SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 229
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (३२-१३० स्वभुक्तिक्षेत्रसीमानं सोऽभिनन्द्य हिमाचलम् । प्रत्यावृत्तत्प्रभुर्द्रष्टुं वृषभाद्रिं कुतूहलात् ॥ १३० यो योजनशतोच्छ्रायो मूले तावच्च विस्तृतः । तदर्धविस्तृतिर्मूनि भुवो मौलिरिवोद्गतः ॥ १३१ यस्योत्सङ्गभुवो रम्याः कदलीषण्डमण्डितैः । सम्भोगाय नभोगानां कल्पन्ते स्म लतालयैः ॥ १३२ सनागम सनागैश्च सपुन्नागैः परिष्कृतम् । यदुपान्तवनं सेव्यं मुच्यते जातु नामरैः ॥ १३३ स्वतटस्फाटिकोत्सर्पत्प्रभादिग्धहरिन्मुखम् । शरदभ्रंरिवारब्धवपुषं सनभोजुषम् ॥ १३४ तं शैलं भुवनस्यैकं ललामेव निरूपयन् । कलयामास लक्ष्मीवान्स्वयशःप्रतिमानकम् ॥ १३५ तमेकपाण्डुरं शैलमाकल्पान्तमनश्वरम् । स्वयशोराशिनीकाशं पश्यन्नभिननन्द सः ॥ १३६ सोऽचलः प्रभुमायान्तं मायान्तमखिलद्विषाम् । प्रत्यग्रहीदिवाभ्येत्य विष्वद्रयग्भिर्वनानिलः ॥ १३७ तत्तटोपान्तविश्रान्तखचरोरग किन्नरः । प्रोद्गीयमानममलं शुश्रुवे स्वयशोऽमुना ।। १३८ २१८) महापुराण आपल्या भोग्यप्रदेशाची सीमा असलेल्या हिमवान् पर्वताची प्रशंसा करून यानंतर वृषभाचल पर्वतास पाहण्याकरिता कौतुकाने भरतराजा परत निघाला ।। १३० ।। जो पर्वत शंभर योजने उंच व मूळभागीही तेवढाच विस्तृत आहे आणि मस्तकावर अर्ध्या विस्ताराचा म्हणजे पन्नास योजने विस्तृत आहे व वरचा भाग पृथ्वीचे जणु मस्तक असा उंच गेलेला आहे ।। १३१ ॥ ज्याच्या तटावरील रमणीय प्रदेश केळीच्या वनानी शोभत होता व तेथील लतागृहे विद्याधराना उपभोगासाठी क्रीडा करण्यासाठी योग्य होते ।। १३२ ॥ नाग नांवाच्या वृक्षानी युक्त, पुन्नागवृक्ष व असाणावृक्ष यानी शोभत असलेले व उपभोगण्यास योग्य असे ज्या पर्वताच्या जवळचे वन देवाकडून केव्हाही सोडले जात नाही हे वन नेहमी देवाकडून सेविले जाते ॥ १३३ ॥ आपल्या तटावरील स्फटिकमण्याच्यावर पसरणाऱ्या कान्तीनी ज्याने दिशांची मुखे लिप्त केली आहेत, शुत्र केली आहेत, असा शरत्कालच्या शुभ्र मेघानी जणु ज्याचे शरीर बनले आहे व जो देव विद्याधरानी युक्त आहे, जणु जगाचा एक अलंकार की काय, असा तो पर्वत भरतेशाने पाहिला. लक्ष्मीसंपन्न अशा त्या चक्रीने आपल्या यशाचे जणु प्रतिबिंब आहे असे मानिले ।। १३४ -१३५ ।। तो पर्वत अगदी स्वच्छ पांढरा होता. कल्पान्तकालापर्यन्त नष्ट न होणारा व आपल्या यशः समूहासारखा भासणारा अशा त्याला पाहून भरत आनंदित झाला ।। १३६ । सर्व शत्रूंच्या कपटाचा नाश करणारा प्रभु भरत आपल्याकडे येत आहे असे जाणून जणु तो पर्वत चोहीकडे पसरणाऱ्या अशा वायूनी त्याच्याजवळ जाऊन त्याचा सत्कार करीत आहे काय असा भासला ।। १३७ ॥ त्यांच्या तटाजवळ विश्रान्ति घेत असलेले जे विद्याधर, नागदेव व किन्नर यांच्याकडून गायिले जाणारे आपले निर्मलयश या भरताने ऐकिले ।। १३८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy