SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 243
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २३२) महापुराण (३३-४२ हरीनखरनिभिन्नमदद्विरदमस्तकान् । निर्झरैः पापभीत्येव तर्जयत्येव सारवः ॥ ४२ धत्ते सानुचरान्भद्रानुच्चवंशान्स्ववग्रहान् । वनद्विपानयं शैलो भवानिव महीभुजः ॥ ४३ ध्वनतो घनसङ्घाताशरभारभसादमी । द्विरवाशङ्कयोपेत्य पतन्तो यान्ति शोच्यताम् ॥ ४४ कपोलकाषसंरुग्णत्वचो मदजलाविलाः । द्विपानां वनसम्भोगं सूचयन्तीह शाखिनः ॥ ४५ शाखामृगा मृगेन्द्राणां गजितैरिह तजिताः । पुजीभूता निकुञ्जषु पश्य तिष्ठन्ति साध्वसान् ॥४६ मुनीन्द्रपाठनि?षेरितो रम्यमिदं वनम् । तृणानकवलमासिकुरङ्गकुलसङकुलम् ॥ ४७ इतश्च हरिणारातिकठोरारवभीषणम् । विमुक्तकवलच्छेदप्रपलायितकुञ्जरम् ॥ ४८ जरज्जरन्तशृङगाग्रक्षतवल्मीकरोधसः । इतो रम्या वनोद्देशा वराहोत्खातपल्वलाः ॥ ४९ आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी उन्मत्त हत्तींची मस्तके ज्यानी भिन्न केली आहेत अशा सिंहांना हा पर्वत शब्द करणाऱ्या झ-याच्याद्वारे जणु पापभयाने त्याना दरडावित आहे असा भासत आहे ।। ४२ ।। हे राजन् भरतेशा, जसे आपण सानुचर- आपल्या सेवकानी सहित, भद्र-चांगल्या विचारांचे, उच्चकुलीन व सुंदर मजबुत शरीराचे अशा अनेक राजाना धारण करिता, त्याना आपल्या अधीन ठेवता तसे हा पर्वत आपल्या शिखरावर फिरणा-या, भद्र जातीचे व ज्यांचा पाठीचा कणा उंच आहे व ज्यांचे शरीर पुष्ट व सुंदर आहे अशा वनगजांना आपल्याप्रमाणे धारण करीत आहे ।। ४३ ।। मेघांचे समुदाय गर्जना करीत असताना शरभ प्राणी मोठया वेगाने हत्तींच्या शंकेने त्यावर धावून जाऊन खाली पडतात आणि शोचनीय अवस्थेला प्राप्त होत आहेत हे आपण पाहा ॥ ४४ ॥ आपले गण्डस्थल घासल्यामुळे ज्यांच्या साली घासल्या आहेत असे हे वृक्ष त्या हत्तींच्या मदजलाने भिजले आहेत व हे वृक्ष या हत्तींनी या वनाचा उपभोग घेतला आहे असे या स्थली सूचित करीत आहेत ॥ ४५ ॥ हे माकडांचे समूह येथे सिंहाच्या गर्जनानी भेडसावलेले होऊन लतादिकांच्या जाळयात भीतीने घाबरून बसले आहेत तिकडे हे प्रभो आपण पाहा ।। ४६ ।। मुनीश्वरांच्या स्तोत्रपाठाच्या ध्वनीनी इकडे हे वन सुंदर दिसत आहे व गवताच्या अग्रांचे भक्षण करणाऱ्या हरिणाच्या समूहानी हे वन गजबजले आहे ॥ ४७ ।। इकडे सिंहाच्या अतिशय कठोर गर्जनानी हे वन भयंकर वाटत आहे व इकडे तोंडातला घास टाकून हत्तीचा समूह पळत आहे हे आपण पाहा ॥ ४८ ॥ इकडे म्हाताऱ्या रेड्यानी आपल्या शिंगांच्या अग्रभागानी वारुळाचे तट फोडले आहेत ते पाहा व इकडे वराहानी-डुकरानी लहान लहान तलाव आपल्या दाढानी खोदले आहेत अशी ही सुंदर वने दिसतात ।। ४९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy