________________
२५-२१७)
महापुराण
समुन्मूलितकर्मारिः कर्मकाष्ठाशुशुक्षणिः । कर्मण्यः कर्मठः प्राशुहेयादेयविचक्षणः ॥ २१४ अनन्तशक्तिरच्छेद्यस्त्रिपुरारिस्त्रिलोचनः । त्रिनेत्रस्त्र्यम्बकस्त्र्यक्षः केवलज्ञानवीक्षणः ॥ २१५ समन्तभद्रः शान्तारिर्धर्माचार्यो दयानिधिः । सूक्ष्मदर्शी जितानङ्गः कृपालुधर्मदेशकः ।। २१६ शुभंयुः सुखसाद्भूतः पुण्यराशिरनामयः । धर्मपालो जगत्पालो धर्मसाम्राज्यनायकः ॥ २१७
समुन्मूलितकर्मारि-- मुळापासून कर्मरिपु प्रभुंनी उपटून टाकले म्हणून ते त्या नांवाने युक्त आहेत।। ८०।। कर्मकाष्ठाशुशुक्षणि--प्रभु कर्मरूपी लाकडांना जाळणारे जणु अग्नि आहेत ॥८१॥ कर्मण्य--प्रभु आत्मोद्धारक उपदेश करण्यात कुशल आहेत म्हणून त्यांना कर्मण्य म्हणतात ॥ ८२ । कर्मठ-- सर्वदा कर्म करण्यात जीवांना हितकारक अशा रत्नत्रयात प्रवृत्त करण्यास शूर ।। ८३।। प्रांशु-- सर्वापेक्षा उन्नत-तीर्थंकरपदाने सर्वोत्कृष्ट ॥ ८४ ॥ हेयादेयविचक्षण-- प्रभु ग्रहण करण्याचे पदार्थ कोणते व त्यागण्याचे पदार्थ कोणते हे जाणण्यात चतुर आहेत ।। ८५ ॥ अनन्तशक्ति-- अनन्तशक्ति युक्त असल्यामुळे प्रभु अनन्त सामर्थ्यवान आहेत ।। ८६ ।। अच्छेद्य-- ज्यांचे छेदनभेदन करणे शक्य नाही असे प्रभु आहेत ।। ८७ ।। त्रिपुरारि-- जन्म जरा व मरण या तीन नगरांचा नाश करणारे प्रभु त्रिपुरारि आहेत ।। ८८ ।। त्रिलोचन-- तीन कालांना विषय होणान्चा पदार्थाना पाहणारे दोन डोळे-केवलज्ञान व केवलदर्शन हे ज्यांना आहेत असे प्रभु त्रिलोचन होत ॥ ८९ ॥ त्रिनेत्र-- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यकचारित्र हे तीन डोळे ज्याना आहेत असे प्रभु त्रिनेत्र आहेत ।। ९० ॥ त्र्यम्बक-- प्रभु त्रिलोकाचे अम्बक पिता आहेत म्हणून त्याना त्र्यम्बक हे नाव आहे ॥ ९१ ॥ त्र्यक्ष-- ज्या प्रभूच्या आत्म्याला तीन अवयवसम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र हे आहेत म्हणून त्यांना त्र्यक्ष म्हणतात ॥ ९२ ॥ केवलज्ञानवीक्षण-- प्रभूना केवलज्ञान हा विशष्ट डोळा आहे यास्तव त्यांना केवलज्ञानवीक्षण म्हणतात ।। ९३ ॥
___समन्तभद्र-- सर्व बाजूंनी कल्याणच ज्यांचे आहे असे प्रभु समन्तभद्र होत अथवा ज्यांचे सर्व स्वभाव शुभच आहेत असे प्रभु समन्तभद्र होत ।। ९४ ।। शान्तारि-- सर्व शत्रु शान्त झाले आहेत ज्यांचे असे प्रभु शान्तारि आहेत ॥ ९५ ।। धर्माचार्य-- प्रभु उत्तम क्षमादि दशलक्षण धर्माचे आचार्य आहेत गुरु आहेत ॥ ९६ ।। दयानिधि-- प्रभु करुणेचे दयेचे निधि-निवासस्थान आहेत ॥ ९७ ॥ सूक्ष्मदर्शी-- अतिशय सूक्ष्म पदार्थाला पाहण्याचा शील-स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु आहेत ॥ ९८ ।। जितानङ्ग-- मदनाला जिंकले म्हणून प्रभु जितानङ्ग आहेत ॥ ९९ ॥ कृपालु-- प्रभूच्या ठिकाणी दया आहे म्हणून ते कृपालु आहेत ।। १०० ।। धर्मदेशक-- प्रभु धर्माचा उपदेश करतात म्हणून ते धर्मदेशक आहेत ॥१०१॥ शुभंयु- शुभ कर्माच्या उदयाने पूर्ण भरलेले प्रभु शुभंयु होत ॥१०२।। सुखसाद्भूत- अनन्तसुखमय प्रभु झाले त्यामुळे ते सुखसाद्भूतः या नांवाने युक्त झाले. अथवा मातेच्या गर्भातून सुखाने उत्पन्न झालेले ।। १०३ ।। पुण्यराशि-- शुभ, आयु, शुभनाम, शुभगोत्र व सद्वैदनीय कर्म या पुण्य कर्माच्या राशींनी युक्त असे प्रभु पुण्यराशि होत ॥ १०४ ॥ अनामय-- आमय-मानसिक व शारीरिक रोग याने रहित प्रभ असल्यामळे ते अनामय आहेत ।। १०५ ॥ धर्मपाल-- उत्तम क्षमादि दशधर्माचे प्रभु पालन करतात म्हणून
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org