________________
३००)
महापुराण
(३५-१४३
पोषयन्ति महीपाला भृत्यानवसरं प्रति । न चेदवसरः सार्यः किमेभिस्तृणमानुषः ॥ १४३ कलेवरमिदं त्याज्यमर्जनीयं यशोधनम् । जयश्रीविजये लभ्या नाल्पोदर्को रणोत्सवः ॥ १४४ मन्दातपशरच्छाये प्रत्यङ्गवणजर्जरैः। लप्स्यामहे कदा नाम विश्रामं रणमण्डपे ॥ १४५ प्रत्यनीककृतानीकव्यूहं निभिद्य सायकैः । शरशय्यामसंबाधमध्याशिष्ये कवान्वहम् ॥ १४६ कर्णतालानिलाधूतिविधूतसमरश्रमः । गजस्कन्धे निषीदामि कदाहं क्षणमूच्छितः ॥ १४७ दन्तिदन्तार्गलप्रोताद्गलदस्त्रः स्खलद्वचाः । जयलक्ष्मीकटाक्षाणां कदाहं लक्ष्यतां भजे ॥ १४८ गजवन्तान्तरालम्बिस्वान्त्रमालावरत्रया । कहि दोलामिवारोप्य तुलयामि जयश्रियम् ॥ १४९ ब्रुवाणैरिति सजग्रामरसिकरुद्भटभटेः । शस्त्राणि सशिरस्त्राणि सज्जान्यासन्यले बले ॥ १५०
राजे हे काही विशेषप्रसंगाच्या उद्देशाने सेवकांचे पालनपोषण करीत असतात. त्याप्रसंगी जर आम्ही उपयोगी पडलों नाही तर गवताने बनविलेल्या मनुष्याप्रमाणे आमचा काय उपयोग आहे ? ॥ १४३ ॥
हे शरीर त्याज्य आहे. अर्थात् शरीराचा त्याग करून मनुष्याने यशरूपी धन मिळविले पाहिजे. शत्रूला जिंकून विजयलक्ष्मी मिळविली पाहिजे. हा रणोत्सव वीराना अल्पफल देणारा नाही. अर्थात् यापासून महाफलाची प्राप्ति होते ॥ १४४ ।।
युद्धामध्ये शरीराचा प्रत्येक अवयव व्रणांनी अतिशय भरून गेल्यामुळे ज्यात मंद उन्हाने बाणांची सावली पडली आहे अशा युद्धमण्डपात आम्हाला केव्हा बरे विश्रान्ति मिळेल ?॥ १४५ ।।
कोणी वीर असे भाषण करीत आहे- युद्धामध्ये शत्रूनी रचलेल्या सैन्याच्या व्यूहाला बाणानी भेदून मी ज्यात कोणतीही पीडा नाही अशा बाणांच्या शय्येवर केव्हा बरे झोपेन ॥१४६।।
दुसरा एक वीर असे म्हणतो- हत्तीचे कान हेच ताडाचे पंखे त्यांच्या वाऱ्याच्या वाहण्याने ज्याचे युद्धातील श्रम नाहीसे झाले आहेत असा मी क्षणपर्यन्त मूच्छित होऊन हत्तीच्या खांद्यावर केव्हा बरे मी बसेन ।। १४७ ।।
हत्तीच्या दातरूपी अर्गळीवर अडकल्यामुळे ज्यांच्यातून रक्त वाहत आहे व ज्याच्या तोंडातून अडखळत अडखळत शब्द बाहेर पडत आहेत असा मी जयलक्ष्मीच्या कटाक्षांचे लक्ष्य केव्हा बरे होईन ॥ १४८ ॥
हत्तीच्या दोन दातांच्या अन्तरालात लोंबणान्या आतड्याची मजबूत दोरी तिच्या साहायाने जणु झोपाळ्यावर जयलक्ष्मीला बसवून केव्हा बरे मी तिचे वजन करीन असे एक वीर म्हणाला ॥ १४९ ॥
जे युद्धरसिक आहेत असे महान् पराक्रमी भट याप्रमाणे बोलत होते व प्रत्येक सैन्यात त्यावेळी योद्धयानी आपआपली शस्त्रे सज्ज ठेवली आणि ते अंगात कवच घालून सज्ज झाले ॥ १५० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org