SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 240
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३३-१८) महापुराण (२२९ शिखरोल्लिखिताम्भोदपटलोद्गीर्णवारिभिः । दावभीत्येव सिञ्चन्तं स्वपर्यन्तलतावनम् ॥ १८ शचिग्रावविनिर्माणः शिखरैः स्थगिताम्बरैः । गतिप्रसरमर्कस्य न्यककुर्वाणमिवोच्छितः ।। १९ क्वचित्किन्नरसम्भोग्यः क्वचित्पन्नगसेवितैः । क्वचिच्च खचराक्रोवनराविष्कृतश्रियम् ॥ २० क्वचिद्विरलनीलांशु मिलितैः स्फटिकोपलैः । शशाङ्कमण्डलाशङ्कामातन्वन्तं नभोजुपाम् ॥२१ हरिन्मणिप्रभाजालै जालैश्च प्रभाश्मनाम् । क्वचिदिन्द्रधनुर्लेखामालिखन्तं नमोऽङ्गणे ॥ २२ पद्मरागांशभिभिन्नः स्फटिकोपलरश्मिभिः । आरक्तश्वेतवप्रान्तंकिलासिनमिव क्वचित् ॥ २३ क्वचिद्विश्लिष्टशैलेयपटलैबहुदद्रुणः । मृगेन्द्रनखरोल्लेखसहैर्गण्डोपलैस्ततम् ॥ २४ । क्वचिद्गुहान्तराद्गुञ्जन्मृगेन्द्रप्रतिनादिनीः । तटोर्दधानमुद्वद्धमदः परिहता गजः ।। २५ आपल्या शिखरानी मेघसमूहाना विदीर्ण केल्यामुळे त्यातून झालेल्या जलवृष्टीनी हा पर्वत अग्नीच्या भीतीने जणु आपल्या सभोवती असलेल्या वेलींच्या वनाला सिंचित आहे असा भासला ।। १८ ॥ ज्यानी आकाशाला झाकून टाकले आहे अशा उंच स्फटिकाच्या शिखरानी जणु हा पर्वत सूर्याच्या गतीला अडवित आहे असा भासत आहे ॥ १९ ॥ या पर्वताच्या काही वनात किन्नर राहुन सुखोपभोग घेत आहेत. काही वने पन्नगनागजातीच्या देवानी सेविली जात आहेत व काही वने सभोवती चाललेल्या विद्याधरांच्या क्रीडानी फार शोभत आहेत ।। २० ॥ कोठे कोठे या पर्वतावरील तुरळक अशा नीलमण्यांच्या किरणाशी स्फटिकमणि मिसळून गेल्यामुळे आकाशात विहार करणान्या देवाना व विद्याधराना हा चन्द्रमण्डलाची भ्रान्ति उत्पन्न करीत आहे ॥ २१ ॥ कोठे कोठे पाचरत्नांच्या किरणसमूहाशी पद्मरागमण्याच्या कांतिसमूहाचे मिश्रण झाल्यामुळे हा पर्वत आकाशाच्या अंगणात इन्द्रधनुष्याची शोभा उत्पन्न करीत आहे असे वाटत होते ॥ २२ ॥ पद्मरागमण्यांच्या किरणाशी मिश्रण पावलेल्या स्फटिकाच्या किरणानी या पर्वताचा तट कोठे कोठे लाल व पांढरा असा दिसत असल्यामुळे जणु त्याला कुष्टरोग झाला आहे असा दिसला ॥ २३ ॥ ज्याच्या तटावर शिलांचे अनेक तुकडे तुटून पडले आहेत व ते सिंहाच्या नखांचा आघात सहन करणारे असल्यामुळे जणु या पर्वताला अनेक ठिकाणीं दद्रुरोग झाला आहे व अनेक ठिकाणी चट्टे पडले आहेत असा तो भासू लागला ॥ २४ ॥ कोठे कोठे गुहांच्या आत सिंह गर्जना करीत होते त्यामुळे या पर्वताचे तट प्रतिध्वनि युक्त झाले त्यामुळे उन्मत्त हत्तीनी याच्या तटांचा त्याग केला आहे असे दिसले ॥ २५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy