________________
२८-१११)
महापुराण
(१२३
ततोऽभिमतसंसिख कृतसिद्धनमस्क्रियः । रथं प्रचोदयेत्युच्चः प्राजितारमचोदयत् ॥ १०४ विमुक्तप्रग्रहैवहिरह्यमानो मनोजवैः । लवणान्धी व्रतं प्रायाखानपात्रायितो रथः ॥ १०५ रथो मनोरथात्पूर्व रथात्पूर्व मनोरथः । इति संभाव्यवेगोऽसौ रथो वाद्धि व्यगाहत ॥ १०६ जलस्तम्भः प्रवृत्तो न जलं नु स्थलतां गतम् । स्यन्दनं यदसौ वाहा जले निन्यः स्थलास्थया ॥१०७ तथैव चऋचीत्कारस्तथैवाश्वः प्रधौरितम् । यथा बहिर्जलं पूर्वमहो पुण्यं रथाङगिनः ॥ १०८ महद्भिरपि कल्लोलैः सिच्यमानास्तुरङगमाः। रथं निन्युरनायासात्प्रत्युतैषां स विश्रमः ॥ १०९ रथचक्रसमुत्पीडाज्जलोत्पीडः समुच्छलन् । व्यधाद्ध्वजांशुके जाउचं जलानामीदृशी गतिः ॥११० नागरागस्तुरडगानामादितः श्रममितः । क्षालितः खरवेगोत्थैः केवलं शीकरैरपाम ॥ १११
यानतर महाभाग्यवान् व कृतधी-विद्वान् भरतप्रभूने गंभीर गर्जना करणान्या समुद्राला पाहिले व पाहूनच त्याने अवज्ञेने गायीच्या पावलाप्रमाणे त्याला मानिले ॥ १०३ ।।
यानंतर भरतेशाने आपले इष्टकार्य सिद्ध व्हावे म्हणून सिद्धपरमेष्ठींना नमस्कार केला व रथ पढे चाल कर अशी सारथ्याला उच्चस्वराने आज्ञा केली ॥ १०४ ॥
ज्यांचे लगाम ढिले केले आहेत व ज्यांचा वेग मनाप्रमाणे आहे अशा घोड्यांनी ओढून नेलेला तो रथ लवणसमुद्रात नावेप्रमाणे शीघ्र वेगाने चालू लागला-पळू लागला ॥१०५।।
भरतराजाच्या मनोर थापूर्वी रथ जातो का रथाच्या पूर्वी भरतेशाचा मनोरथ जातो याविषयी ज्याच्या वेगाचा विचार केला जात होता अशा ह्या रथाने समुद्रात प्रवेश केला ॥१०६।।
या समुद्राच्या पाण्याचे रतंभन झाले काय ? अथवा पाण्याचे स्थलांत रूपान्तर झाले काय ? कारण घोड्यांनी हा भरतेशाचा रथ पाण्यात स्थल समजून नेला ॥ १०७ ।।
भूमीवर रथ चालत असता जसा चाकांचा आवाज होतो तसाच आवाज पाण्यातून रथ जात असता होत होता व घोडेही जमीनीवर चालण्याचे वेगाने पाण्यात चालत होते. यावरून भरतेश्वराचे पुण्य आश्चर्यकारक होते ।। १०८॥
मोठमोठ्या लाटानी ते रथाचे घोडे भिजत होते व त्यामुळे त्यानी अनायासाने तो रथ नेला पण अंग वारंवार भिजत असल्यामुळे त्यांना विसावा मिळाल्याप्रमाणे वाटे ॥ १०९ ।।
रथाच्या चाकांच्या आघाताने पाण्याचा प्रवाह वर आकाशात उडत असे व त्यामुळे रथावरच्या ध्वजाचे वस्त्र भिजून ते जड झाले व वाऱ्याने ते फडफडेनासे झाले. बरोबरच आहे की, जडाच्या संगतीने अशीच स्थिति होत असते. संस्कृत भाषेत ड आणि ल यामध्ये फरक मानीत नाहीत म्हणून 'जलानां' याच्या ऐवजी जडानां असे म्हणता येते. येथे अर्थाचा चमत्कार दाखविण्याकरिता असा फरक केला आहे ।। ११० ॥
___घोड्यांच्या अंगावर लावलेली उटी श्रमाने उत्पन्न झालेल्या घामाने नाहीशी झाली नाही पण त्यांच्या खुरांच्या वेगापासून वर उडालेल्या पाण्याच्या तुषारानी ती उटी सर्व धुऊन गेली.।। १११॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org