SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 304
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३५-९४) महापुराण (२९३ प्रचण्डदण्ड निर्घातनिपातपरिखण्डितान् । तदाज्ञाखण्डनव्यग्रान्पश्यैतात्मण्डलाधिपान ॥ ८७ तदेत्य द्रुतमायुष्मन् पूरयास्य मनोरथम् । युवयोरस्तु साङगत्यात्सङगतं निखिलं जगत् ॥ ८८ इति तद्वचनस्यान्ते कृतमन्दस्मितो युवा । घोरं वचो गभीरार्थमाचचक्षे विचक्षणः ॥ ८९ साधूक्तं साधुवृत्तत्वं त्वया घटयता प्रभोः । वाचस्पत्यं तदेवेष्टं पोषकं स्वमतस्य यत् ॥ ९० साम दर्शयता नाम भेददण्डौ विशेषतः । प्रयुञानेन साध्येऽर्थे स्वातन्त्र्यं दर्शितं त्वया ॥ ९१ स्वतन्त्रस्य प्रभोः सत्यं स त्वमन्तश्वरश्चरः। अन्यथा कथमेवास्य व्यनक्त्यन्तर्गतं गतम् ॥ ९२ निसृष्टार्थतयास्मासु निर्दिष्टस्त्वं निधीशिना। विशिष्टोऽपि न वैशिष्टयं परमर्मस्पृगीदृशम् ॥ ९३ अयं खलु खलाचारो यबलात्कारदर्शनम् । स्वगुणोत्कीर्तनं दोषोद्भावनं च परेषु यत् ॥ ९४ हे प्रभो, अतिशय भयंकर दण्डरत्नाचा जो वज्राप्रमाणे होणारा आघात त्याने ज्यांचे तुकडे झाले आहेत व भरतराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे व्याकुळ झालेल्या ह्या अनेक माण्डलिक राजाना पाहा ।। ८७ ॥ म्हणून हे राजन्, हे आयुष्यवन्ता, लौकर भरतमहाराजाकडे येऊन त्याचे मनोरथ पूर्ण कर. तुम्हा दोघा भावांच्या मिलापाने सगळ्या जगाची एकी होईल ॥ ८८ ॥ याप्रमाणे त्या दूताने भाषण करून ते जेव्हा संपविले तेव्हा तरुण बाहुबलीने मंद हास्य केले आणि चतुर अशा त्याने ज्याचा अभिप्राय गंभीर खोल आहे, असे प्रौड भाषण याप्रमाणे केले ॥ ८९ ॥ हे दूता, आपल्या मालकाच्या सदाचाराचे समर्थन करणाऱ्या तुजकडून फार उत्तम भाषण केले गेले आहे. जे वक्तृत्व आपल्या मताचे पोषण करणारे असते तेच वक्तृत्व योग्य होय ॥ ९०॥ सलोखा दाखविणाऱ्या हे दूता, तुजकडून भेद व दण्ड देखिल विशेष रीतीने स्पष्टीकरण करून सांगितले गेले आहेत व त्यांचा प्रयोग करीत असताही आपला विषय सिद्ध करण्यात तू किती स्वतंत्र आहेस हे दाखविले आहेस ।। ९१ ॥ स्वतंत्र अशा मालकाच्या अन्तःकरणात शिरलेला असा तू दूत आहेस. तसा जर तू नसतास तर तुला त्याच्या मनातला अभिप्राय कसा बरे स्पष्ट करता आला असता ॥ ९२ ॥ हे दूता तू पुष्कळ कार्ये पूर्वी पार पाडली आहेत म्हणून आमच्याविषयीही तुलाच चक्रवर्तीने आज्ञा केली आहे. तू श्रेष्ठ आहेस. पण या प्रकाराने दुसऱ्याच्या मर्माचे छेदन करणे हे चातुर्याचे कार्य नाही यात तुझा विशिष्टपणा आढळून येत नाही ।। ९३ ॥ बलात्काराचे जे प्रकाशन करणे ते खरोखर दुष्टांचा आचार आहे. आपल्या गुणांचे वर्णन करणे व दुसन्याच्या ठिकाणी दोष दाखविणे हाही दुष्टाचारच आहे ॥ ९४ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy