________________
६५६)
महापुराण
लोलस्यान्वर्थसञ्ज्ञस्य विलापं देशनिर्गमे । द्यूते सागरदत्तेन प्रभूते निर्जिते धने ॥ २७८ दातुं समुद्रदत्तस्य निःशक्तेरातपे क्रुधा । परिवद्धित दुर्गन्ध घूमान्तर्वर्तिन श्श्चिरम् ॥ २७९ निरोधमभयोद्धोषणायामानन्ददेशनात् । अङ्गकस्य नृपोरभ्रघातिनः करखण्डनम् ॥ २८० आनन्दराजपुत्रस्य तद्भुक्त्यावस्कराशनम् । मद्यविक्रयणे बालं कञ्चिदाभरेणच्छया ।। २८१ हत्वा भूमौ विनिक्षिप्तवत्यास्तत्संविधानकम् । प्रकाशितवति स्वात्मजे शुण्डायाश्च निग्रहम् ॥२८२ पापान्येतानि कर्माणि पश्यहिंसादिदोषतः । अत्रामुत्र च पापस्य परिपाकं दुरुत्तरम् ॥ २८३ अवधार्यानभिप्रेतव्रतत्यागोद्भवाद्भयात् । रोषमोषमृषायोषा हिंसाश्लेषादिदूषिताः ॥ २८४ नात्रैव किन्त्वमुत्रापि ततश्चित्रवधोचिताः । अस्माकमपि दौर्गत्यं प्राक्तनात्पापकर्मणः ॥ २८५ इदं तस्मात्समुच्चेयं पुण्यं सच्चेष्ठितैः पुरु । इति तं मोचयित्वाग्रहीषं दीक्षां मुमुक्षया ॥ २८६ सद्यो गुरुप्रसादेन सर्वशास्त्राब्धिपारगः । विशुद्धमतिरन्येद्युः समीपे सर्ववेदिनः || २८७ मदुष्टपूर्वजन्मानि समश्रौषं यथाश्रुतम् । कथायिष्याम्यहं तानि कर्तुं वा कौतुकं महत् ॥ २८८
(४६-२७८
यानन्तर पुढे जात असता जे दृश्य दिसले ते हे- जुगारात सागरदत्ताने पुष्कळसे धन जिंकले व ते देण्यास असमर्थं झालेल्या समुद्रदत्ताला उन्हात पुष्कळ दुर्गन्ध घूर जेथे वाढलेला आहे अशा ठिकाणी दीर्घकालपर्यन्त कोंडून ठेवणे व आनंद राजाने अभयाची घोषणा केली असताही त्याला न सोडणे हे पाहिले ।। २७८-२७९ ।।
यानन्तर अङ्गकनक मनुष्याने राजाचा मेंढा मारला म्हणून त्याचा हात तोडला व आनन्दराजाच्या पुत्राने तो मेंढा खाल्ला म्हणून त्याला विष्ठा खावयास लावणे ।। २८० ।।
मद्य विकत घेण्याकरिता दागिन्याच्या इच्छेने कोण्या एका मुलाला मारून जमिनीमध्ये तिने पुरून टाकले व ते तिचे कृत्य तिच्या मुलाने जेव्हा प्रकट केले तेव्हा त्या मद्य पिणा-या स्त्रीला पकडले व तिला शिक्षा केली हे दृश्य पिता-पुत्रानी पाहिले ॥ २८१-२८२ ।।
हिंसादि दोषामुळे ही कार्ये पापरूप आहेत आणि इह परलोकी पापाचा उदय अतिशय दुःखदायक असतो. संसारापासून उत्पन्न होणाऱ्या भयामुळे मी व्रताचा त्याग इच्छिला नाही. क्रोध, चोरी, खोटे भाषण, परस्त्रीसेवन व हिंसा यांच्या आलिंगनानी लोक दूषित झाले आहेत. अशाना अवयव तोडणे, बंधन इत्यादिक दुःखे येथेच भोगावी लागतात असे नाही तर परलोकी नरकादिगतीमध्येही नाना प्रकारच्या वधादिक दुःखाना ते योग्य होतात असा मी निश्चय केला आणि आम्हाला देखील पूर्वजन्माच्या पाप कर्मामुळे दारिद्र्य प्राप्त झाले आहे म्हणून चांगल्या शुभाचरणानी मोठे पुण्य सम्पादन केले पाहिजे असा विचार करून मी पित्यापासून माझी सोडवणूक करून घेतली आणि मोक्षाच्या इच्छेने मी जिनदीक्षा घेतली ।। २८३-२८६ ॥
Jain Education International
तत्काल गुरूची कृपा झाल्यामुळे मी संपूर्ण शास्त्ररूपी समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचलो आहे आणि माझी बुद्धि निर्मळ झाली आहे. यानंतर एके दिवशी सर्वज्ञ केवलीच्या जवळ गेलो व त्यांच्यापासून मी दुष्ट अशा माझ्या पूर्वजन्माचे वर्णन ऐकले. मी ते माझ्या जन्माचे वर्णन जसे ऐकले तसे आपल्याला कौतुक वाटावे म्हणून सांगणार आहे ।। २८७ - २८८ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org