SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 198
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३१-४२) महापुराण (१८७ स्वरं जगहुरावासान्सैनिकाः सानुमत्तटे । स्वयं गलत्प्रसूनौघघनशाखिघने वने ॥ ३४ सरस्तीरतरूपान्तलतामण्डपगोचराः । रम्या बभूवुरावासाः सैनिकानामयत्नतः ॥ ३५ वनप्रवेशमुन्मुग्धाः प्राहुर्वैराग्यकारणम् । तत्प्रवेशो यतस्तेषामभवद्रागवृद्धये ॥ ३६ । अथ तत्र कृतावासं ज्ञात्वा सनियमं प्रभुम् । अगान्मागधवद्रष्टुं विजयार्धाधिपः सुरः ॥ ३७ तिरीटशिखरीदनो लम्बप्रालम्बनिर्झरः । स भास्वत्कटको रेजे राजताद्रिरिवापरः ॥ ३८ सितांशुकधरः त्रग्वी हरिचन्दनचचितः । स बभौ धृतरत्ना? निधिः शङ्ख इवोच्छितः ॥ ३९ ससम्भ्रमं समभ्येत्य प्रबतामगमत्प्रभोः । ससत्कारं च तं चक्री भद्रासनमलम्भयत् ॥ ४० गोपायिताहमस्याद्रेमध्यमं कूटमावसन् । स्वैरचारी चिरादद्य स्वयास्मि परवान्विभो ॥ ४१ विद्धि मां विजया ख्यममुं च गिरिभूजितम् । अन्योऽन्यसंश्रयादावामलकघ्यावचलस्थिती ॥४२ त्या पर्वताच्या तटावर जेथे आपोआप गळणाऱ्या पुष्पांच्या समूहांनी युक्त असे दाट वृक्ष आहेत अशा ठिकाणी स्वच्छंदाने सैनिक राहू लागले ॥ ३४ ॥ सरोवराच्या तीरावर असलेल्या वृक्षांचे जवळ लतामण्डप होते व ते आयासावाचून सैनिकांची रम्य निवासस्थाने बनली ॥ ३५ ॥ __वनात प्रवेश करणे हे वैराग्याचे कारण आहे असे मूर्ख लोक म्हणतात. पण त्या वनात भरतप्रभु काही नियम धारण करून बसले आहेत असे जाणून त्याना पाहण्यासाठी विजयार्धपतिदेव मगध देवाप्रमाणे पाहावयास आला. त्यावेळी तो देव जणु दुसरा विजया पर्वत आहे असा शोभला. कारण विजयाध पर्वत शिखरानी उंच आहे व त्याप्रमाणे हा देवही मुकुटरूपी उंच शिखराने युक्त होता. तो पर्वत लांबलचक वाहणाऱ्या झऱ्यानी युक्त होता व हा देवही लांब जें हाराचें तेज ते जणु ज्याचे झरे आहेत असा दिसत होता. विजयापर्वत प्रकाशमान अशा कड्यानी शोभत होता व तो देवही चमकणान्या हातातील कड्याच्या अलंकारानी शोभत होता ।। ३६-३८ ।। ज्याने शुभ्र वस्त्र धारण केले आहे, ज्याने गळयात माला धारण केली आहे, ज्याने आपल्या अंगाला चन्दनाची उटी लाविली आहे व आपल्या हातात ज्याने रत्नांचा अर्घ्य धारण केला आहे, असा तो देव उंच उभा राहिलेल्या शंख नामक निधीप्रमाणे दिसत होता ॥ ३९ ॥ तो देव त्वरेने येऊन या भरतेशाच्या चरणी नम्र झाला. त्यावेळी चक्रवर्तीने त्याचा सत्कार केला आणि त्याला उत्तम आसन बसावयास दिले ॥ ४० ॥ __तो म्हणाला हे प्रभो, मी या पर्वताच्या मध्यम शिखरावर राहत असतो आणि मी याचा रक्षक आहे. मी दीर्घकालापासून स्वतंत्र होतो पण आज मी आपल्या अधीन झालो आहे ॥४१॥ माझे नांव विजयार्द्ध आहे व या उन्नत पर्वताचेही तेच नांव आहे असे आपण समजा व आम्ही दोघे एकमेकांच्या आश्रयाने अलङघ्य आहोत व आम्ही निश्चल स्थितीचे आहोत ॥४२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy