमादिर्घनध्वनिः ॥ १६ पृथक्पृथगिमे शब्दास्तदन्तास्तत्परा मताः । उत्तराण्यनुसन्धाय पदान्येभिः पदैर्वदेत् ॥ १७ आदो परमकाष्ठेति योगरूपाय वाक्परम् । नमः शब्दमुदीर्यान्ते मन्त्रविन्मन्त्रमुद्धरेत् ॥ १८ लोकाग्रवासिने शब्दात् परः कार्यो नमो नमः । एवं परमसिद्धेभ्योऽर्हत्सिद्धेभ्य इत्यपि ॥ १९ अव्याबाधाय नमः बाधारहित जिनेश्वरास नमस्कार असो. अनन्तज्ञानाय नमः अनन्तकेवलज्ञानधारी जिनेन्द्राला नमस्कार. अनन्तदर्शनाय नमः अनन्तदर्शनयुक्त जिनप्रभूला नमस्कार, अनन्तवीर्याय नमः अनन्तबलधारी जिनराजाला नमस्कार. अनन्तसुखाय नमः अनन्तसौख्ययुक्त जिनेश्वराला नमस्कार, नीरजसे नमः कर्मरूपी धूळीने रहित जिनदेवाला नमस्कार. निर्मलाय नमः कर्ममलांनी रहित अशा जिनराजाला नमस्कार. अच्छेद्याय नमः ज्यांचे कोणी छेदन करू शकत नाही अशा जिनराजाला नमस्कार. अभेद्याय नमः जे कोणत्याही प्रकारे तुटत नाहीत अखंड आहेत त्या जिनेशाला नमस्कार. अजराय नमः- वृद्धावस्थेने रहित जिनेश्वराला नमस्कार ।। १४-१५ ॥ यानंतर अमर आणि अप्रमेय हे दोन शब्द योजून वाक्य तयार करावे. नंतर अगर्भवास शब्द जोडून मंत्र रचावा. नन्तर अक्षोभ्य व अविलीन ही दोन पदे जोडून मंत्र तयार होतो. नंतर आरंभी परमपद व नंतर घनपद योजून मंत्रसिद्धि करावी. याप्रमाणे वेगळे वेगळे हे शब्द ध्यावेत व त्यांच्या शेवटी नमः पद जोडून या शब्दानी हे मंत्र बोलावेत. जसे- अमराय नमः मृत्युरहित जिनेश्वराला नमस्कार. अप्रमेयाय नमः छद्मस्थ जीव ज्याना प्रत्यक्षादि प्रमाणानी जाणण्यास असमर्थ आहेत अशा जिनेश्वरास नमस्कार. अगर्भवासाय नमः गर्भात जो आता राहणार नाही त्या जिनेश्वरास नमस्कार. यानंतर अक्षोभ्याय नमः ज्यांना कोणी क्षोभ करू शकत नाही अशा जिनेश्वरास नमस्कार. तदनंतर अविलीनाय नमः जो कधी विलीन-नष्ट होत नाही त्या जिनेश्वराला नमस्कार. 'परमघनाय नमः' उत्कृष्ट घनरूप घट्ट स्वरूप आहे ज्यांचे अशा परमात्म्याला नमस्कार ॥ १६-१७॥ आरंभी परमकाष्ठा हे पद व नन्तर योगरूपाय हे पद योजावे आणि तदनन्तर अन्ती नमः शब्द बोलून मन्त्र जाणणाऱ्या विद्वानाने मन्त्रोद्धार करावा. अर्थात् परमकाष्ठा योगरूपाय नमः हा मन्त्र रचावा. ज्यांचा योग-शुक्लध्यान उत्कृष्ट अवस्थेला पोहोचले आहे अशा परमात्म्याला नमस्कार ॥ १८ ॥ लोकाग्रवासिने या शब्दाच्या पुढे नमो नमः हा शब्द योजावा. याचप्रमाणे परमसिद्धेश्या आणि अर्हत्सिद्धेभ्य या शब्दापुढे ही नमो नमः शब्द योजून मन्त्र रचावा. अर्थात् 'लोकाग्रवासिनेनमो नमः' लोकाच्या अग्रभागावर विराजमान झालेल्या सिद्धपरमेष्ठींना वारंवार नमस्कार. 'परमसिद्धेभ्यो नमो नमः' परमसिद्धभगवंताला वारंवार नमस्कार. 'अर्हत्सिद्धेभ्यो नमो नमः' ज्यांनी प्रथम अरिहंत अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली अशा जिनेशाला वारंवार नमस्कार ॥ १९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy