________________
२५-११८)
महापुराण
हिरण्यनाभिर्भूतात्मा भूतभृद्भूतभावनः । प्रभवो विभवो भास्वान्भवो भावो भवान्तकः ॥ ११७ हिरण्यगर्भः श्रीगर्भः प्रभूतविभवोऽभवः । स्वयम्प्रभुः प्रभूतात्मा भूतनाथो जगत्पतिः ॥ ११८
शत्रु नाश करण्यास ज्यांचे शस्त्र आहे असे प्रभु वृषायुध नांवाने संबोधले जातात ॥ ५२ ।। वृष- प्रभुंनी धर्मामृताची वृष्टि केली म्हणून ते वृष म्हटले गेले ॥ ५३ ॥ वृषपति- भगवान् अहिंसाधर्माचे अधिपति स्वामी आहेत ॥ ५४ ॥ भर्ता- भव्यजनांना जो उत्तमस्थानी- स्वर्ग, मोक्ष अशा उत्तमस्थानी ठेवतो व केवलज्ञानादिगुणांनी त्यांना पुष्ट करतो, पोसतो अशा आदिजिनाला भर्ता म्हणतात ॥ ५५ ॥ वृषभाङ्क- बैल हे लाञ्छन-ओळखण्याचे चिन्ह ज्यांना ते प्रभु वृषभाङ्क होत ।। ५६ ।। वृषोद्भव- वृष म्हणजे पुण्य त्याची उद्भव-उत्पत्ति ज्यांच्यापासून होते अशा प्रभूना वृषोद्भव म्हणतात. अथवा वृषभदर्शनाने ज्यांचा जन्म झाला त्या प्रभूना वृषोद्भव म्हणतात. आदिभगवंतांच्या मातेला-मरुदेवीला शेवटी बैलाचे स्वप्न पडले व भगवान् मातेच्या गर्भात आले ॥ ५७ ॥
हिरण्यनाभि- सुवर्णाप्रमाणे सुंदर नाभि-बेम्बी आपली आहे म्हणून हे प्रभो, आपणास हिरण्यनाभि असे विद्वान् म्हणतात ॥ ५८ ॥ भूतात्मा- सत्य असे लोकालोकाचे स्वरूप जाणणारा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु भूतात्मा होत अथवा भूत सर्व प्राण्यांना जाणणारा आत्मा असे प्रभु आहेत ।। ५९॥ भूतभृद्- भूत-प्राणी व देव विशेष यांचे पालन करणारा ॥ ६०॥ भूतभावन- सत्य असे चिन्तन करणारा किंवा दर्शनविशुद्धयादि सोळा भावनांचे चिन्तन ज्यांनी केले अशा प्रभूना भूतभावन म्हणतात ॥ ६१ ।। प्रभव- ज्याच्यापासून इक्ष्वाक्वादि वंशांची उत्पत्ति झाली आहे. अथवा प्रभव-उत्कृष्ट भव जन्म ज्यांचा आहे असे ।। ६२ ॥ विभव- ज्यांचा भवसंसार विनष्ट झाला आहे असे प्रभु विभव होत अथवा विशिष्ट भव, जन्म ज्यांचा आहे असे ।। ६३ ॥ भास्वान्- भा-केवलज्ञानरूपी दीप्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे ।। ६४ ॥ भव-- भव्य प्रण्यांच्या हृदयात प्रभु नेहमी राहतात. म्हणून ते भव होत ॥६५।। भाव- जे महामुनीच्याही मनात राहतात अशा प्रभुंना भाव म्हणतात ।। ६६॥ भवान्तक- भक्तांच्या संसाराचा नाश करणारे असल्यामुळे प्रभु भवान्तक आहेत ॥ ६७ ।।
हिरण्यगर्भ- प्रभु जेव्हां मातेच्या गर्भात होते तेव्हां देवांनी नऊ महिनेपर्यंत मातेच्या अंगणात सुवर्णरत्नाची वृष्टि केली. म्हणून हिरण्यगर्भ हे नांव सार्थ होय. तसेच गर्भात येण्याच्या आधीपासूनही देव रत्नवृष्टि करीत होते. अथवा हि- निश्चयाने रण्यो- रण करण्यास साधुउत्तम आहे गर्भ ज्याचा असे प्रभु होते. भगवंताचा पिता जेव्हां भगवान् गर्भात होते तेव्हां त्याच्याशी कोणीही राजा लढू शकला नाही. म्हणून हिरण्यगर्भ या अन्वर्थ नांवाचे भगवान् होते ।। ६८ ॥ श्रीगर्भ- श्री शब्दाने श्री- ह्री, धृति, कीर्ति, बुद्धि, लक्ष्मी, शान्ति आणि पुष्टि या दिक्कुमारी देवतांचे ग्रहण होते. प्रभु मातेच्या गर्भात आले तेव्हांपासून या देवतांनी मातेची सेवा केली. म्हणून श्रीआदिक देवींनी गर्भात आलेले जिन भक्तीने सेविले गेले यास्तव या जिनप्रभूचे श्रीगर्भ हे नांव प्रसिद्ध झाले ।। ६९ ॥ प्रभूतविभव- ज्यांचे वैभव फार मोठे आहे असे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org