SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 558
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३-३२८) महापुराण (५४७ ततस्त्वयि वयोरूपशीलादिगुणभाज्यलम् । प्रीतिलतेव दकपुष्पा प्रवृद्धास्य फलिष्यति ॥ ३२२ युवाभ्यां निजितः कामः सम्प्रत्यभ्यन्तरीकृतः । स वामपजयायाभूदरिविश्रम्भतोऽप्यरिः ॥ ३२३ निष्ठरं जम्भतेऽमुष्मिन्नुभयारिरपि स्मरः । मत्वेव त्वां स्त्रियं भूयो भटेष भटमत्सरः ॥ ३२४ विख्यातविजयः श्रीमान् यानमात्रेण निर्जितः । त्वयायमत एवात्र जयो न्यायागतस्तव ॥ ३२५ प्राध्वंकृत्य गले रत्नमालया दृक्शरेजितम् । जयलक्ष्मीस्तवैवास्तु तत्त्वमेनं करे कुरु ॥ ३२६ इति तस्य वचः श्रुत्वा स्मरषाड्गुण्यवेदिनः । शनैविगलितवीलालोललीलावलोकना ॥ ३२७ तदा जन्मान्तरस्नेहश्चाक्षुषी सुन्दराकृतिः । कुन्दभासा गुणास्तस्य श्रावणाः पुष्पसायकः ॥ ३२८ पण तू वय, रूप, शील आदिक गुणानी अतिशय शोभत आहेस, म्हणून दृष्टिरूपी पुष्पानी लकडलेली व खूप वाढलेली जी याची प्रीतिरूपी लता आहे ती तुझ्यामुळे सफल होईल. या चार सवती तुला असूनही या सवतीपासून होणा-या दुःखांचा तुला तिळमात्रही अनुभव येणार नाही ।। ३२२ ॥ __ तुम्ही दोघांनी ज्या कामदेवाला जिंकन दूर केले होते पण त्यालाच आता तुम्ही आपल्याजवळ केलेले आहे, आपल्या अन्तःकरणात स्थान दिले आहे अथवा त्याला तुम्ही आपले विश्वासपात्र बनविले आहे पण तो तुम्हा दोघांचा पराजयच करील. कारण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून तो मित्र होणार नाही. जो शत्रु आहे तो शत्रूच राहील ॥ ३२३ ॥ जरी हा कामदेव तुम्हा दोघांचा शत्रु आहे तरीही हा या जयकुमारावर आपला अधिक प्रभाव पाडील. कारण तू स्त्री आहेस असे समजून तुझ्यावर आपला प्रभाव पाडणार नाही. कारण शूरावरच शूराचा मत्सर होतो. तात्पर्य तुला स्त्री समजून भित्री मानून तुला हा अधिक दुःखी करणार नाही पण जयकुमारावर हा आपला खूप प्रभाव पाडील ॥ ३२४ ॥ हा लक्ष्मीसंपन्न जयकुमार जरी प्रख्यात विजयशाली आहे तरीही तू केवळ आगमनाने त्याला जिंकले आहेस म्हणून ह्या ठिकाणी हा जय ( जयकुमार - दुसरा अर्थ विजय ) तुला न्यायानेच प्राप्त झाला आहे ।। ३२५ ॥ तू आपल्या नेत्रशरांनी जिंकलेल्या याला रत्नमालेने गळ्याला बांधून आपल्या हातात घे म्हणजे जयलक्ष्मी तुझीच होईल ।। ३२६ ।। मदनाच्या सन्धिविग्रह आदिक सहा गुणाना जाणणाऱ्या कंचुकीचे ते भाषण ऐकून हळु हळु जिची लज्जा कमी होत आहे, जी चंचल व खेळकर दृष्टीने पाहत आहे व जिच्या ठिकाणी पूर्वजन्माचा स्नेह उत्पन्न झाला आहे, जिच्यापुढे जयकुमाराची डोळ्याला सुन्दर वाटणारी मूर्ति उभी आहे. तिने त्याचे कुन्दपुष्पाप्रमाणे शुभ्र गुण ऐकले होते व कामदेव या सर्वानी तिला रथातून खाली उतरविले व तिने कंचुकीच्या हातातून सुन्दर रत्नमाला घेतली Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy