________________
५४८)
महापुराण
(४३-३२९
इत्येभिः स्यन्दनादेषा समत्क्षिप्यावरोपिता । रत्नमालां समादाय कन्या कञ्चुकिनः करात्॥३२९ अबध्नाद्वन्धुरां तस्य कण्ठेऽतिप्रेमनिर्भरा । सावाचकात्समाध्यास्य वक्षो लक्ष्मीरिवापरा ॥ ३३० सहसा सर्वतूर्याणामुदतिष्ठन्महाध्वनिः । श्रावयन्निव विक्कन्याः कन्यासामान्यमुत्सवम् ॥ ३३१ । वक्त्रवारिजवासिन्या नरविद्याधरेशिनाम् । श्रिया जयमुखाम्भोजमाश्रितं वा तदात्यभात् ॥ ३३२ गताशावारयो म्लानमुखाब्जाक्ष्युत्पलश्रियः । खभूचरनृपाः कष्टमासन्शुष्कसरःसमाः ॥ ३३३
अभिमतफलसिद्धचा वर्धमानप्रमोदो। निजदुहितसमेतं द्राक् पुरोधाय पूज्यम् ॥ जयममरतरं वा कल्पवल्लीसनाथं । नगरमविशदुच्चै थवंशाधिनाथः ॥ ३३४ आद्योऽयं महिते स्वयंवरविधौ । यद्भाग्यसौभाग्यभाक् । यस्माद्राज्यखगेन्द्रवक्त्रवनजश्रीवारयोषितः ॥ मालाम्लानगुणा यतोऽस्य शरणे मन्दारमालायते ।
तत्कल्पावधि वीघ्रमस्य विपुलं विश्वं यशो व्यश्नुते ॥ ३३५ व अतिशय प्रेमविवश होऊन तिने त्याच्या गळ्यात ती माला बांधली. त्यावेळी बी माला जयकुमाराच्या वक्षःस्थलावर जणु दुसऱ्या लक्ष्मीप्रमाणे बसून शोभली ॥ ३२७-३३० ॥
जेव्हां जयकुमाराच्या गळ्यात सुलोचनेने रत्नमाला घातली त्यावेळी एकदम सर्व वाद्यांचा मोठा ध्वनि उत्पन्न झाला व तो सर्व दिक्कन्याना सुलोचनाकन्येचा हा अवर्णनीय असामान्य उत्सव कळवीत आहे असे वाटले ।। ३३१॥
भूमिगोचरी राजे व विद्याधर राजे यांच्या मुखकमलांत निवास करणान्या शोभेने जयकुमाराच्या मुखाचा आश्रय जणू घेतला असे जयकुमाराचे मुखकमल अतिशय शोभू लागले ॥ ३३२ ॥
ज्यांचे आशारूपी पाणी वाळून गेले आहे व त्यामुळे ज्यांच्या मुखकमलाची व नेत्र कमलांची शोभा म्लान झाली आहे असे ते भूपति व विद्याधरपति वाळलेल्या सरोवराप्रमाणे कष्टी झाले - दुःखी झाले ॥ ३३३ ॥
आपल्या इष्टकार्याची सिद्धि झाल्यामुळे ज्याचा आनन्द वाढला आहे व जो नाथवंशाचा स्वामी आहे अशा अकम्पपनराजाने कल्पलतेने सहित असा जणु कल्पवृक्ष अशा आपल्या कन्येने युक्त असलेल्या जयकुमाराला पुढे करून उत्कृष्ट अशा आपल्या नगरात त्वरेने प्रवेश केला ।। ३३४ ॥
या प्रशंसनीय स्वयंवराच्या विधीमध्ये पुण्योदयाने प्राप्त झालेल्या सौभाग्याला धारण करणारा हा जयकुमार पहिलाच आहे, भूमिगोचरी राजे व विद्याधरराजे यांच्या मुखकमलाची जी शोभा हीच कोणी वाराङ्गना स्त्री तिने युक्त झाला. सुलोचनेने जिचे गुण प्रफुल्ल आहेत अशी जी माला याच्या गळ्यात घातली ती याच्या घरी मन्दारकल्पवृक्षाप्रमाणे झाली. अशा या जयकुमाराचे विपुल व शुभ्र यश कल्पान्तकालापर्यन्त सगळ्या विश्वाला व्याप्त करील ।। ३३५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org