________________
२५-१५३)
महापुराण
महातपा महातेजा महोदर्को महोदयः । महायशा महाधामा महासत्वो महाभूतिः ।। १५१ महाधैर्यो महावीर्यो महासम्पन्महाबलः । महाशक्तिर्महाज्योतिर्महाभूतिर्महाधुतिः ॥ १५२ महामतिर्महानीतिर्महाक्षान्तिर्महादयः । महाप्राज्ञो महाभागो महानन्दो महाकविः ॥ १५३
म्हणून भगवन्त अगाह्य आहेत ॥ ४८ ॥ गहनं- भगवंतांचे स्वरूपाचे अवगाहन योगीही करू शकत नाहीत. त्यांनाही ते अलक्ष्य स्वरूपाचे वाटतात ।। ४९ ।। गुह्यम्- योग्यांनाही प्रभूचे रहस्य उकलत नाही म्हणून ते गुह्य आहेत ॥ ५० ॥ परार्द्ध- प्रभु उत्कृष्ट अनन्तज्ञानादि गुणांनी समृद्ध आहेत ।। ५१ ॥ परमेश्वर- परमा उत्कृष्ट अशी जी मोक्षलक्ष्मी तिचे आदिभगवान् ईश्वर स्वामी आहेत ।। ५२ ।।
अनन्तद्धि-अमेद्धि-अचिन्त्यद्धि- हे भगवंता, आपल्या ऋद्धि अनन्त आहेत, न मापता येणा-या आहेत आणि अचिन्त्य आहेत म्हणून आपण अनन्तद्धियुक्त अमेद्धियुक्त आणि अचिद्धियुक्त आहात ।। ५३-५४-५५ ॥ समग्रधी- हे प्रभो, आपले ज्ञान पूर्णावस्थेस पावले आहे अर्थात् आपले केवलज्ञान जितक्या मेयवस्तु जाणण्यास योग्य आहेत त्या सर्वांना पूर्ण जाणत आहे ।। ५६ ।। प्राग्य- आपण सर्वश्रेष्ठ मुख्य आहात म्हणून प्राग्य आहात ।। ५७ ॥ प्राग्रहरउत्कृष्ट असा श्रेष्ठपणा आपणच धारण करीत आहात म्हणून प्राग्रहर आहात ।। ५८ ॥ अभ्यनलोकांचा पुढारीपणा आपण लोकाभिमुख होऊन धारण केला आहे ॥ ५९ ।। प्रत्यग्र- आपण सर्व लोकात विलक्षण नवीनपणा धारण करीत आहात म्हणून प्रत्यग्र आहात ।। ६० ॥ अग्न्य- आपण सर्वांचे स्वामी आहात म्हणून आपणास अग्य म्हणतात ।। ६१ ।। अग्रिम- आपण सर्वांचे पुढारी आहात ॥ ६२ ॥ अग्रज- सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे आपण अग्रज आहात ॥ ६३ ॥
महातपा- अनशनादि बारा प्रकारचे महातप आपण केले म्हणून आपण महातपयुक्त आहात ॥ ६४ ।। महातेजा- मोठे तेज-पुण्य आपले आहे म्हणून आपण महातेज अ महोदर्क- सर्व कर्मांचा नाश होऊन आपणास पुढे मोक्षरूपमहाफलांची प्राप्ति होणार आहे म्हणून आपण महोदर्क आहात ॥ ६६ ॥ महोदय- आपल्या ठिकाणी महान तीर्थकरनामकर्माचा उदय होऊन गणधर व सामान्य केवलीपेक्षाही महान् लोकवन्द्यता आली आहे म्हणून आपण महोदय आहात. अथवा आपल्या ठिकाणी उत्-उत्कृष्ट अयः अत्यंत शुभ दैवाचा उदय झाला आहे. अथवा महान्- केव्हाही ज्याचा अस्त होणार नाही असा कर्मक्षयाने उत्पन्न झाला आहे. केवलज्ञानाचा उदय ज्यांचे ठिकाणी असे प्रभु महोदय आहेत. अथवा मह- तेज व दयाप्राणिमात्राविषयी करुणा ज्यांचे ठिकाणी असे प्रभु महोदय आहेत ॥६७ ॥ महायशा- प्रभूच्या पुण्ययुक्त गुणांची प्रशंसा कीर्ति चोहोकडे पसरली म्हणून प्रभु महायशोयुक्त आहेत ।। ६८ ।। महाघामा- फार मोठे ज्यांचे तेज आहे असे प्रभु महाधामा आहेत ॥ ६९ ॥ महासत्त्व- ज्यांचे चित्तबल मोठे आहे असे प्रभु महासत्त्व आहेत ।। ७० ।। महाधृति- मोठा धृति- संतोष धारण करणारे प्रभु महाधतियुक्त आहेत ।। ७१ ।। महाधैर्य- मोठे धैर्य ज्यांच्या ठिकाणी आहे, भय उत्पन्न झाले असताही व्याकुलता प्रभुंच्या चित्तात उत्पन्न होत नाही ॥७२॥ महावीर्य- फार मोठा तेजस्वीपणा प्रभूमध्ये आहे म्हणून ते महावीर्यवान् वणिले जातात ।। ७३ ॥ महासम्पत्
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org