SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 122
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-२२) महापुराण (१११ सचामरा चलखंसां सबलाकां पताकिनी । अन्वियाय चमूर्गङ्गां सतुरङ्गा तरङगिणीम् ॥ १७ राजहंसैःकृताध्यासा क्वचिदप्यस्खलद्गतिः । चमूरब्धि प्रति प्रायात्सा द्वितीयेव जाह्नवी ॥ १८ विपरीतामतवृत्तिनिम्नगामुन्नतस्थितिः । त्रिमार्गगां व्यजेष्टासौ पृतना बहुमार्गगा ॥ १९ अनुगङ्गातट यान्ती ध्वजिनी सा ध्वजांशुकैः । वनरेणुभिराकोणं सम्ममार्जेव खाडगणम् ॥ २० दुर्विगाहा महाग्राहाः सैन्यान्युत्तेरुरुत्तरे । गङगानुगा धुनीबह्वीबहुराजकुलस्थितीः ॥ २१ मार्गे बहुस्थितान्देशान्सरितः पर्वतानपि । धनवान्बहुदुर्गाणि खनीरप्यत्यगात्प्रभुः ॥ २२ जिच्यात हंस विहार करीत आहेत, जिच्यांत बगळे फिरत आहेत व जिच्यात तरङ्ग उठत आहेत अशा गंगानदीला, चामरानी युक्त, पताकांनी सहित, पुष्कळ घोड्यांनी युक्त, अशी भरतसेना अनुसरली. अर्थात् गंगानदीला अनुसरून भरतसेना जाऊ लागली. चामरांचे सादृश्य हंसपक्ष्याशी, पताकांचे बगळयाबरोबर, घोड्यांची समानता तरंगाशी दाखवून आचार्यानी सेना गंगानदीला अनुसरली असे म्हटले आहे ।। १७ ।। जिच्यात श्रेष्ठ राजे आहेत, जिची गति अस्खलित आहे व जी जणु गंगेप्रमाणे वाटते अशी भरतसेना, जणु दुसरी जाह्नवी-गंगानदी आहे अशी दिसली व ती समुद्रापर्यन्त गेली ॥१८॥ भरताच्या सेनेने गंगानदीला जिंकले. गंगानदी-विपरीता-राजहंस, बगळे आदिक पक्ष्यानी युक्त होती पण सेना अतवृत्ति-तिच्यापेक्षा वेगळ्या स्वभावाची आहे, गंगानदी निम्नगा-सखल प्रदेशात वाहणारी पण सेना उन्नतस्थिति-उच्च अवस्थेला धारण करणारी, गंगानदी त्रिमार्गगा तीन मार्गानी समुद्राकडे जाणारी व भरतसेना बहुमार्गगा-अनेक मार्गानी प्रयाण करणारी होती म्हणून तिने गंगानदीला जिंकले आहे ।। १९ ।। गंगेच्या किनाऱ्याला अनुसरून जात असलेल्या भरतसेनेने आपल्या ध्वजांच्या वस्त्रांनी वनातील धूळीनी व्याप्त झालेले आकाश जणु पुसून स्वच्छ केले असे दिसू लागले ॥२०॥ महाराज भरताच्या सैन्यानी उत्तरेकडे वाहणाऱ्या व उत्तरेकडून येणाऱ्या ज्या अनेक नद्या व सैन्याना पार केले होते. त्या अन्योन्याशी अनुरूप होत्या. अर्थात् नद्या सैन्यासारख्या होत्या व सैन्ये नद्याप्रमाणे होती. नद्या दुर्विगाहा- मोठ्या कठिनतेने प्रवेश करण्यायोग्य असतात व सैन्ये देखिल कठिणपणाने ज्यांच्यात प्रवेश करता येईल अशी असतात. नद्या महाग्राहा-मोठमोठ्या मगर-सुसरी आदि प्राण्यानी युक्त असतात. अशी सैन्येही महाग्राहा-मोठ्या आग्रहाने युक्त असतात. जशा नद्या 'बहुराजकुलस्थिती:' अनेक राजांच्या पृथ्वी-भूमीत त्या वाहात जातात व सैन्ये देखिल अनेक राजांच्या कुलाला स्थिर करणारी असतात. अशा गंगेला अनुसरणा-या अनेक नद्यातून भरतराजांची सैन्ये उतरून पुढे गेली ॥ २१ ॥ प्रयाण करीत असतां मार्गात पुष्कळसे देश, नद्या व पर्वताना, पुष्कळ वनाना आणि अनेक खाणीना उल्लंघून लक्ष्मीवान् भरताने पुढे प्रयाण केले ।। २२ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy