________________
४४-२६६)
महापुराण
(५८३
अर्ककोतिस्वकीति वा मत्वा रोषेण भास्करः। अस्तं जयजयस्यायात् कुर्वन्कालविलम्बनम् ॥ २६१ स्फुटालोकोऽपि सवृत्तोऽप्यगादस्तमहर्पतिः । आश्रित्य वारुणी रक्तः को न गच्छत्यधोगतिम् ॥२६२ उदये वधितच्छायो व्याप्य विश्वं प्रतापवान् । दिनेनेनोऽप्यनश्यत्कस्तिष्ठेत्तीवकरः परः॥ २६३ इनं स्वच्छानि विच्छायं तापहारीणि वा भृशम् । द्रष्टुं सरांस्यनिच्छन्ति कजाक्षीणि शुचा व्यधुः॥ जयनिस्त्रिशनिस्त्रिशनिपातपतितान्खगान । प्राविशन्निजनीडानि वीक्षितुं विक्षमाः खगाः॥ २६५ स प्रतापः प्रभा सास्य सा हि सर्वेकपूज्यता। पातः प्रत्यहमर्कस्याप्यतयः कर्कशो विधिः ॥२६६
सूर्याने अर्ककीर्तीला आपल्या कीर्तीप्रमाणे मानले व रागाने त्याने जयकुमाराच्या जयप्राप्तीला काही काळपर्यन्त विलम्ब केला आणि नंतर अस्ताला गेला ॥ २६१ ।।
दिवसाचा स्वामी असा हा सूर्य स्पष्ट-स्वच्छ प्रकाशाचा आहे व निर्मल ज्ञानाचा धारक आहे. तसेच तो सद्वृत्त-सदाचाराने युक्त व गोल आहे पण त्याने वारुणीचा-मद्याचा व दुसरा अर्थ पश्चिमदिशेचा आश्रय केला व तो रक्त-आसक्त झाला व रक्त - लाल झाला. त्यामुळे तो अधोगतीला-अस्ताला गेला. मद्यासक्त झालेला मनुष्य जसा अधोगतीला जातो तसा तो सूर्य पश्चिम दिशेचा-हीन दिशेचा आश्रय केल्यामुळे अधोगतीला-अस्ताला गेला ॥२६२॥
सूर्य उदयाला आल्यावर त्याची कान्ति वाढत जाते व सगळ्या जगाला व्यापून तो प्रतापवान् संताप देणारा होतो. पण तो कसे एका दिवसात नाश पावतो? कारण तीव्रकर:तीव्र किरणांचा, प्रखर किरणांचा असूनही नाश पावला. तसा राजा देखील प्रथमतः ऐश्वर्य व कान्तिसंपन्न होतो व आपला पराक्रम सर्वत्र तो पसरतो पण जेव्हां तो तीव्रकर- प्रजेपासून अधिक कर लादून धन उकळतो तेव्हां तो सूर्याप्रमाणे कसा अधिक काल टिकू शकेल ?॥२६३ ।।
___ सन्ताप नाहीसा करणारी अशी स्वच्छ सरोवरे अतिशय कान्तिरहित झालेल्या सूर्याला पाहण्यास इच्छित नव्हती म्हणून त्यानी शोकाने आपले कमलरूपी डोळे मिटून घेतले ।। २६४ ।।
जयकुमाराच्या तीक्ष्ण खड्गाच्या प्रहारानी पडलेल्या विद्याधरांना पाहण्यास असमर्थ झालेले खग-पक्षी त्यावेळी आपल्या घरट्यात शिरले ॥ २६५ ।।
सूर्याचा तो अपूर्व प्रताप व त्याची अपूर्व- असाधारण कान्ति व त्याच्याविषयी असलेली सर्वांची आदरबुद्धि, हे सर्व गुण असूनही दररोज त्याचे पतन अवश्य होतेच. यावरून देव फार अतळ आणि कर्कश आहे, निष्ठुर आहे असे म्हणावे लागते ॥ २६६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org