SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 275
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २६४) महापुराण (३४-८९ इति निर्धार्य कार्यज्ञान कार्ययुक्तौ विविक्तधीः । प्राहिणोत्स निसृष्टार्थान्दूताननुजसन्निधिम् ॥ ८९ गत्वा च ते यथोद्देशं दृष्ट्वा तांस्तान्यथोचितम् । जगुः सन्देशमीशस्य तेभ्यो दूता यथास्थितम् ॥९० मथ ते सह सम्भूय कृतकार्यनिवेदनात् । दूतानित्यूचुरारूढ़प्रभुत्वमदकर्कशाः ॥ ९१ यदुक्तमादिराजेन तत्सत्यं नोऽभिसंमतम् । गुरोरसन्निधौ पूज्यो ज्यायान्भ्रातानुजैरिति ॥ ९२ प्रत्यक्षो पुरुरस्माकं प्रतपत्येष विश्वदृक् । स नः प्रमाणमैश्वयं तद्वितीर्णमिदं हि नः ॥ ९३ तदत्र गुरुपादाज्ञातन्त्रा न स्वैरिणो वयम् । न देयं भरतेशेन नादेयमिह किञ्चन ॥ ९४ यत्तु नः संविभागार्थ इदमामन्त्रणं कृतम् । चक्रिणा तेन सुप्रीताः प्रीणाश्च वयमागलात् ॥ ९५ इति सत्कृत्य तान्दूतान्सन्मानः प्रभवत्प्रभौ । विहितोपायनाः सद्यः प्रतिलेखैर्व्यसर्जयन् ॥ ९६ याप्रमाणे निश्चय करून कार्य करण्यात ज्यांची बुद्धि केव्हाही गोंधळत नाही अशा चक्रवर्तीने कार्य जाणणारे व वारंवार सोपवलेली कामगिरी उत्तम रीतीने पार पाडणारे अशा दूताना आपल्या धाकट्या भावाकडे पाठविले ॥ ८९ ।। ज्या उद्देशाने त्याना पाठविले होते तो उद्देश चांगला ध्यानात ठेवून ते दूत गेले व त्यानी चक्रवर्तीच्या भावाना. त्याचा मानमरातब ठेवून प्रभूचा-चक्रवर्तीचा जो संदेश जसा होता तसा त्यानी त्याना सांगितला ।। ९० ॥ त्या दूतानी आपल्या कार्याचे निवेदन केल्यानंतर ते चक्रवर्तीचे बंध एकत्र जमले. प्रभुत्वाचा मद आरूढ झाल्यामुळे ज्यांचे स्वभाव कठोर बनले आहेत असे भरताचे बंधु त्या दूताना याप्रमाणे बोलले ।। ९१ ॥ ते त्या दूताना असे बोलले " पित्याचे जेव्हा सान्निध्य नसते अशावेळी वडील भावाचा आदर धाकटया भावानी ठेवला पाहिजे असे जे आदिराजा भरताने आमच्या वडील भावाने म्हटले आहे ते सत्य आहे व आम्हाला मान्य आहे ।। ९२ ।। पण आमचे पिताजी आदिभगवंत त्रैलोक्याला पाहणारे व सूर्यासारखे या भूतलावर प्रत्यक्ष तळपत आहेत व तेच आम्हाला प्रमाण व त्यानीच आम्हाला हे ऐश्वर्य दिले आहे ॥ ९३।। आम्ही आमच्या पितचरणाची आज्ञा मान्य करून त्याप्रमाणे वागत आहोत. म्हणून आम्ही स्वच्छंदी स्वैराचारी नाहीतच. आम्हाला भरतेशाने काही दिले नाही व आमच्याकडून त्याने घेणेही योग्य नाही. अर्थात् आम्ही भरतेशाचे काही देणे घेणे लागत नाही ।। ९४ ।। आम्हाला राज्यादिकाची वाटणी देण्याकरिता चक्रवर्तीने बोलाविले आहे. त्यामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत व गळ्यापर्यन्त तृप्त झालो आहोत ।। ९५ ॥ यानंतर त्यानी राजाप्रमाणे दूताचा सन्मानानी सत्कार केला व प्रभुभरतासाठी त्यानी नजराणे पाठविले व पत्राची उत्तरे लिहून त्यासह त्यानी दूताना भरताकडे पाठविले ।। ९६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy