SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 458
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४०-१२८) महापुराण (४४७ ततो विश्वेश्वरीस्तन्यभागी भूया इतीरयन् । मातुस्तनमुपामन्त्र्य वदनेऽस्य समासजेत् ॥ ११९ प्राक्पूजां पुण्यदानं च प्रीतिदानपुरःसरम् । विधाय विधिवत्तस्य जातकर्म समापयेत् ॥ १२० जरायुपटलं चास्य नाभिनालसमायुतम् । शुचौ भूमौ निखातायां विक्षिपेन्मत्रमापठन् ॥ १२१ सम्यग्दृष्टिपदे बोध्ये सर्वमातेति चापरम् । वसुन्धरापदं चैव स्वाहान्तं द्विरुदाहरेत् ॥ १२२ मन्त्रेणानेन संमन्व्य भूमौ सोदकमक्षतम् । क्षिप्त्वा गर्भमलं न्यस्तपञ्चरत्नतले क्षिपेत् ॥ १२३ त्वत्पुत्रा इव मत्पुत्रा भूयासुश्चिरजीविनः । इत्युदाहृत्य सस्या तत्क्षेप्तव्यं महीतले ॥ १२४ क्षीरवृक्षोपशाखाभिरुपहृत्य च भूतलम् । स्नाप्या तत्रास्य मातासौ सुखोष्णमन्त्रितैर्जलः॥ १२५ सम्यग्दृष्टिपदं बोध्यविषयं द्विरुदीरयेत् । पदमासन्नभव्येति तद्वद्विश्वेश्वरीत्यपि ॥ १२६ । तत ऊजितपुण्येति जिनमातृपदं तथा । स्वाहान्तो मन्त्र एषः स्यात्तन्मातुः स्नानसंविधौ ॥ १२७ चूणिः:- सम्यग्दृष्टे २ आसन्नभव्ये २ विश्वेश्वरि २ जितपुण्ये २ जिनमातः स्वाहा । यथा जिनाम्बिका पुत्रकल्याणान्यभिपश्यति । तथेयमपि मत्पत्नीत्यास्थयमं विधि भजेत् ॥ १२८ यानन्तर हे बाला तूं विश्वेश्वरीचे-जिनमातेचे स्तनपान करणारा हो 'विश्वेश्वरीस्तन्यभागी भव' हा मंत्र बोलून व मातेचे स्तन मंत्रून या बालकाच्या मुखामध्ये ते द्यावे ॥ ११९ ॥ प्रथमतः जिनपूजा करावी नंतर पुण्य प्राप्त व्हावे म्हणून दान द्यावे व संतोषाने प्रीतिदान करावे. हे विधिपूर्वक दान करून हे जातकर्म समाप्त करावे ॥ १२० ॥ या बालकाचे जरायुपटल- वार व बेंबीची नाळ हे पवित्र अशा खणलेल्या जमिनीत पुढील मंत्र म्हणून पुरावेत. 'हे सम्यग्दृष्टे २ सर्वमातः २ हे वसुन्धरे २ स्वाहा' हा मंत्र म्हणून जरायुपटलादिक पुरावेत. अर्थात् वरील मंत्राने जलसहित अक्षता मंत्रून खड्यात टाकून त्या खड्याच्या तळभागी पंचरत्ने ठेवून तो गर्भमल टाकावा. हे भूमाते तुझ्या पुत्राप्रमाणे-हिमवदादि पर्वताप्रमाणे माझे पुत्र दीर्घकाल जगणारे होवोत असे बोलून धान्योत्पत्तीस योग्य अशा जमिनीत ते गर्भमल टाकावेत ॥ १२१-१२४ ॥ वडपिंपळ वगैरे झाडाच्या लहानढाळयानी जमीन सुशोभित करून त्या ठिकाणी या बालकाच्या मातेला मंत्रित केलेल्या सुखदायक अशा गरम पाण्यानी स्नान घालावे ।। १२५ ॥ त्या बालकाच्या मातेला स्नान घालताना हा मंत्र म्हणावा. हे सम्यग्दर्शन धारण करणारी, आसन्नभव्य असलेली, सर्व जगताची स्वामिनी, उत्कृष्ट पुण्य संचयाने युक्त असलेली, हे जिनमाता तूं आम्हाला पूज्य आदरणीय आहेस. जशी जिनमाता आपल्या जिनस्वरूपी पुत्राचे जन्मादिकल्याण पाहते तशी ही माझी पत्नी देखिल पुत्राची कल्याणे पाहो अशा श्रद्धेने तिला स्नान घालावे ।। १२६-१२८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy