________________
२४)
महापुराण
(२५-११९
सर्वादिः सर्ववृक्सार्वः सर्वज्ञः सर्वदर्शनः । सर्वात्मा सर्वलोकेशः सर्ववित् सर्वलोकजित् ॥११९ सुगतिः सुश्रुतः सुश्रुत् सुवाकसूरिबहुश्रुतः । विश्रुतो विश्वतः पादो विश्वशीर्षः शुचिश्रवाः ॥ १२०
प्रभु होते ॥ ७० ॥ अभव- ज्यांना संसार नाही असे प्रभु-याच जन्मात मुक्त होणार असल्यामुळे ते अभव या सार्थ नांवाने शोभत होते ॥ ७१ ।। स्वयम्प्रभु- भगवान् स्वतःच प्रभु समर्थ आहेत. कोणाच्या साहाय्याने त्यांना प्रभुत्व आले नाही ॥ ७२ ।। प्रभूतात्मा-हे प्रभो, आपला आत्मा सिद्धस्वरूपाला प्राप्त झाला आहे. हे प्रभु भावीकालात सिद्ध होणार असल्यामुळे उपचाराने सिद्ध झाले असे म्हटले आहे ॥ ७३ ।। भूतनाथ- भूत- सर्व प्राण्यांचे जिनेश्वर नाथ आहेत. म्हणून त्यांना भूतनाथ म्हणता येते व प्रभु देवविशेषांचेही नाथ आहेत. अथवा भूत--होऊन गेलेल्या प्राण्यांचे प्रभु स्वामी आहेत व उपलक्षणाने वर्तमानकालीन व भविष्यकालीनांचेही ते स्वामी आहेत ॥ ७४ ॥ जगत्प्रभु- जगाचे म्हणजे त्रैलोक्याचेही जिनेश्वर प्रभु स्वामी आहेत ॥ ७५ ॥
सर्वादि- सर्व जगाची उत्पत्ति होण्याला आदिकारण भगवान् असल्यामुळे ते सर्वादि आहेत ।। ७६ ।। सर्वदृक्- सर्व प्रमाणांनी सर्व पदार्थांना पाहणारे असल्यामुळे ते सर्वदृक् आहेत ॥ ७७ ।। सार्व- एकेन्द्रियापासून पंचेन्द्रियापर्यंत सर्व मिथ्यादृष्टि, सम्यग्दृष्टि आदिक प्राण्यांचे हित करणारे भगवान् सार्व आहेत. सर्व प्राणिवर्गाला हिताचा उपदेश करीत असल्यामुळे सार्व होत ।। ७८ ॥ सर्वज्ञ- सर्व त्रैलोक्यातील व भूत-भविष्यत्-वर्तमानकालातील द्रव्य पर्यायांनीसहित अनन्तानन्त वस्तूना व अलोकाकाशाला प्रभु जाणतात म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात ॥ ७९ ॥ सर्वदर्शन- सर्व- संपूर्ण दर्शन क्षायिकसम्यक्त्व प्रभुंना असल्यामुळे ते सर्वदर्शन आहेत किंवा जी जगात सर्वदर्शने--सर्वमते आहेत त्या सर्वांचा स्याद्वादाने समन्वय करणारे प्रभु सर्वदर्शन होत ।। ८० ।। सर्वात्मा- सर्व अतति जानाति इति सर्व पदार्थांना जाणतात. म्हणून प्रभु सर्वात्मा अथवा सर्व प्राणिसमूहाला समान पाहतात म्हणून सर्वात्मा. ॥ ८१॥ सर्वलोकेश- सर्वलोकात-त्रैलोक्यात असलेल्या प्राण्यांचे प्रभु ईश स्वामी आहेत ।। ८२॥ सर्ववित्- सर्व वस्तूंना जाणतात ते सर्ववित् आहेत ।। ८३ ॥ सर्वलोकजित्- सर्व लोकांना अर्थात् पाच प्रकारच्या संसारपरिभ्रमणांना जिंकल्यामुळे प्रभु सर्वलोकजित् आहेत ।। ४४ ॥
सुगति: - उत्तम गति जिला मुक्ति म्हणतात, जिला पाचवीगति असे नांव आहे तिचे प्रभु आदीश्वर स्वामी आहेत ।। ८५ ।। सुश्रुत- उत्तम निर्दोष अबाधित जीवादि पदार्थस्वरूप प्रतिपादन करणारे शास्त्र प्रभूनी रचले आहे. म्हणून ते सुश्रुत होत. अथवा प्रभु जगात अतिशय विख्यात आहेत. म्हणूनही त्यांना सुश्रुत म्हणतात ।। ८६ ।। सुश्रुत्- सुंदरश्रवण-ऐकणे ज्यांचे आहे अर्थात् सर्व जीवांच्या प्रार्थना जे ऐकतात असे प्रभु सुश्रुत आहेत ॥ ८७ ॥ सुवाक्स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि सात प्रकारांनी गुणद्रव्य पर्यायांचे वर्णन करणारी अशी निर्दोष भाषा बोलणारे प्रभु सुवाक् या नांवाला धारण करतात ।। ८८ ।। सूरि- ज्यांच्यापासून आत्महित करणारी बुद्धि-ज्ञान उत्पन्न होते असे प्रभु सूरि मानले जातात ।। ८९ ॥ बहुश्रुत
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org