________________
॥श्रीवीतरागाय नमः ॥
श्रीजिनसेनाचार्यविरचित
श्रीमहापुराण
उत्तरार्ध
पंचविसावें पर्व
गते भरतराजर्षी दिव्यभाषोपसंहृतौ । निवातस्तिमितं वाधिमिवानाविष्कृतध्वनिम् ॥ १ धर्माम्बुवर्षसंसिक्तजगज्जनवनवुमम् । प्रावृधनमिवोद्वान्तवृष्टिमुत्सृष्टनिःस्वनम् ॥ २ कल्पद्रुममिवाभीष्टफलविश्राणनोद्यतम् । स्वपादाभ्यर्णविधान्तत्रिजगज्जनमूजितम् ॥ ३ . विवस्वन्तमिवोबूतमोहान्धतमसोवयम् । नवकेवललब्धीद्धकरोत्करविराजितम् ॥४ महाकरमिवोद्भूतगणरत्नोच्चयाचितम् । भगवन्तं जगत्कान्तमचिन्त्यानन्तवैभवम् ॥ ५ वृतं श्रमणसङघेन चतुर्षा भेवमीयुषा । चतुर्विधवनाभोगपरिष्कृतमिवाद्रिपम् ॥ ६ प्रातिहार्याष्टकोपेतमिद्धकल्याणपञ्चकम् । चतुस्त्रिशदतीशेषैरिद्धि त्रिजगत्प्रभुम् ॥ ७ प्रपश्यन्विकसनेत्रसहनः प्रीतमानसः । सौधर्मेन्द्रः स्तुति कर्तुमचारेभे समाहितः॥८
वायु बंद झाला म्हणजे समुद्राची गर्जना बंद होऊन तो जसा शांत होतो तसे राजर्षि भरत प्रभूच्या सभेतून आपल्या घरी गेल्यावर प्रभूचा दिव्यध्वनि बंद झाला ॥ १॥
___ जसे पावसाळ्यातील मेघ वृष्टि करून शब्दरहित होतात तसे आदिभगवंतरूपी मेघाने धर्मजलाने जगातील भव्यजनरूपी वनवृक्षांना स्नान घालून मौन धारण केले ॥ २॥
आदिभगवान् कल्पवृक्षाप्रमाणे भक्तांना इच्छित फल देण्यास उद्युक्त असतात. आपल्या चरणाजवळ येऊन ज्यांनी विश्रान्ति घेतली आहे अशा त्रिलोकातील जनांना ते उन्नत अवस्थेप्रत नेतात. सूर्य जसा अंधकाराची उदयावस्था नाहीशी करतो तसे भगवंतांनी मोहरूपी अंधाराची उत्पत्ति नष्ट केली होती. नऊ प्रकारच्या लब्धिरूपी किरणसमूहानी ते शोभत होते. (परमावगाढसम्यक्त्व, यथाख्यातचारित्र, अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, क्षायिकदान, लाभ, म. १
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org