________________
२९४)
महापुराण
(३५-९५
विवृणोति खलोऽन्येषां दोषान्स्वांश्च गुणान् स्वयम् ॥
संवृणोति च दोषान्स्वान् । परकीयान्गणानपि ॥ ९५ अनिराकृतसन्तापां सुमनोभिः समुज्झिताम् । फलहीनां श्रयन्त्यज्ञाः खलतां खलतामिव ॥ ९६ सतामसम्मतां विष्वगाचितां विरसैः फलैः । मन्ये दुःखलतामेनां खलतां लोकतापिनीम् ॥ ९७ सोपप्रदानं सामादौ प्रयुक्तमपि बाध्यते । पराभ्यां भेददण्डाभ्यां न्याय्ये विप्रतिषेधिनि ॥ ९८ यथाविषयमेवैषामुपायानां नियोजनम् । सिद्ध्यङगं तद्विपर्यासः फलिष्यति पराभवम् ॥ ९९ नैकान्तशमनं साम समाम्नातं सहोष्मणि । स्निग्धेऽपि हि जने तप्ते सर्पिषीवाम्बुसेचनम् ॥ १००
दुष्ट मनुष्य इतराच्या दोषांचे वर्णन करतो आणि स्वतःच्या गुणाचे स्वतःच वर्णन करतो. तो स्वतःच्या दोषाना झाकतो व इतराच्या गुणानाही झाकतो ॥ ९५ ॥
जी लोकाना होणारा सन्ताप दूर करीत नाही व जी सुमनानी-फुलानी रहित आहेपक्षी-चांगल्या मनुष्यानी त्यागली आहे, जी फलानी रहित आहे अशा आकाशातील वेलीप्रमाणे असलेल्या दुष्टतेचा अज्ञ लोक आश्रय करतात. भावार्थ- आकाशवेलीपासून कोणाचा सन्ताप दूर होत नाही. तसे दुष्टपणामुळे कोणाचा सन्ताप दूर होत नाही. जसे आकाशवेल पुष्पानी रहित असते तशी दुष्टताही सुमनानी विद्वान्-सज्जनानी रहित असते. जशी आकाशवेल फलरहित असते तशी ही दुष्टता फलरहित असते अर्थात् हिच्यापासून कोणाचाही फायदा होत नाही. अशा दुष्टतेचा मूर्ख लोकच फक्त आश्रय करतात ।। ९६ ॥
ही दुष्टता केव्हाही सज्जनाना मान्य नसते आणि ही दुष्टता विरस-नीरस किंवा दुष्टपणा-द्वेषादि फलानी सर्व बाजूनी भरलेली असते. म्हणून ही खलता दुष्टता-दुःखलताच होय. या दुःखलतेपासून लोकाना अत्यन्त सन्ताप उत्पन्न होतो ।। ९७ ।।
न्यायाला अनुसरून विरोध करणाऱ्या पुरुषाविषयी प्रथमतः काही त्याला देण्याच्या विधानात सामोपायाचा प्रयोग केला असेल तर व नंतर भेद आणि दंडाचा उपाय अंमलात आणला तर पहिला उपाय जो साम तो बाधित होतो तो मोडला जातो. याचे तात्पर्य असे- न्यायवान् शत्रूला प्रथमतः काही देण्याचे कबूल करून सामनीतीचा प्रयोग-शान्ततेचा उपाय केला आणि नंतर त्याला भेदाची किंवा दंडाची धमकी दाखविली तर पहिला उपयोगात आणलेला सामोपाय व्यर्थ होतो. न्यायवान् विरोधी त्याच्या कूटनीतीला तत्काल समजून घेतो ।। ९८ ।।
साम, दाम, दंड आणि भेद या उपायांचा विषयाला अनुसरून उपयोग केला पाहिजे म्हणजे हे उपाय आपल्या कार्यसिद्धीला कारण होतात व त्यांचा विपर्यास केला, विपरीत उपयोग केला तर त्यापासून जयलाभ होत नाही, पराभव मात्र पदरी पडतो. जो उपाय ज्याच्यासाठी योग्य आहे त्याचाच प्रयोग केला तर त्यापासून कार्यलाभ होतो, कार्य सफल होते. विरुद्ध प्रयोग केल्याने कार्यहानि होऊन दुःख भोगावे लागते ॥ ९९ ॥
प्रतापशाली शत्रूविषयी साम-सलोख्याचा उपाय सर्वथा उपयोगी पडेल असे नाही. कारण प्रेमळ असाही मनुष्य रागावला तर त्याच्यावर सामोपाय करणे हे तापलेल्या तुपात पाणी सिंचन करण्याप्रमाणे आहे ।। १०० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org