SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 669
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६५८) महापुराण (४६-२९९ अत्रैव नाटकाचार्यतनुजा नाटयमालिका । आस्थिायिकायां भावेन स्थायिना नत्यबुद्रसम् ॥ २९९ तदालोक्य महीपालो बहुविस्मयमागमत् । गणिकोत्पलमालाख्यत् किमत्राश्चर्यमीश्वर ॥ ३०० श्रेष्ठिनश्च मिथोऽन्येयुः प्रतिमायोगधारिणः । सोपवासस्य पूज्यस्य गत्वा चालयितुं मनः ॥ ३०१ नाशकं तदिहाश्चर्यमित्याख्यद्भभुजापि सा । गुणप्रिये वृणीष्वेति प्रोक्ता शोलाभिरक्षणम् ॥३०२ अभीष्टं मम देहीति तद्दत्तं व्रतमग्रहीत् । अन्यदा तद्गृहं सर्वरक्षिताख्यः समागमत् ॥ ३०३ रात्रौ तलवरो दृष्ट्वा तं बाह्याद्येति तेन तत् । प्रतिपादनवेलायामेवायान्मन्त्रिणः सुतः॥ ३०४ नपतेमैथुनो नाम्ना पथधीस्तं निरीक्ष्य सा । मञ्जूषायां विनिक्षिप्य गणिका सर्वरक्षितम् ॥ ३०५ त्वया मदीयाभरणं सत्यवत्यै समर्पितम् । त्वद्धगिन्य तदानेयमित्याह नपमैथुनम् ॥ ३०६ सोऽपि प्राक् प्रतिपाद्येतद्वतग्रहणसंश्रुतेः । प्रातिकूल्यमनागीया॑वान् द्वितीयदिने पुनः ॥ ३०७ साक्षिणं परिकल्प्यनं मञ्जूषास्थं महीपतेः । सन्निधौ याचितो वित्तमसावुत्पलमालया ॥ ३०८ न गृहीतं मयेत्यस्मिन्मिथ्यावादिनि भूभुजा । पृष्टा सत्यवती तस्य पुरस्तान्यक्षिपद्धनम् ॥ ३०९ मैथुनाय नृपःक्रुद्ध्वा खलोऽयं हन्यतामिति । आज्ञापयत्पदातीन्स्वान्युक्तं तन्न्यायवर्तिनः ॥ ३१० याच नगरात एका नाटकाचार्याची-नृत्य शिकविणाऱ्याची नाटयमालिका नांवाची मुलगी राजसभेत रतिआदिक स्थायीभावानी युक्त व पाहणान्यांच्या मनात रस उत्पन्न होईल असे नृत्य करू लागली ॥ २९९ ॥ ते नृत्य पाहून राजा फार आश्चर्यचकित झाला. पण उत्पलमाला म्हणाली की हे प्रभो, याच्यात काही आश्चर्य नाही ॥ ३०० ।। एके वेळी एकान्ती प्रतिमायोग धारण करणाऱ्या, उपवास ज्याने स्वीकारलेला आहे, अशा पूज्य श्रेष्ठीचे मन चंचल करण्यासाठी मी गेल्ये होत्ये, पण मी त्याचे मन चंचल करण्यास समर्थ झाले नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे असे गणिकेने सांगितले ते ऐकून राजा तिला म्हणाला- गुण जिला आवडतात अशी तूं काय वर मागतेस तो माग मी तुला देईन. तेव्हा ती म्हणाली शीलाचे रक्षण करणे हे मला आवडते ते मला द्या. तेव्हा राजाने ते तिला दिले. एके वेळी सर्वरक्षित नांवाचा कोतवाल तिच्या घरी रात्री आला तेव्हा ती त्याला म्हणाली ॥३०१-३०३।। आज मी बाहेर बसल्ये आहे, ऋतुमती झाल्ये आहे असे ती सांगत असताच मन्त्रि पुत्रही तेथे आला. तो राजाचा मेहुणा होता. त्याचे पृथुश्री असे नांव होते. तो आला त्यावेळी त्या गणिकेने सर्व रक्षिताला एका पेटीमध्ये झाकून ठेविले. त्या पृथुश्रीला पाहून ती गणिका म्हणाली, हे पृथुश्री तूं माझा दागिना तुझ्या सत्यवती नामक बहिणीला दिला आहे तो मला परत आणून दे असे त्या राजाच्या मेहुण्याला म्हणाली. त्या पृथुश्रीने प्रथम तिचे म्हणणे मान्य केले पण तिने शीलवत ग्रहण केले आहे हे ऐकल्यामुळे मनात तिच्याविषयी इर्ष्यालु झाला व प्रतिकूल झाला ।। ३०४-३०७ ॥ तेव्हा सर्वरक्षिताला तिने साक्षीदार केले व दुसरे दिवशी राजाकडे जाऊन पृथुश्रीला ती आपले धन मागू लागली. तेव्हा मी हिचे धन घेतले नाही असे त्याने खोटे सांगितले. तेव्हा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy