SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 309
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २९८) महापुराण (३५-१२६ कृतचक्रपरिभ्रान्तिदण्डेनायतिशालिना । घटयन्पार्थिवानेष स कुलालायते बत ॥ १२६ आग:परागमातन्वन् स्वयमेष कलङ्कितः। चिरं कलङ्कयत्येष कुलं कुलभतामपि ॥ १२७ नृपानाकर्षतो दूरान्मन्त्रैस्तन्त्रैश्च योजितः । श्लाघ्यते कियदेतस्य पौरुषं लज्जया विना ॥ १२८ दुनोति नो भूशं दूत श्लाघ्यतेऽस्य यदाहवः । दोलायितं जले यस्य बलं म्लेच्छबलस्तदा ॥ १२९ यशोधनमसंहायं क्षत्रपुत्रेण रक्ष्यताम् । निखनन्तो निधीन्भूमौ बहवो निधनं गताः ॥ १३० रत्नः किमस्ति वा कृत्यं यान्यरनिमिता भुवम् । न यान्ति यत्कृते यान्ति केवलं निधनं नपाः॥. तुलापुरुष एवायं यो नाम निखिलैर्नृपः । तुलितो रत्नपुजेन बत नैश्वर्यमीदृशम् ॥ १३२ ध्रुवं स्वगुरुणा दत्तामाच्छिचित्सति नो भुवम् । प्रत्याख्येयत्वमुत्सृज्य गृध्नोरस्य किमौषधम् ॥१३३ दूत तातवितीर्णा नो महीमेनां कुलोचिताम् । भ्रातृजायामिवादित्सो स्य लज्जा भवत्पतेः ॥ १३४ __ लांब अशा दंडरत्नाच्याद्वारे चक्ररत्नास फिरविणारा व सर्व राजेलोकांना एकत्र करणारा हा भरत काठीने चाक फिरवून मातीची भांडी तयार करणाऱ्या कुंभाराप्रमाणे भासत आहे हे फार निन्द्य आहे ॥ १२६ ॥ पातकांच्या रेणूना चोहीकडे पसरणारा हा राजा स्वतः पातकी आहे व हा कुलीनाच्या कुलानाही दीर्घकालपर्यन्त कलङकित करीत आहे ॥ १२७ ।। आपण योजलेल्या मन्त्र आणि तन्त्राच्याद्वारे दूरून ओढून आणणाऱ्या या भरताचा पराक्रम तुला लाज नसल्याने तुझ्याकडून किती बरे वर्णिला जात आहे ॥ १२८ ।। हे दूता ज्यावेळी या भरताच्या युद्धाची स्तुति करतोस त्यावेळी आमचे मन फार दुःखी होते. कारण म्लेच्छांच्या सैन्यानी या भरताचे सैन्य पाण्यात झोपाळ्याप्रमाणे हालविले होते म्हणून भरताच्या युद्धाची स्तुति करणे बिलकुल योग्य नाहीं ॥ १२९ ।। क्षत्रियांच्या पुत्रानी दुसऱ्याकडन नेले जाण्यास जे शक्य नाही असे यशोधन अवश्य रक्षावे. यापृथ्वीवर निधीना उकरून काढणारे अनेक लोक मरण पावले आहेत ॥ १३० ॥ ज्यांच्यासाठी राजे मात्र मरण पावतात व जी मरणोत्तर हातभर जमिनीपर्यन्त देखिल येत नाहीत अशा त्या रत्नानी काय कार्यसिद्धि होते बरे ? ॥ १३१ ॥ सर्व राजानी रत्नराशीच्या योगाने ज्याचे वजन केले तो हा भरतराजा खरोखर तुलापुरुषच होय. पण मला खेद वाटतो की ऐश्वर्य अशा त-हेचे नसते ॥ १३२ ॥ आमच्या पित्याने आम्हास दिलेली पृथ्वी जो भरत हिसकावून घेण्याची इच्छा करीत आहे. त्या अत्यंत लोभी भरताचा तिरस्कार करणे सोडून दुसरे कोणते औषध आहे बरे ? ॥ १३३ ॥ हे दूता, आम्हाला पित्याने दिलेली व आमच्या कुलाला योग्य असलेली अशी जी भूमि तिला भावाच्या स्त्रियेप्रमाणे आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा करणाऱ्या तुझ्या राजाला लाज कशी वाटत नाही ? ॥ १३४ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy