SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 310
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३५-१४२) महापुराण (२९९ देयमन्यत्स्वतन्त्रेण यथाकामं जिगीषुणा । मुक्त्वा कुलकलत्रं च मातलं च भुजाजितम् ॥ १३५ भूयस्तवलमालप्य स वा भुक्तां महीतलम् । चिरमेकातपत्राङ्कमहं वा भुजविक्रमी ॥ १३६ कृतं वृथा भटालापैरर्थसिद्धिबहिष्कृतः । सग्रामनिकषे व्यक्तिः पौरुषस्य ममास्य च ॥ १३७ ततः समरसङ्घट्टे यद्वा तद्वास्तु नौ द्वयोः । नीरेकमिदमेकं नो वचो हर वचोहर ॥ १३८ इत्याविष्कृतमानेन कुमारेण वचोहरः । व्रतं विजितो गच्छ पति संन्नाहयेत्यरम् ॥ १३९ तवा मुकुटसङ्घट्टादुच्छलन्मणिकोटिभिः । कृतोल्मुकशतक्षेपरिवोत्तस्थे महेशिभिः ॥ १४० क्षणं समरसङ्घट्टपिशुनो भटसङ्कटे । श्रूयते स्म भटालापो बले भुजबलोशितुः ॥ १४१ चिरात्समरसंमः स्वामिनोऽयमभूविह । किं वयं स्वामिसत्कारादनृणीभवितुं क्षमाः ॥ १४२ .......................................... स्वतंत्र असलेल्या आणि शत्रूना जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मनुष्याने आपली कुलीन स्त्री आणि आपल्या बाहूनी मिळविलेली पृथ्वी सोडून दुसरी कोणतीही वस्तु कोणासही खुशाल द्यावी ॥१३५॥ आता तेच ते सांगणे मी पुरे करतो. एक छत्राचे चिह्न ज्याला आहे असे हे भूतल तो भरतराजा एकटाच उपभोगी किंवा ज्याच्या बाहूत सामर्थ्य आहे असा मी तरी एकटाच उपभोगीन ।। १३६ ॥ हे दूता कार्यसिद्धीस साधक नसलेल्या या शौर्याच्या व्यर्थ भाषणांचा काही उपयोग नाही. आता युद्धाच्या कसोटीवर त्याच्या आणि माझ्या पराक्रमाची स्पष्टता होईलच ॥१३७।। __आता या युद्धाच्या गर्दीत आम्हा दोघांचे काय व्हावयाचे असेल ते होवो. हे दूता आमचे निःसंशय भाषण तू तुझ्या मालकाला कळव ॥ १३८ ॥ याप्रमाणे ज्याने आपला अभिमान प्रकट केलेला आहे अशा कुमाराने हे दूता, आता जा आणि तुझ्या मालकाला युद्धासाठी लौकर तयार कर असे म्हणून त्याने दूताला शीघ्र पाठवून दिले ।। १३९ ॥ त्यावेळी एकमेकांच्या किरीटांच्या घर्षणाने वर उसळलेल्या रत्नांच्या अग्र कान्तींनी ज्यानी शेकडो कोलत्या जणु वर फेकल्या आहेत असे ते राजे आपआपल्या आसनावरून उठले ॥ १४० ॥ यानंतर काही कालपर्यन्त बाहुबलिराजाच्या अनेक शूर योद्ध्यांनी भरलेल्या सैन्यात आता युद्ध लौकरच सुरू होणार आहे याची सूचना देणारे योद्धयांचे भाषण ऐकू येऊ लागले ॥ १४१ ॥ या ठिकाणी आमच्या स्वामीला-राजाला फार वर्षानी हा युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला आहे. आमच्या मालकाने आजपर्यन्त आमचे पालनपोषण करून जो सत्कार केला आहे त्याचे ऋण फेडण्यास आम्ही समर्थ आहोत काय ॥ १४२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy