SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 334
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३६-६५) महापुराण (३२३ बल्गितास्फोटितश्चित्रः करणैर्बन्धपीडितः । दोर्दर्पशालिनोरासीबाहुयुद्धं तयोर्महत् ॥ ५८ ज्वलन्मुकुटभाचको हेलयोभ्रामितोऽमुना । लीलामलातचक्रस्य चक्री भेजे क्षणं भ्रमन् ॥ ५९ यवीयान्नपशार्दूलं ज्यायांसं जितभारतम् । जित्वापि नानयभूमि प्रभुरित्येव गौरवात् ॥६० भुजोपरोधमुद्धत्य स तं धत्ते स्म दोर्बली । हिमाद्रिमिव नीलाद्रिमहाकटकभास्वरम् ॥ ६१ तदा कलकलश्चक्रे पक्ष्यर्भुजबलीशिनः । नृपर्भरतगृह्येस्तु लज्जया नमितं शिरः ॥ ६२ समक्षमीक्षमाणेषु पार्थिवेषभयेष्वपि । परां विमानतां प्राप्य ययौ चक्री विलक्षताम् ॥ ६३ बद्धभ्रकुटिरुभ्रान्तरुधिरारुणलोचनः । क्षणं दुरीक्ष्यतां भेजे चक्री प्रज्वलितः क्रुधा ॥ ६४ क्रोधान्धेन तदा दध्ये कर्तुमस्य पराजयम् । चक्रमत्कृत्तनिःशेषद्विषच्चक्रं निधीशिना ॥ ६५ ------------.... आपआपल्या बाहूच्या बलाच्या गर्वाने शोभणाऱ्या त्या दोघांचे बायुद्ध- ( कुस्ती) फार मोठे झाले. गर्जना करणे, हातपाय आपटणे, छड्डू ठोकणे, अनेक प्रकारचे पेच करणे व एकमेकाना खोडा घालणे अशा प्रकारानी मोठे वर्णन करण्यासारखे झाले ॥ ५८ ॥ या बाहुबलिकुमाराने जेव्हा लीलेने चक्रवर्ती भरताला गरगर फिरविले तेव्हा चमकणाऱ्या मुकुटाच्या कान्तिसमूहाने युक्त असलेला व थोडा वेळपर्यन्त फिरणाऱ्या ह्या चक्रीने अग्निचक्राची शोभा धारण केली ॥ ५९ ॥ ज्याने सर्व भरतक्षेत्र जिंकले आहे व जो सर्व राजामध्ये श्रेष्ठ आहे अशा आपल्या वडील भावाला धाकटा भाऊ अशा बाहुबलीने जरी जिंकले तथापि हा आमचा प्रभु आहे अशी त्याच्या विषयी जी गौरवबुद्धि तिच्यामुळे त्याने जमिनीवर त्याला आणले नाही. जमिनीवर पाडले नाही ।। ६० ॥ जसा नीलपर्वताने मोठमोठ्या टेकड्यानी शोभणाऱ्या हिमाचलाला जणु उचलून घरावे तसे आपल्या दोन बाहूनी पकडून व वर उचलून त्या बाहुबलीने त्या भरतेश्वराला उंच धरले ॥ ६१ ॥ त्यावेळी भुजबलीराजाच्या पक्षांच्या राजानी मोठा कलकलाट केला आणि भरताच्या बाजूच्या राजानी लाजेने आपले मस्तक खाली घातले ॥ ६२ ॥ दोन्ही बाजूचे राजे देखिल आपणास प्रत्यक्ष पाहत आहेत असे दिसून आल्यामुळे अत्यन्त अपमानित झालेला भरत अत्यन्त खिन्न झाला ।। ६३ ॥ तत्काल तो क्रोधाने खूप पेटला, त्याच्या भुवया वर चढल्या, त्याचे डोळे वर फिरून रक्ताप्रमाणे लालबुंद झाले व तो क्षणपर्यन्त भयंकर दिसू लागला ॥ ६४ ॥ त्यावेळी क्रोधाने अंध झालेल्या निधिपति भरताने या बाहुबलीचा पराजय करण्याकरिता ज्याने सर्व शत्रुसमुहाला उपडून टाकले आहे अशा चक्राचे चिन्तन केले, स्मरण केले ॥ ६५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy