SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 332
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३६-४९) अकारणरणेनालं जनसंहारकारिणा । महानेवमधर्मश्च गरीयांश्च यशोवधः ॥ ४१ बलोत्कर्षपरीक्षेयमन्यथाप्युपपद्यते । तदस्तु युवयोरेव मिथो युद्धं त्रिधात्मकम् ॥ ४२ भ्रूभङ्गेन विना भङ्गः सोढव्यो युवयोरिह । विजयश्च विनोत्सेकात्धर्मो ह्येष सनाभिषु ॥ ४३ इत्युक्तौ पार्थिवैः सर्वैः सोपरोधैश्च मन्त्रिभिः । तौ कृच्छ्रात्प्रत्यपत्सातां तादृशं युद्धमुद्धतौ ॥ ४४ जलदृष्टिनियुद्धेषु योऽनयोजयमाप्स्यति । स जयश्री विलासिन्याः पतिरस्तु स्वयं वृतः ॥ ४५ इत्युद्घोष्य कृतानन्दमानन्दिन्या गभीरया | भेर्या चमूप्रधानानां न्यधुरेकत्र सन्निधिम् ॥ ४६ नृपा भरतगृह्या ये तानेकत्र न्यवेशयत् । ये बाहुबलिगृह्याश्च पार्थिवास्ते ततोऽन्यतः ॥ ४७ मध्ये महीभृतां तेषां रेजतुस्तौ नृपौ स्थितौ । गतौ निषधनीलाद्री कुतश्चिदिव सन्निधिम् ॥ ४८ तयोर्भुजबली रेजे गरुडग्रावसच्छविः । जम्बूद्रुम इवोत्तुङ्गः सभृङ्गः शितमूर्धज : ॥ ४९ महापुराण जे लोकसंहार करणारे युद्ध आहे ते निष्कारण आहे. असले लोकविनाशक युद्ध नको. ते युद्ध महान् अधर्मरूप आहे आणि त्यात यशाचा फार मोठा नाश होतो ॥ ४१ ॥ ( ३२१ कोणाचे बल उत्कृष्ट आहे याची परीक्षा अन्य प्रकारानेही होऊ शकते. म्हणून तुमचे दोघांचे अन्योन्य युद्ध तीन प्रकारचे होवो ॥ ४२ ॥ या तीन प्रकारच्या युद्धात दोघापैकी ज्याचा पराजय होईल त्याने तो भुवया वाकड्या न करता सहन करावा व विजय झाला तर तोही गर्वरहित धारण करावा. अशा रीतीने वागणे हा संबंधी जनामध्ये धर्म आहे असे समजावे ।। ४३ ।। असे सर्व राजानी आणि मंत्र्यानी त्या दोघाना आग्रहपूर्वक सांगितले व त्या उद्धत दोघानी मोठ्या कष्टाने त्यांचे ते तसले युद्ध मान्य केले ॥ ४४ ॥ जलयुद्ध, दृष्टियुद्ध व मल्लयुद्ध या तीन युद्धात जो जय मिळवील तो जयलक्ष्मीरूपी विलासिनीकडून स्वतः वरला गेलेला तिचा पति होईल ।। ४५ ।। या प्रकारे निश्चित केल्यावर आनन्दिनी नामक गंभीर भेरीच्या द्वारे मुख्य प्रधानानी ज्याना आनंद झाला आहे अशा दोन्ही बाजूच्या मुख्य लोकांना एकत्र केले ॥ ४६ ॥ जे भरताच्या बाजूचे राजे होते त्यांना एके ठिकाणी बसविले व जे बाहुबलीच्या बाजूचे राजे होते त्यांना दुसरे स्थानी एकत्र बसविले ।। ४७ ।। त्या सर्व राजांच्या मध्यभागी ते दोघे भरत व बाहुबलि हे दोन राजे उभे राहिले. जणु ते निषधपर्वत व नीलपर्वत कोठून तरी एकत्र जवळ आल्याप्रमाणे दिसले ॥ ४८ ॥ Jain Education International त्या दोघापैकी गारुडमण्याप्रमाणे ज्याची कान्ति आहे, ज्याचे काळे केस आहेत असा बाहुबलि भुंग्यानी सहित व अतिशय उंच अशा जांभळाच्या झाडाप्रमाणे शोभला ॥ ४९ ॥ म. ४१ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy