________________
२८०)
महापुराण
(३४-२१९
किमत्र बहुना धर्मक्रिया यावत्यविप्लुता । तां कृत्स्ना ते स्वसाच्चक्रुस्त्यक्तराजन्यविक्रियाः॥२१९
वसन्ततिलकवृत्त इत्थं पुराणपुरुषादधिगम्य बोधि तत्तीर्थमानससरःप्रियराजहंसाः। ये राज्यभूमिमवधूय विधूतमोहाः । प्रावाजिषुर्भरतराजमनन्तुकामाः ।। २२० ते पौरवा मुनिवराः पुरुधैर्यसाराः। धीरानगारचरितेषु कृतावधानाः ॥ योगीश्वरानुगतमार्गमनुप्रपन्नाः । शं वो दिशन्त्वखिललोकहितकतानाः ॥ २२१
शार्दूलविक्रीडित नत्वा विश्वसृजं चराचरगुरुं देवं दिवीशाचितम् । नान्यस्य प्रति व्रजाम इति ये दीक्षां परां संश्रिताः ।। ते नः सन्तु तपोविभूतिमुचितां स्वीकृत्य मुक्तिश्रियम् । बद्धेच्छा वृषभात्मजा जिनजुषामग्रेसराःश्रेयसे ॥ २२२
याविषयी जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही. त्या सर्व मुनीनी राज्यावस्थेत असताना उद्भवणारे सर्व विकार त्यागले होते व दिगंबर दीक्षा घेऊन जितक्या धर्मक्रिया त्यानी केल्या त्यात दोष तिळमात्रही उत्पन्न होऊ दिला नाही व त्या सर्व धर्मक्रिया त्यानी उत्तम रीतीने पाळल्या ।। २१९ ॥
भरतराजाला नमस्कार करण्याची ज्याना इच्छा नव्हती अशा आदिभगवंताच्या बाहुबलीवय॑ सर्व पुत्रानी राज्यभूमीचा त्याग केला, तद्विषयक मोह त्यागला व ते पुराणपुरुष भगवान् आदिभगवंताकडे आले. हे भगवंताचे पुत्र भगवत्तीर्थ हेच कोणी मानससरोवर त्यात प्रिय राजहंसासारखे झाले. भगवन्तापासून त्यानी रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतली व दीक्षा धारण केली ॥ २२० ।
श्रेष्ठ मुनि असे ते भगवंताचे पुत्र महाधैर्याचा सार धारण करणारे म्हणजे महान् धैर्यशाली होते व महान् बलवान् होते. धीर अशा मुनिचारित्रांचे पालन करण्यात सतत तत्पर होते. योगीश्वर-भगवान् आदिजिनेश्वरानी अनुसरलेल्या मार्गाचे पालन ते करीत होते. सर्व जगाचे हित करण्यात तत्पर असे ते भगवंताचे पुत्र तुम्हाला सुख देवोत ॥ २२१ ॥
ज्याची इन्द्र पूजा करतात, जो चराचरांचा गुरु आहे, जो जगाचा कर्ता आहे, अशा देवाला-आदिभगवंताला नमस्कार करून आम्ही इतराला नमस्कार करणार नाही असा निश्चय करून ज्यानी उत्कृष्ट दीक्षा धारण केली, जे जिनभगवंताची सेवा करण्यात अग्रेसर आहेत, जे उत्कृष्ट व तपोवैभव स्वीकारून मुक्तिलक्ष्मीची इच्छा करतात ते वृषभजिनेश्वराचे पुत्र आमचे कल्याण करोत ।। २२२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org