________________
३६-३२)
महापुराण
रणभूमि प्रसाध्यारास्थितो बाहुबली नृपः । अयं च नृपशार्दूलः प्रस्थितो निनियन्त्रणः ॥ २५ न विद्मः किनु खल्वत्र स्याद्भात्रोरनयोरिति । प्रायो न शान्तये युद्धमेनयोरनुजीविनाम् ॥ २६ विरूपकमिवं युद्धमारब्धं भरतेशिना । ऐश्वर्यमददुर्वाराः स्वैरिणः प्रभवो यतः ॥ २७ इमे मुकुटबद्धाः किं नैनौ वारयितुं क्षमाः। येऽमी समग्रसामग्र्या सङग्रामयितुमागताः॥ २८ अहो महानुभावोऽयं कुमारो भुजविक्रमी । क्रुद्ध चक्रधरेऽप्येवं यो योध्दुं सम्मखं स्थितः ॥ २९ अथवा तन्त्रमयस्त्वं न जयाडं मनस्विनः । नन सिंहो जयत्येकः संहितानपि दन्तिनः ॥ ३० अयं च चक्रभद्दोवो नेष्टः सामान्यमानुषः । योऽभिरक्ष्यः सहस्रेण प्रणम्राणां सुधाभुजाम् ॥ ३१ तन्माभूदनयोयुद्धं जनसङक्षयकारणम् । कुर्वन्तु देवताः शान्ति यदि सन्निहिताइमाः ॥ ३२
इकडे बाहुबली राजाने रणभूमीची रचना केली व तो लढण्यासाठी तयार झाला आणि ज्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही असा नृपश्रेष्ठ भरतही त्याच्याबरोबर लढण्यास तयार झाला ॥ २५ ॥
___ या युद्धामध्ये या दोन भावांची काय परिस्थिति होणार आहे हे आम्हाला समजत नाही. बहुत करून या दोघांच्या युद्धामध्ये जो नोकरवर्ग आहे त्यांचे कल्याण होईल. त्याला शान्ति लाभेल असे दिसत नाही ॥ २६ ।।
या भरतेश्वराने हे युद्ध आरंभिले आहे हे चांगले केले नाही यण यांना कोणी सांगावे कारण हे राजे स्वैरी-स्वच्छंदी असतात. यांचा ऐश्वर्यगर्व दुर्वार आहे त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाहीत ।। २७ ॥
जे हे राजे सर्व सामग्री घेऊन युद्ध करण्यासाठी आले आहेत ते या दोघाना निवारण करण्यास समर्थ नाहीत काय ? ॥ २८ ॥
भुजांच्या पराक्रमाने युक्त असलेला हा कुमार बाहुबलि फार मोठ्या सामर्थ्याने शोभत आहे. कारण चक्रवर्ती भरत रागावला असताही त्याच्या पुढे युद्ध करण्यास उभा राहिला आहे ॥ २९ ॥
अथवा पुष्कळ सामग्री असूनही ती वीर पुरुषाला जिंकण्याचे साधन होत नसते. कारण एके ठिकाणी जमाव करून उभे राहिलेल्या हत्तीनाही एक सिंह जिंकतोच ।। ३० ॥
व हा चक्र धारण करणारा भरतप्रभु पण सामान्य मनुष्य नाही. कारण नम्र अशा हजार देवाकडून रक्षिला जात आहे ॥ ३१ ॥
तेव्हां यांचे युद्ध होऊ नये हेच बरे. कारण याचे युद्ध लोकनाशाला कारण होईल. व जर देवता जवळ असतील तर त्या शान्तीला उत्पन्न करोत. या दोघांना युद्धापासून निवृत्त करोत ॥ ३२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org