SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 133
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १२२) महापुराण (२८-९७ अदृष्टपारमक्षोभ्यमसंहार्यमनुत्तरम् । सिद्धालयमिव व्यक्तमव्यक्तममृतास्पदम् ॥ ९७ 'क्वचिन्महोपलच्छायाधृतसन्ध्याभ्रविभ्रमम् । कृतान्धतमसारम्भं क्वचिन्नीलाश्मरश्मिभिः ॥ ९८ हरिन्मणिप्रभोत्सः क्वचित्सन्दिग्धर्शवलम् । क्वचिच्च कोडकुमी कान्ति तन्वानं विद्रुमाजकुरैः ॥९९ क्वचिच्छक्तिपुटोद्धदसमृच्छलितमौक्तिकम् । तारकानिकराकोणं हसन्तं जलभृत्पथम् ॥ १०० वेलापर्यन्तसम्मूछेत्सर्वरत्नांशुशीकरैः । क्वचिदिन्द्रधनुर्लेखां लिखन्तमिव खासगणे ॥ १०१ रथाङगपाणिरित्युच्चैः सम्भृतं रत्नकोटिभिः । महानिधिमिवापूर्वमपश्यन्मकरालयम् ॥ १०२ दृष्ट्वाथ तं महाभागः कृतधोरनिःस्वनम् । दृष्ट्वैवातुलयच्चक्री गोष्पदावज्ञयार्णवम् ॥ १०३ ...................... तो समुद्र स्पष्टरीतीने सिद्धालयासारखा वाटत असे. सिद्धालयाचा पार जसा दिसत नाही तसा समुद्राचा पारही दिसत नाही. सिद्धालय जसे अक्षोभ्य आहे आकुलतारहित आहे तसे हाही अक्षोभ्य कोणाकडून ढवळला जात नाही, मळकट केला जात नाही. सिद्धालय असंहार्यज्यांचा संहार कोणाकडून केला जात नाही. विनाश ज्याचा कोणीही करू शकत नाही असे आहे व हा समुद्रही असंहार्य आहे. त्याचा कोणाकडून नाश केला जात नाही. सिद्धालय अनुत्तर आहे. अत्यत्कृष्ट आहे व हा समद्रही अनत्तर-ज्याला कोणी तरून जाऊ शकत नाही असा आहे. सिद्धालय व्यक्त-सकलगुण परिपूर्ण आहे. पण पूर्णतया छद्मस्थांना गम्य नाही. म्हणून अव्यक्तही आहे. हा समुद्रही नेत्रांना दिसतो म्हणून व्यक्त आहे पण त्याचे स्वरूप नेत्रांना सर्व व्यक्त नाही म्हणून अव्यक्त आहे व सिद्धालय अमृतास्पद आहे- मोक्षाचे स्थान आहे व हा समुद्र अमृतजलाचे स्थान आहे ॥ ९७ ।। हा समुद्र कोठे कोठे पद्मरागमण्यांच्या कान्तीनी सन्ध्याकालीन मेघाची शोभा धारण करीत आहे व कोठे कोठे नीलमण्यांची कान्ति पसरल्यामुळे दाट अग्धकाराला निर्मित आहे असा भासतो ॥ ९८ ।। हिरव्या पाचू रत्नांची कान्ति वर पसरल्यामुळे हा समुद्र कोठे कोठे शेवाळच्या प्रदेशाची शंका उत्पन्न करीत आहे व कोठे कोठे पोवळ्यांच्या अंकुरानो केशराची लाल कान्ति वाढवित आहे ।। ९९ ॥ या समुद्राच्या काही प्रदेशात शिंपल्यांचे जोड उघडल्यामुळे आतून बाहेर पडलेली मोत्ये विखुरली होती त्यामुळे ते प्रदेश चांदण्यांच्या समूहानी व्याप्त झालेल्या मेघांच्या मार्गाला-आकाशाला जणु हसत आहेत असे भासत होते ।। १०० ॥ स्वतःच्या किनाऱ्यापर्यन्त पसरलेल्या अनेक रत्नांच्या किरणानी काही ठिकाणी आकाशात इन्द्र-धनुष्यांच्या पंक्तींची शोभा या समुद्राने चित्रित केली होती ।। १०१ ॥ कोट्यवधि रत्नांचे मोठे ढीग जेथे पसरले आहेत अशा जणु अपूर्व महानिधिप्रमाणे असलेल्या समु ला भरतेशाने पाहिले ।। १०२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy