SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 132
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-९६) महापुराण (१२१ ससत्वमतिगम्भीरं भोगिभिर्धृतवेलकम् । सुराजानमिवात्युच्चैर्वृत्ति मर्यादया धृतम् ॥ ९१ अनेकमन्तरद्वीपमन्तर्वतिनमात्मनः । दुर्गदेशमिवाहायं पालयन्तमलङ्घनः ॥ ९२ गर्जद्भिरतिगम्भीरं नभोव्यापिभिरूजितः । आपूर्यमाणमम्भोभिर्घनौधः किङ्करैरिव ॥ ९३ रिङगितैश्चलितः क्षोभैरुत्थितैश्च विवर्तनः । ग्रहाविष्टमिवोज्जम्भं सध्वानं च सधूणितम् ॥ ९४ रत्नांशुचित्रिततलं मुक्ताशबलितासम् । ग्राहैरध्यासितं विष्वक सुखालोकं च भीषणम् ॥ ९५ नदीनं रत्नभूयिष्ठमप्राणं चिरजीवितम् । समुद्रमपि चोन्मुद्रं झषकेतुममन्मथम् ॥ ९६ हा लवणसमुद्र सुस्वभावी राजाप्रमाणे आहे. उत्तम राजा ससत्त्व-पराक्रमी बलशाली व सत्वगुणाने सहित असतो, हा समुद्रही ससत्त्व-जलचरप्राण्यानी युक्त आहे. उत्तम राजा अतिशय गंभीर-दूरवर विचार करणारा असतो. हा समुद्रही गंभीर-अतिशय खोल आहे. उत्तम राजाजवळ अनेक भोगीलोक अनेक राजे व श्रीमंत लोक असतात. हा समुद्र देखील आपल्या किना-यावर अनेक भोगीनी-सर्पानी युक्त आहे. उत्तम राजाचे वागणे मर्यादेने युक्त असते व हा समुद्रही उत्तम मर्यादेने युक्त होता व त्याचे पाणी हवेमुळे उंच उसळत होते ॥ ९१ ॥ हा समुद्र आपल्या मध्यभागी असणाऱ्या अनेक अन्तर्वीपांचे रक्षण करीत होता व अलङध्य आणि हरण करण्यास जिंकण्यास अशक्य अशा किल्ल्याप्रमाणे त्यांचे पालन करीत होता ।। ९२ ।। जे अतिशय गंभीर गर्जना करीत आहेत, जे आकाशात व्यापून पसरलेले आहेत व आपल्या विपुल पाण्यानी सेवकाप्रमाणे ज्याला भरीत आहेत अशा उत्कृष्ट मेघानी हा समुद्र युक्त होता ॥ ९३ ॥ हा समुद्र ज्याला पिशाचबाधा झाली आहे अशा मनुष्याप्रमाणे भासत आहे. अर्थात् तो मनुष्य जमिनीवर लोळतो, वारंवार झिंगतो, खवळतो, वारंवार उठतो आणि गरगर फिरतो, तसे हा समुद्रही आपल्या लहरींनी रांगत आहे, चंचल होत आहे, क्षुब्ध व वारंवार उसळत आहे व कधी इकडे तर कधी तिकडे फिरत आहे. पिशाचपीडित मनुष्य जसा वारंवार जांभया देतो, बडबडतो व घुमतो तसा हा समुद्र वारंवार शब्द करीत वर उसळतो आणि वायूने थरथर कापतो ।। ९४ ।। या समद्राचा तळभाग रत्नांच्या किरणांनी अनेक रंगांचा बनला आहे व याचे पाणी मोत्यांनी मिश्रित झाले आहे. अशा या समुद्राचे दर्शन सुखदायक आहे असे वाटते. पण मगर वगैरे क्रूर जीवानी हा युक्त असल्यामुळे भयंकरही वाटत आहे ।। ९५ ।। समुद्र हा सर्व नद्यांचा पति आहे व अनेक रत्नांनी खूप भरलेला आहे. हा अप्राण-प्राण रहित असूनही दीर्घकालच्या जीविताने युक्त आहे हा विरोध आहे. याचे निरसन असे-हा अप्प्राण भप-पाणी हेच ज्याचे प्राण आहेत असा आहे. समुद्र-मुद्रासहित असून ही उन्मुद्र आहे. विरोधपरिहार-उम्मद्र-उत्कृष्ट आनंदाला देणारा आहे. झषकेतु- मासा ज्याचा ध्वज आहे असा असूनही तो मन्मथ नाही हे विरुद्ध आहे. परिहार-माशांचे समुद्र उत्पत्ति स्थान आहे म्हणून तो अमन्मथ-मदन नव्हे ॥ ९६ ॥ म.१६ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy