________________
३३-३५)
महापुराण
(२३१
क्वचिद्गजमदामोववासितान्गण्डशैलकान् । ददृशे हरिरारोषादुल्लिखन्नखराङकुरैः॥ ३५ किञ्चिदन्तरमारुह्य पश्यन्नद्रेः परां श्रियम् । प्राप्तावसरमित्यूचे वचनं च पुरोधसा ॥ ३६ पश्य देव गिरेरस्य प्रदेशान्बहुविस्मयान् । रमन्ते त्रिदशा यत्र स्वर्गावासेप्यनादराः ॥ ३७ पर्याप्तमेतदेवास्य प्राभवं भुवनातिगम् । देवो यदेनमध्यास्ते चराचरगुरुः पुरुः ॥ ३८ महाद्रिरयमुत्सङ्गासङगिनीः सरिदङ्गनाः । शश्वद्विभत्ति कामीव गलन्नीलजलांशुकाः ॥ ३९ क्रीडाहेतोरहिंस्रोऽपि मृगेन्द्रो गिरिकन्दरात् । महाहिमयमाकर्षन्दान्मुञ्चत्यपारयन् ॥ ४० सर्वद्वन्द्वसहान्सा,जनतातापहारिणः । मनोनिव वनाभोगानेव धत्तेऽधिमेखलम् ॥ ४१
त्या पर्वतावर काही ठिकाणी हत्तींच्या मदांच्या गंधाने सवासित झालेले मोठे पाषाण होते त्याना हत्ती समजून अतिशय रोषाने सिंह आपल्या तीक्ष्ण नखांच्या अंकुरानी ओरबडत आहे असे भरताने पाहिले ॥ ३५ ॥
पर्वताच्या काही अन्तरावर चढून पर्वताच्या उत्कृष्ट शोभेला-लक्ष्मीला भरतेश पाहत असता बोलण्यास योग्य संधि आली आहे असे पाहून पुरोहिताने याप्रमाणे भाषण केले ॥ ३६॥
हे देवा भरतप्रभो, या पर्वताच्या विपुल आश्चर्यकारक प्रदेशाना आपण पाहा. स्वर्गाच्या निवासस्थानी ही ज्याना राहणे आदराचे वाटत नाही असे देव येथे येऊन रमतात क्रीडा करतात ॥ ३७ ।।
या पर्वताचे प्रभुत्व जगाला उल्लंघणारे आहे एवढे सांगणे पुरेसे आहे. कारण चराचरांचे गुरु असे भगवान् पुरु-वृषभदेव या पर्वतावर निवास करीत आहेत ॥ ३८ ॥
हा महापर्वत आपल्या ओटीमध्ये कामी मनुष्य जसे ज्यांचे निळे वस्त्र गळत आहे. अशा स्त्रियाना धारण करितो तसे ज्यांचे नीलजलरूपी वस्त्र गळत आहे अशा नद्यारूपी स्त्रियाना नेहमी धारण करीत आहे ॥ ३९ ॥
___ हा सिंह जरी अहिंस्र-हिंसात्यागी आहे तरी क्रीडा करण्यासाठी या पर्वताच्या गुहेतून या महासर्पाला बाहेर ओढीत आहे. पण तो सर्प फारच लांबलचक असल्यामुळे सगळा बाहेर ओढून काढण्यास असमर्थ झाल्यामुळे त्याला सोडून देत आहे ।। ४० ॥
__ मुनि जसे सर्व द्वन्द्व-उन्ह, पाऊस, थंडी वगैरे बाधा सहन करितात तसे येथील वनप्रदेश उन्ह, पाऊस थंडी, वगैरे सहन करितात व सर्व पशुपक्ष्यांची जोडपी धारण करितात, मुनि जसे सर्वाचे हित करतात तसे हे वनप्रदेशही सर्वाचे कल्याण करितात. मुनि जसे लोकांच्या संतापाचामानसिक रागद्वेषापासून होणाऱ्या व्यथांचा ताप नाहीसा करतात तसे हे वनप्रदेश संताप-सूर्याच्या उन्हापासून होणाऱ्या गरमीची व्यथा-पीडा दूर करतात अशा वनप्रदेशाना हा पर्वत आपल्या तटावर धारण करीत आहे ।। ४१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org