SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 333
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३२२) महापुराण (३६-५० रराज राजराजोऽपि तिरीटोवनविग्रहः । सचूलिक इवाद्रीन्द्रस्तप्तचामीकरच्छविः ॥५० दधद्धीरतरां दृष्टि निनिमेषामनुटाम् । दृष्टियुद्धे जयं प्राप प्रसभं भुजविक्रमी ॥५१ विनिवार्य कृतक्षोभमनिवार्यबलार्णवम् । मर्यादया यवीयांसं जयेनायोजयनृपाः ॥ ५२ . सरसीजलमागाढी जलयुद्ध मदोद्धतौ । दिग्गजाविव तौ दीर्धेत्युिक्षामासतुर्भुजैः॥५३ अधिवक्षस्तटं जिष्णोरेजुरच्छा जलच्छटाः । शैलभर्तुरिवोत्सङगसद्धगिन्यः नुतयोऽम्भसाम् ॥ ५४ जलौघो भरतेशेन मुक्तो दोर्बलशलिनः । प्रांशोरप्राप्य दूरेण मुखमारात्समापतत् ।। ५५ भरतेशः किलात्रापि न यदाप जयं तदा । बलैर्भुजबलीशस्य भूयोऽप्युद्धोषितो जयः ॥५६ नियुद्धमथ सङगीर्य नृसिंहौ सिंहविक्रमौ । धारावाविष्कृतस्पों तो रङगमवतेरतुः ॥५७ अनेक राजांचा अधिपति राजराज भरतचक्री देखिल मुकुटामुळे अधिक उंच दिसत होता व तो ज्याची तापविलेल्या सोन्याप्रमाणे कांति आहे व जो चूलिकेने-शिखराने सहित आहे अशा पर्वतराज-मेरूप्रमाणे शोभला ॥ ५० ॥ बाहुबलीने अधिक गंभीर आणि शान्त व पापण्या जिच्यात लवत नाहीत अशी आपली दृष्टि भरताच्या दृष्टीवर लावली आणि त्यामुळे त्या भुजविक्रमशाली बाहुबलीने दृष्टियुद्धात शीघ्र जय मिळविला ॥ ५१ ॥ या दृष्टिविजयामुळे बाहुबलीच्या सैन्यात फार आनन्द उसळला व तो सैन्यसमुद्र अनिवार्य झाला तथापि त्याला प्रधानादिकानी रोखून धरले व मर्यादेने त्यानी धाकट्या भावाला म्हणजे बाहुबलीला त्या सर्व राजानी जययुक्त केले ।। ५२ ।। यानन्तर त्या दोघानी सरोवराच्या पाण्यात प्रवेश केला. मदाने उद्धत झालेले दोघे जणु उद्धत झालेले दोन दिग्गज आहेत असे ते आपल्या दीर्घ बाहूनी एकमेकाच्या अंगावर पाणी फेकू लागले ॥ ५३॥ भुजबलीने भरताच्या अंगावर फेकलेल्या स्वच्छ पाण्याच्या छटा जणु मेरूपर्वताच्या मध्यभागावर पाण्याच्या लहरी खेळत आहेत अशा भासल्या ।। ५४ ।। भरतेश्वराने जो पाण्याचा लोट फेकला तो बाहुबलाने शोभणारा व उंच अशा बाहुबलीच्या मुखापासून फार दूर असा खाली पडला ॥ ५५ ॥ भरतेशाला या जलयुद्धातही जेव्हा जय प्राप्त झाला नाही तेव्हा बाहुबलीराजाच्या सैन्यानी पुनः बाहुबलीला जय प्राप्त झाला म्हणून मोठ्याने घोषणा केली ॥ ५६ ॥ यानन्तर त्या दोघानी बाहु-युद्ध करण्याची प्रतिज्ञा केली-सिंहाप्रमाणे पराक्रमी असे ते दोघे धैर्यशाली पुरुषसिंह मनात ईर्ष्या उत्पन्न झाल्यामुळे रंगभूमीवर आले ॥ ५७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy