________________
३५-१५७)
महापुराण
(३०१
ततः कृतभयं भूयो भटभ्रकुटिजितः । पलायितमिव क्वापि परिच्छित्तिमगावहः ॥ १५१ अथारुष्यद्भटानीकनेत्रच्छायापिता रुचम् । दधान इव तिग्मांशुरासीदारक्तमण्डलः ॥ १५२ क्षणमस्ताचलप्रस्थकाननक्षमाजपल्लवैः । सदगालोहितच्छायो ददृशेऽकांशुसंस्तरः ॥ १५३ करगिर्यनसंलग्नर्भानुरालक्ष्यत क्षणम् । पातभीत्या करालाः करालम्बमिवाश्रयन् ॥ १५४ पतन्तं वारुणीसङ्गात्परिलुप्तविभावसुम् । नालम्बत बतास्ताविर्भानुं बिभ्यदिवैनसः ॥ १५५ गतो न दिनमन्वेष्टुं प्रविष्टो नु रसातलम् । तिरोहितोऽनु शृङ्गारस्ताने क्षि भानुमान् ॥ १५६ विघटय्य तमो नैशं करैराक्रम्य भूभृतः । विवावसाने पर्यास्थवहो रविरनंशुकः ॥ १५७ ।।
यानन्तर वीरानी आपल्या भुवयानी वारंवार केलेल्या तिरस्कारामुळे जणु भिऊन पळून गेला की काय असा तो दिवस समाप्त झाला ॥ १५१ ।।
यानन्तर रागावलेल्या वीरसैन्याच्या डोळ्यांच्या छायेने दिलेल्या कान्तीला जणु धारण करीत आहे असा हा सूर्य त्यावेळी ज्याचे लाल मण्डल झाले आहे असा दिसला।। १५२।।
जेव्हा सूर्य अस्ताचलावर गेला तेव्हा त्याच्या शिखरावरील वनातील वृक्षांच्या कोवळ्या लाल पानासारखा त्याच्या किरणांचा विस्तार दिसू लागला ॥ १५३ ।।
त्यावेळी अस्तपर्वताच्या शिखराला अवलंबिलेल्या आपल्या किरणानी सूर्य क्षणपर्यन्त पडण्याच्या भीतीने आपल्या किरणरूपी हातानी कोणाच्या तरी हाताचा आश्रय घेत आहे असा दिसला ॥ १५४ ॥
वारुणीच्या-दारूचा दुसरा अर्थ पश्चिम दिशेचा आश्रय केल्यामुळे ज्याचे तेजरूपी द्रव्य नष्ट झालेले आहे व जो खाली पडत आहे, अशा सूर्यास तो अस्त पर्वत जणु पापापासून भीत आहे असा झाला व त्याने सूर्याला धारण केले नाही. जसा एखादा मनुष्य दारू पिऊन रस्त्यावर पडतो व त्याच्या तोंडाची कांति लुप्त होते व त्याच्याजवळचे धनही नाहीसे होते व त्या दारुड्याला कोणीही मनुष्य पातकाच्या भीतीने स्पर्श करीत नाही तसे हा सूर्य पश्चिम दिशेच्या आश्रयाने पतन पावतो व त्याची कांति मंद होते. कांतिरूपी धन नष्ट होते व त्यामुळे पश्चिम पर्वताने-अस्तपर्वताने जणु पडत असलेल्या सूर्याला हस्तालंबन देऊन त्याला आश्रय दिला नाही. त्याला पडण्यापासून आवरून धरले नाही ।। १५५ ।।।
त्यावेळी तो सूर्य दिवसाला हुडकण्यासाठी जणु गेला, किंवा पाताळात जणु त्याने प्रवेश केला किंवा अस्तपर्वताच्या शिखरांच्या अग्रभागानी जणु झाकून गेला असा तो सूर्य दिसेनासा झाला ।। १५६ ।।
.. या सूर्याने रात्रीचा अंधार नाहीसा केला व आपल्या करानी-किरणानी सर्व भूभृताना-पर्वताना व्यापले व सर्व भूभृतांना-राजाना जसा एखादा पराक्रमी राजा आपल्या खंडणीच्या द्वारे आक्रमण करतो पण दिवसाच्या शेवटी सूर्य जसा अनंशुक होतो-किरणरहित होतो तसा एखादा पराक्रमी राजा दिवावसानाने आपली सद्दी पुण्य संपले म्हणजे अनंशुक नेसावयाच्या वस्त्रानेही रहित होतो तसा हा सूर्य दिवसाच्या शेवटी किरणरहित होतो॥ १५७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org