________________
१०८)
महापुराण :
(२७-१५१
राज्ञामावसथेषु शान्तजनताक्षोभेषु पीताम्भसा-। मश्वानां पटमण्डपेषु निवहे स्वरं तृणग्रासिनि ॥ गङ्गातीरसरोवगाहिनि वनेष्वालानिते हास्तिके । जिष्णोस्तत्कटकं चिरादिव कृतावासं तदा लक्ष्यते ॥ १५१ तत्रासीनमुपायनैः कुलधनैः कन्याप्रदानादिभिः । प्राच्या मण्डलभूभुजः समुचितैराराधयन्साधनैः॥ संरुद्धाः प्रविहाय मानमपरे प्राणंसिषुश्चक्रिणम् । दूरादानतमौलयो जिनमिव प्राज्योदयं नाकिनः ॥ १५२
उत्पन्न झालेल्या वायूने स्वच्छ केली होती. अर्थात् हवेतील उष्णता नष्ट करणान्या जलबिंदूना चोहीकडे पसरणान्या वायूकडून ती वेदिका स्वच्छ केली होती. पूर्वदिशेला जिंकणाऱ्या लक्ष्मीसंपन्न, निधिस्वामी भरताने त्या वाड्यात सुखाने निवास केला ।। १५० ।।
सर्व राजेलोकांच्या निवासस्थानात लोकांची गडबड जेव्हा शान्त झाली, घोडे आपल्या पटमंडपात- तबेल्यात स्वेच्छेने पाणी पिऊन गवत खात असता, गंगेच्या तीरावरील सरोवरात अवगाहन केल्यावर हत्तींना खांबाला बांधले असता या जयशील भरतराजाचे सर्व सैन्य आपआपल्या स्थानी दीर्घकालापासून राहिले आहे असे वाटू लागले ॥ १५१ ॥
ज्याचा उदय-महिमा अत्यन्त श्रेष्ट आहे अशा जिनेश्वराला देव दूरूनच मस्तक नम्र करून जसे नमस्कार करतात. तसे श्रेष्ठवैभवधारक असलेले व मण्डपात बसलेल्या भरतेश्वरास पूर्वदिशेच्या सर्व राजानी आपल्या कुलपरम्परेने चालत आलेले धन व अनेक नजराणे भेट म्हणून दिले व आपल्या कन्या भेट म्हणून अर्पण केल्या व आणखी अनेक योग्य वस्तु देऊन त्याची आराधना केली व सेनेने ज्याना घेरले आहे अशा अनेक राजानी मान सोडून या चक्रवर्तीला नमस्कार केला ।। १५२ ॥
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङग्रहे भरतराजविजयप्रयाणवर्णनं नाम सप्तविंशतितमं पर्व ॥ २७॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यानी रचलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात भरतराजाने राजाना जिंकण्यासाठी प्रयाण केले याचे वर्णन करणारे सत्ताविसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org