SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 664
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४६-२५९) महापुराण (६५३ मुनि हिरण्यवर्माणं कदाचित्प्रेतभूतले। दिनानि सप्त सङ्गीर्य प्रतिमायोगधारिणम् ॥ २४७ वन्दित्वा नागराः सर्वे तत्पूर्वभवसङ्कथाम् । कुर्वाणाः पुरमागच्छन्विद्युच्चोरोऽप्युदीरितात् ॥ २४८ चेटक्याः प्रियवत्तायास्तन्मुनेः प्राक्तनं भवम् । विदित्वा तद्गतक्रोधात्तदोत्पन्न विभङ्गकः ॥ २४९ मुनि पृथकप्रदेशस्थं प्रतिमायोगमास्थितम् । प्रभावती च संयोज्य चितिकायां दुराशयः ॥ २५० एकस्यामेव निक्षिप्याषाक्षीवघजिघृक्षया । सोढ्वा तदुपसर्ग तौ विशुद्धपरिणामतः ॥ २५१ स्वर्ग समुदपद्येतां क्षमया कि न जायते । सुवर्णवर्मा तज्ज्ञात्वा विद्युच्चोरस्य विग्रहम् ॥ २५२ करिष्यामीति कोपेन पापिनः सङ्गरं व्यधात् । विदित्वावविबोधेन तत्तौ स्वर्गनिवासिनी ॥ २५३ प्राप्य संयमिरूपेण सुतं धर्मकथादिभिः । तत्त्वं श्रद्धाप्य तं कोपादपास्य कृपया हि तौ ॥ २५४ दिव्यं रूपं समादाय निगद्य निजवृत्तकम् । प्रदायाभरणं तस्मै पराध्यं स्वपदं गतौ ॥ २५५ कदाचिद्वत्सविषये सुसीमानगरे मुनेः । शिवघोषस्य कैवल्यमुदपाद्यस्तघातिनः ॥ २५६ शक्रप्रिये शची मेनका च नत्वा जिनेश्वरम् । समाश्रित्य सुराधीशं स्थिते प्रश्नात्सुरेशितुः ॥ २५७ अत्रैव सप्तमेऽह्नि प्राक्समात्तश्रावकवते । नाम्ना पुष्पवती सान्या प्रथमा पुष्पपालिता ॥ २५८ कुसुमावचयासक्ते वने साग्निहेतुना। मृते देव्यावजायेतामित्याहासौ स्म तीर्थकृत् ॥ २५९ ___ कोणे एके वेळी हिरण्यवर्म मुनींनी सात दिवसाची प्रतिज्ञा करून प्रतिमायोग धारण केला. त्याना वन्दन करून सर्व नागरिक लोक त्यांच्या पूर्वभवाची कथा बोलत नगरात आले. त्यावेळी प्रियदत्तेच्या दासीच्या भाषणावरून विद्युच्चोरालाही त्या मुनीच्या पूर्वभवाचे वृत्त समजले. त्यामुळे त्या मुनीविषयी क्रोध उत्पन्न होऊन त्याला विभङ्ग अवधिज्ञान-मिथ्या अवधिज्ञान उत्पन्न झाले. अगदी वेगळ्या जागी प्रतिमायोग धारण केलेल्या मुनीला व प्रभावती आर्यिकेला दुष्ट अभिप्राय ज्याचा आहे अशा त्या चोराने एकाच चितेवर एकत्र संयुक्त करून पापकर्माचा संचय करून घेण्यासाठी जाळले. पण त्या मुनि आर्यिकानी विशुद्ध परिणामानी तो उपसर्ग सहन केला व ते स्वर्गात उत्पन्न झाले. बरोबर आहे की क्षमेने काय बरे प्राप्त होत नाही. सुवर्णवर्माला हे सर्व समजले. पापी विधुच्चोराला मी शिक्षा करीन अशी त्याने प्रतिज्ञा केली. ही गोष्ट अवधिज्ञानाने त्या स्वर्गवासी देवाना समजली व ते मुनि व आयिकेच्या रूपाने आले. दयायक्त अशा त्यानी धर्मकथा आदिकांच्या द्वारे त्याच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न केली. त्याचा कोप त्यानी दूर केला. यानन्तर त्यानी दिव्यरूप धारण करून व आपले सर्व वृत्त त्यानी सांगितले व सुवर्णवर्माला उत्कृष्ट अमूल्य अलंकर देऊन ते आपल्या स्थानी गेले ॥२४७-२५५।। कोणे एकेवेळी वत्सदेशात सुसीमानामक नगरात ज्यानी ज्ञानावरण, दर्शनावरण, मोह व अन्तराय या चार घातिकर्मांचा नाश केला आहे अशा शिवघोष मुनींना केवलज्ञान उत्पन्न झाले ॥ २५६ ॥ त्यावेळी इन्द्राला आवडणान्या शची व मेनकानामक दोन देवी जिनेश्वर शिवघोषांना वन्दन करून इन्द्राजवळ जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा इन्द्राने प्रभूना प्रश्न विचारला व प्रभूनी असे सांगितले- येथेच सातव्या दिवसापूर्वी पुष्पपालिता आणि दुसरी पुष्पवती या दोघीनी श्रावकाची व्रते घेतली होती व वनात त्या पुष्पे गोळा करण्याच्या कार्यात एकाग्रचित्त झाल्या होत्या. त्यावेळी त्या साप आणि अग्नि या कारणानी मरण पावल्या व त्या दोघी देवी झाल्या आहेत असे शिवघोष तीर्थंकरानी सांगितले ॥ २५७-२५९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy