________________
५८)
महापुराण
(२५-२११
श्रीशः श्रीश्रितपादाब्जो वीतभीरभयङ्करः । उत्सन्नदोषो निर्विघ्नो निश्चलो लोकवत्सलः ॥२११ लोकोत्तरो लोकपतिर्लोकचक्षुरपारधीः । धीरधीर्वृद्धसन्मार्गः शुद्धः सूनृतपूतवाक् ॥ २१२ प्रज्ञापारमितः प्राज्ञो यतिनियमितेन्द्रियः । भदन्तो भद्रकृद्भद्रः कल्पवृक्षो वरप्रदः ॥ २१३
...............
सर्वथा अनित्यच, सर्वथा एकच सर्वथा अनेकच असे वस्तुस्वरूप सांगणारे जे सर्वथा एकान्त नय ते दुर्णय होत-त्यांचा प्रभूनी हत: नाश केला म्हणून प्रभु हतदुर्णय होत ॥ ५४ ॥ श्रीश-- श्रीदेवीचे प्रभु ईश-स्वामी आहेत ॥ ५५ ॥ श्रीश्रितपादाब्ज- श्रीदेवतेने आश्रयिले आहेत पदकमल ज्यांचे असे प्रभु श्री-श्रितपादाब्ज होत ।। ५६ ॥ वीतभी-- वीता नष्ट झाली आहे भी-भीति ज्यांची असे प्रभ वीतभी होत ।। ५७ ॥ अभयंकर-- प्रभ भक्तभय दूर करणारे आहेत म्हणून अभयंकर ॥ ५८ ।। उत्सन्नदोष-- उत्सन्न-नष्ट केले आहेत कामक्रोधादिक दोष ज्यांनी असे प्रभु उत्सन्नदोष होत ।। ५५ ॥ निर्विघ्न-- निर्-नष्ट झालेले आहे विघ्न अन्तरायकर्म ज्यांचे असे प्रभु निर्विघ्न होत ॥६०॥ निश्चल-- नष्ट झालेला आहे चल कंप ज्यापासून किंवा ज्याचा असे प्रभु निश्चल होत. अर्थात् सदा स्थिर आहेत ॥ ६१ ॥ लोकवत्सल-- प्रभु लोकाविषयी प्रेमळ असल्यामुळे ते लोकवत्सल होत ॥ ६२ ।।
लोकोत्तर-- त्रैलोक्यात असलेल्या प्राणिसमूहात प्रभु उत्तर-उत्कृष्ट आहेत म्हणून ते लोकोत्तर आहेत ।। ६३ ।। लोकपति-- आदिभगवान् त्रैलोक्यातील सर्व लोकांचे स्वामी आहेत ।। ६४ ॥ लोकचक्षु-- लोक म्हणजे सर्व प्राणिसमूह त्यांना भगवान् डोळ्याप्रमाणे आहेत अथवा लोके-लोकात व अलोकात भगवान् चक्षु-केवलज्ञान व केवलदर्शन या दोन डोळ्यांनी युक्त आहेत ॥ ६५ ॥ अपारधी-- सर्व कर्मे नष्ट झाल्यानंतर अपार अशा सिद्धक्षेत्रात ज्यांची बुद्धि तत्पर झाली आहे असे प्रभु अपारधी होत ॥ ६६ ॥ धीरधी-- धीरा-धैर्ययुक्त व कम्परहित अशा बुद्धीने प्रभु युक्त आहेत ॥ ६७ ।। बुद्धसन्मार्ग-- सतां-अतीतकाली जे निर्वाणसागर आदि तीर्थंकर होऊन गेले त्या सत्पुरुषांचा मार्ग रत्नत्रयरूप मोक्षमार्ग तो प्रभु आदिजिनानी जाणला आहे म्हणून ते बुद्धसन्मार्ग आहेत ॥ ६८ ॥ शुद्ध-- प्रभु शुद्ध-कर्मकलंकरहित आहेत. अर्थात् शुद्ध या नांवाने शोभत आहेत ॥ ६९ ॥ सूनृतपूतवाक्-- सत्याने पूत-पवित्र वाक्-वाणी ज्यांची आहे असे प्रभु सूनृतपूतवाक् आहेत ॥ ७० ॥ प्रज्ञापारमित-- जीवादि वस्तूंचा ऊहापोह करणारी अशा बुद्धीच्या दुसऱ्या किनाऱ्याला प्रभु पोचलेले आहेत म्हणून ते प्रज्ञापारमित आहेत ॥७१।। प्राज्ञ-- त्रिकालाला विषय झालेले जे जीवादि पदार्थ त्यांचे ज्ञान प्रभूला आहे म्हणून ते प्राज्ञ होत ॥ ७२ ।। यति- रत्नत्रयात प्रभु यत्न करतात म्हणून यति आहेत ॥ ७३ । नियमितेन्द्रिय-- प्रभुंनी आपले डोले आदिक इन्द्रिये नियन्त्रित केली आहेत-स्वाधीन ठेविली आहेत ॥ ७४ ॥ भदन्त-- इन्द्र, नरेन्द्र, धरणेन्द्रादिकांना प्रभु पूजनीय आहेत म्हणून ते भदन्त आहेत ।। ७५ ॥ भद्रकृत्- ज्यांनी भद्र-कल्याण केले आहे, जीवांचे कल्याण केले व करीत राहतात असे आदिजिनेन्द्र भद्रकृत् होत ।। ७६ ॥ भद्र-- प्रभु कल्याणस्वरूप आहेत ॥ ७७ ॥ कल्पवृक्ष-- कल्पध्यान-चिन्तन केले असता फळ देणारा वृक्ष असे प्रभु आहेत ॥ ७८ ॥ वरप्रद-- वर-अभीष्ट असे स्वर्ग व मोक्ष प्रभु भक्तांना देतात म्हणून ते वरप्रद आहेत ॥ ७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org