SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 530
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३-९५) महापुराण (५१९ अभ्येत्य वृषभाभ्यासं दीक्षित्वा मोक्षमन्वभूत् । श्रेयसा सह नार्पत्यमनुजेन यथा पुरा ॥ ८६ पितुः पदमधिष्ठाय जयोऽतायि महीं महान् । महतोऽनुभवन्भोगान्संविभज्यानुजः सह ॥ ८७ एकवायं विहारार्थ बाह्योद्यानमुपागतः । तत्रासीनं समालोक्य शीलगुप्तमहामुनिम् ॥ ८८ त्रिःपरीत्य नमस्कृत्य नुत्वा भक्तिभरान्वितः। श्रुत्वा धर्म तमापृच्छय प्रीत्या प्रत्याविशत्पुरीम् ॥८९ तस्मिन्वने वसन्नागमिथुनं सह भूभुजा । श्रुत्वा धर्म सुधां मत्वा पपौ प्रीत्या दयारसम् ॥ ९० कदाचित्प्रावृडारम्भे प्रचण्डाशनिताडितः । मृत्वासौ शान्तिमादाय नागो नागामरोऽभवत् ॥ ९१ अन्यधुरिभमारुह्य पुनस्तद्वनमापतत् । नागी श्रुतवती धर्म राजात्रैव सहात्मना ॥ ९२ वीक्ष्य काकोदरेणामा जातकोपो विजातिना । लोलानीलोत्पलेनाहन्दम्पती तौ घिगित्यसो ॥ ९३ पलायमानौ पाषाणः काष्ठोष्ठः पदातयः। आघ्नन्सर्वे न को वात्र दुश्चरित्राय कुप्यति ॥ ९४ पापः स तदवणैर्मत्वा वेदनाकुलधीस्तदा । नाम्नाजायत गडगयां कालीति जलदेवता ॥ ९५ यानंतर तो सोमप्रभ राजा आपल्या श्रेयान् नामक धाकटया भावासह दीक्षा घेऊन मोक्षसुखाचा अनुभव घेऊ लागला. जसे प्रथमतः आपल्या भावासह त्या सोमप्रभाने राज्य सुखाचा अनुभव घेतला तसे तो आता मोक्षामध्ये आपल्या लहान भावासह मुक्तिसुखाचा अनुभव घेऊ लागला ॥ ८६ ।। ___आपल्या पित्याच्या स्थानावर बसून उत्तम भोगोपभोगांच्या पदार्थांची विभागणी करून आपल्या कनिष्ट बंधसह त्यांचा उपभोग जयकमार घेत असे व अशारीतीने त्याने पथ्वीचे पालन केले. एकदा तो क्रीडेकरिता आपल्या नगराच्या बाहेरील बागेत आला. तेथे त्याने शीलगप्तनामक महामनींना पाहिले. अतिशय भक्तीने त्याने त्यांना तीन प्रदक्षिणा घातल्या नमस्कार करून त्यांची त्याने स्तुति केली. व त्यांच्यापासून धर्म ऐकला नंतर प्रेमाने त्यांना विचारून त्याने आपल्या नगरीत प्रवेश केला ॥ ८७-८९ ॥ त्या बागेत राहणारे एक नागाचे जोडपे होते. त्याने देखिल राजाबरोबर धर्म अमृत आहे असे मानून मोठ्या प्रीतीने त्यातील दयारसाचे प्राशन केले. कोणते एकेवेळी पावसाळ्याच्या प्रारंभी भयंकर विजेचा प्रहार त्या नागावर झाला तेव्हा तो शान्ति धारण करून मरण पावला व नागकुमार देव झाला ।। ९०-९१ ॥ दुसरे दिवशी पुन्हा हत्तीवर बसून जयकुमार त्या वनात आला व आपल्या बरोबरच जिने धर्म श्रवण केले होते त्या नागिणीला विजातीय काकोदरसाबरोबर आलेल्या तिला त्याने पाहिले. त्यामुळे राजाला राग आला व या दंपतीला धिक्कार असो असे म्हणून त्याने क्रीडेसाठी हातात घेतलेल्या नीलकमलाने त्या दंपतीस ताडले ।। ९२-९३ ॥ यानंतर पळणाऱ्या त्या जोडप्याला दगड, काठ्या व ढेकळानी सर्व पायदळ सैनिक मारू लागले. बरोबरच आहे की, दुराचान्यावर कोण बरे रागावत नाही ।। ९४ ॥ तो पापी काकोदर साप त्या जखमामुळे होणाऱ्या वेदनानी व्याकुळ बुद्धीचा होऊन मरण पावला व गंगानदीत काली या नावाने जलदेवता झाला ॥ ९५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy