SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 710
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७-३५०) महापुराण (६९९ शरीरत्रितयापाये प्राप्य सिद्धस्वपर्ययम् । निजाष्टगुणसम्पूर्णः क्षणाप्ततनुवातकः ॥ ३४१। नित्यो निरञ्जनः किञ्चिदूनो देहादमूर्तिभाक् । स्थितः स्वसुखसाद्भूतः पश्यन्विश्वमनारतम् ॥३४२ तवागत्य सुराः सर्वे प्रान्तपूजाचिकीर्षया । पवित्रं परमं मोक्षसाधनं शुचि निर्मलम् ॥ ३४३ शरीरं भर्तुरस्येति परायशिविकार्पितम् । अग्नीन्द्ररत्नभाभासिप्रोत्तुङगमुकुटोद्भुवा ॥ ३४४ चन्दनागुरुकर्पूरपारीकाश्मीरजादिभिः । धृतक्षीरादिभिश्चाप्तवृद्धिना हुतभोजिना ॥ ३४५ जगद्गृहस्य सौगन्ध्यं सम्पाद्याभूतपूर्वकम् । तदाकारोपमर्देन पर्यायान्तरमानयन् ॥ ३४६ अभ्यचिताग्निकुण्डस्य गन्धपुष्पादिभिस्तथा । तस्य दक्षिणभागेऽभूद्गणभत्संस्क्रियानलः ॥ ३४७ तस्यापरस्मिन्दिग्भागे शेषकेवलिकायगः । एवं वह्नित्रयं भूमाववस्थाप्यामरेश्वराः ॥ ३४८ ततो भस्म समादाय पञ्चकल्याणभागिनः । वयं चैवं भवामेति स्वललाटे भुजद्वये ॥ ३४९ कण्ठे हृदयदेशे च तेन संस्पृश्य भक्तितः । तत्पवित्रतमं मत्वा धर्मरागरसाहिताः ॥ ३५० या ध्यानाच्या प्रभावाने औदारिक, तैजस व कार्मण या तीन शरीरांचा नाश झाला व प्रभूला सिद्धपर्याय प्राप्त झाला. त्याना अनन्तज्ञानादि आठ पूर्ण सिद्धपर्यायाची प्राप्ति झाली व ते तत्काळ तनुवातवलयात पोचले- ते प्रभु नित्य, कर्ममलरहित, पूर्वदेहापेक्षा थोडेसे कमी आकाराचे अमर्त अशा स्वरूपाचे बनले व सगळ्या जगाला सतत पाहणारे व आत्मसुखात पूर्ण गढून गेले ।। ३४१-३४२ ॥ त्यावेळी आदि भगवंताच्या मोक्षकल्याणाची पूजा करण्याच्या इच्छेने सर्वदेव आले. भगवंताचे शरीर अतिशय पवित्र व मोक्षप्राप्तीचे अतिशय निर्मल शुद्ध साधन आहे असे मानून अतिशय उत्कृष्ट पालखीत ठेविले. यानंतर चंदन, अगरु, कापराच्या वड्या आणि केशर वगैरे सुगंधितवस्तूंनी व तूप, दूध वगैरेनी ज्याला वाढविले आहे, अग्निकुमार इन्द्रांच्या रत्नकान्तीनी चमकणा-या उंच मुकुटातून जो उत्पन्न झाला आहे अशा अग्नीच्या द्वारे जगतरूपी घराला अभूतपूर्व अशा सुगन्धाने सुगंधित करून प्रभूच्या शरीराचा पूर्वीचा आकार नाहीसा करून दुसरा पर्याय देवानी केला अर्थात् त्या शरीराला त्यानी भस्मरूप केले ॥ ३४३-३४६ ॥ गन्ध, पुष्प आदिकांनी ज्याची पूजा केली आहे अशा त्या अग्निकुण्डाच्या दक्षिणभागी गणधरांच्या शरीरावर संस्कार करण्याचा अग्नि होता व त्याच्या डाव्या बाजूला सामान्यकेवलीच्या शरीरावर संस्कार करण्याचा अग्नि होता. याप्रमाणे इन्द्रानी या तीन अग्नींची स्थापना केली होती॥ ३४७-३४८ ॥ आम्हीही प्रभूप्रमाणे पंचकल्याण प्राप्त करून घेणारे होऊ अशा अभिप्रायाने त्या कुण्डातून त्यानी- इन्द्रादिदेवानी भस्म घेतले व ते त्यानी आपल्या कपाळावर, दोन बाहूवर, गळयावर व हृदयावर भक्तीने लाविले. ते भस्म त्यानी अतिशय पवित्र मानले आणि एकत्र जमून त्यानी आनन्दनृत्य केले ॥ ३४९-३५० ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy