SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 645
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६३४) कदाचित्कान्तया दृष्टपलितो निजमूर्धनि । श्रेष्ठी तां सत्यमद्य त्वं धर्मपत्नीत्यभिष्टुवन् ॥ ७३ हृष्ट्वा विमोच्य राजानं वरधर्मगुरोस्तपः । सार्धं समुद्रदत्ताद्येरादाय सुरभूधरे ॥ ७४ तावुभौ ब्रह्मलोकान्तेऽभूतां लौकान्तिको सुरौ । किं न साध्यं यथाकाल परिस्थित्या मनीषिभिः ॥७५ अन्येद्युः प्रियदत्तास दत्वा दानं मुनीशिने । भक्त्या विपुलमत्याख्यचारणाय यथोचितम् ॥ ७६ सम्प्राप्य नवधा पुण्यं तपसः सन्निधिर्मम । किमस्तीत्यब्रवीद्वचक्तविनया मुनिपुङ्गवम् ॥ ७७ पुत्रलाभार्थि तच्चित्तं विदित्वावषिलोचनः । वामेतरकरे धीमान्स्पष्टमङ्गुलिपञ्चकम् ॥ ७८ कनिष्ठ वामहस्तेऽसौ समदर्शयत् । पुत्रान्कालान्तरे पञ्च सापैकामात्मजामपि ॥ ७९ ते कदाचिज्जगत्पालचक्रेशस्य सुते समम् । अमितानन्तमत्याख्ये गुणिन्यौ गुणभूषणे ॥ ८० प्रजापालतनूजाभ्यां यशस्वत्या तपोभृता । गुणवत्या च सम्प्राप्ते पुरं तत्परर्माद्धिकम् ॥ ८१ राजा सान्तःपुरः श्रेष्ठी चानयोनिकटे चिरम् । श्रुत्वा सद्धर्मसद्भावं दानाद्युद्योगमाययौ ॥ ८२ महापुराण कोणे एके वेळी श्रेष्ठीच्या पत्नीने त्याच्या डोक्यात उत्पन्न झालेला पांढरा केस दाखविला. तो पाहून तू खरोखर माझी धर्मपत्नी आहेस म्हणून त्याने तिची स्तुति केली. यानंतर आनंदित होऊन त्याने राजापासून आपणास सोडवून घेतले. वरधर्म नामक गुरूजवळ जाऊन समुद्रदत्त वगैरे अनेक श्रेष्ठीसह सुरगिरीपर्वतावर त्याने दीक्षा घेतली आणि ते दोघे कुबेरमित्र च समुद्रदत्त ब्रह्मस्वर्गाच्या अन्तिमपटलात लौकान्तिक देव झाले. बरोबरच आहे की, कालपरिस्थितीला अनुसरून वागण्याने बुद्धिमान् लोकाकडून काय बरे साध्य केले जात नाही ॥ ७३-७५ ॥ ( ४६-७३ एके दिवशी ह्या प्रियदत्तेने ( कुबेरकांताची पत्नी आणि कुबेरमित्राची सून ) विपुलमतिनामक चारणमुनींना भक्तीने दान दिले. यथायोग्य नवधा पुण्य प्राप्त करून घेतले व आपला विनय व्यक्त करून माझी तपश्चरणाची स्थिति जवळ आली आहे काय असे त्या श्रेष्ठमुनीला तिने विचारले ।। ७६-७७ ।। पण अवधिज्ञाननेत्रधारी मुनीश्वरांनी तिचे मन पुत्रलाभाची इच्छा करीत आहे हे ओळखले व आपल्या उजव्या हाताची पाच बोटे व डाव्या हाताची करंगळी त्यानी दाखविली. त्याप्रमाणे तिला कांही काल गेल्यानंतर पाच पुत्र झाले आणि त्यानंतर एक कन्याही तिला झाली ।। ७८-७९ ॥ Jain Education International कोणे एके वेळी गुण हेच अलंकार धारण करणारे व सद्गुणी अशा दोन अमितमति व अनन्तमति नामक जगत्पालचक्रवर्तीच्या दोन मुली व संयमपालन करणाऱ्या अर्थात् तपश्चरण करणाऱ्या यशस्वती व गुणवती या प्रजापतिराजाच्या दोन मुली यांच्यासह त्या उत्कृष्ट ऐश्वर्ययुक्त नगरात आल्या. त्यावेळी अंतःपुरासह राजा कुबेरकांत व श्रेष्ठी यांच्या दर्शनास गेले व तेथे त्यानी दीर्घकालपर्यन्त उत्तम जिनधर्माचे स्वरूप ऐकले आणि सत्पात्राला दान देणे व जिनपूजा करणे संयम पाळणे इत्यादिक कार्यात ते प्रवृत्त झाले ॥। ८०-८२ ।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy