________________
४४२)
महापुराण
(४०-७७
एते तु पीठिकामन्त्राः सप्त ज्ञेया द्विजोत्तमैः । एतः सिद्धार्चनं कुर्यादापानादिक्रियाविधौ ॥ ७७ क्रियामन्त्रास्त एते स्युराधानादिक्रियाविधौ । सूत्रे गणधरोद्धार्ये यान्ति साधनमन्त्रताम् ॥ ७८ सन्ध्यास्वग्नित्रये देवपूजने नित्यकर्मणि । भवन्त्याहुतिमन्त्राश्च त एते विधिसाधिताः ॥७९ सिद्धार्चासन्निधौ मन्त्राञ्जपेदष्टोत्तरं शतम् । गन्धपुष्पाक्षता_विनिवेदनपुरःसरम् ॥ ८० सिद्धविद्यस्ततो मन्त्ररेभिः कर्म समाचरेत् । शुक्लवासाः शुचिर्यज्ञोपवीत्यव्यग्रमानसः ॥ ८१ अयोग्ऽनयः प्रणेयाः स्युः कर्मारम्भे द्विजोत्तमैः । रत्नत्रितयसङ्कल्पादग्नीन्द्रमुकुटोद्भवाः ॥ ८२ तीर्थकृद्गणधच्छेषकेवल्यन्तमहोत्सवे । पूजाङ्गत्वं समासाद्य पवित्रत्वमुपागताः ॥ ८३ कुण्डत्रये प्रणेतव्यास्त्रय एते महाग्नयः । गार्हपत्याहवनीयदक्षिणाग्निप्रसिद्धयः ॥ ८४ अस्मिन्नग्नित्रये पूजा मन्त्रैः कुर्वन्द्विजोत्तमः । आहिताग्निरितिज्ञेयो नित्येज्या यस्य सद्मनि ॥ ८५
हे सात पीठिका मंत्र श्रेष्ठ ब्राह्मणानी जाणावेत व गर्भधानादिक्रियाविधीमध्ये या मंत्रानी सिद्धार्चन करावे. (आहुतिमन्त्र, जातिमन्त्र, निस्तारकमन्त्र, मुनिमंत्र, सुरेन्द्रमन्त्र, परमराजमन्त्र आणि परमेष्ठिमन्त्र ) ।। ७७ ।।
गर्भधानादिकक्रियाविधीमध्ये याना क्रियामन्त्र म्हणतात व गणधरानी सांगितलेल्या सूत्रात याना साधनमंत्र म्हणतात ॥ ७८ ।।
विधिपूर्वक सिद्ध केलेले हेच मंत्र सन्ध्यांच्यावेळी तीन अग्नीमध्ये देवपूजनरूप नित्य कर्म करीत असता आहुतिमंत्र म्हटले जातात ॥ ७९ ॥
सिद्धप्रतिमेच्या संनिध गन्ध, फुले, अक्षता, अर्घ वगैरे समर्पण करून एकशे आठ वेळा या मंत्रांचा जप करावा ॥ ८० ॥
ज्याला विद्यासिद्धि झाली आहे, ज्याने शुद्धवस्त्र धारण केले आहे, ज्याच्या गळ्यात यज्ञोपवीत आहे व ज्याच्या मनात व्यग्रता नाही अशा द्विजाने या मंत्रानी सर्व क्रिया कराव्यात ॥ ८१ ॥
क्रियांच्या प्रारंभी उत्तम द्विजानी रत्नत्रयाचा संकल्प करून अग्निकुमार देवांच्या इन्द्राच्या मुकुटापासून उत्पन्न झालेल्या तीन अग्नीना संस्कारयुक्त करावे ।। ८२ ।।
तीर्थकर, गणधर व शेषकेवली (सामान्यकेवली) यांना मोक्ष प्राप्त झाल्यावर त्यावेळच्या महान् उत्सवप्रसंगी त्यांच्या पूजेला हे अग्नि कारण झाल्यामुळे पवित्र झाले आहेत ॥ ८३ ॥
म्हणून हे तीन महाग्नि तीन कुण्डामध्ये स्थापन करावेत. यांना क्रमाने गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि या नावानी प्रसिद्धि प्राप्त झाली आहे ॥ ८४ ॥
ज्याच्या घरी या तीन अग्नीमध्ये मंत्राच्याद्वारे नित्य पूजा केली जाते त्याला आहिताग्नि द्विजोत्तम म्हणतात ॥ ८५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org