SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 691
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६८०) महापुराण (४७-१६४ तत्र तं सुचिरं स्तुत्वा मनोवाक्कायशुद्धिभाक् । मातरं भ्रातरं चोचितोपचारो विलोक्य तौ ॥ १६४ तदाशीर्वादसन्तुष्टः संविष्टो मातृसन्निधौ । सुखावतीप्रभावेण युष्मदन्तिकमाप्तवान् ॥ १६५ क्षेमेणेति तयोरने प्राशंसत्तां नृपात्मजः । सतां स सहजो भावोयत्स्तुवन्त्युपकारिणः ॥ १६६ वसुपालमहीपालप्रश्नाद्भगवतोदितैः । स्थित्वा विद्याधरश्रेण्यां बहुलम्भात्समापिवान् ॥ १६७ ततः सप्त दिनैरेव सुखेन प्राविशत्पुरम् । सञ्चितोजित पुण्यानां भवेदापच्च सम्पदे ।। १६८ वसुपाल कुमारस्य वारिषेणादिभिः समम् । कन्याभिरभवत्कल्याणविधिविविधद्धिकः ॥ १६९ स श्रीपाल कुमारश्च जयवत्यादिभिः कृती । तदा चतुरशीतोष्टकन्यकाभिरलङ्कृतः ।। १७० सूर्याचन्द्रमसौ वा तौ स्वप्रभाव्याप्त दिक्तटौ । पालयन्तौ धराचक्रं चिरं निविशतः स्म शम् ॥ जयावत्यां समुत्पन्नो गुणपालो गुणोज्ज्वलः । श्रीपालस्यायुधागारे चक्रं च समजायत ॥ १७२ तेथे गुणपाल जिनेश्वराची बरेच कालपर्यन्त त्याने स्तुति केली. मन, वचन व शरीराच्या शुद्धीला धारण करून हे प्रभूचे स्तवन त्याने केले. आपल्या मातेला व भावाला पाहून त्यांचा त्याने योग्य आदर केला. त्यांच्या आशीर्वादाने संतुष्ट होऊन तो मातेजवळ बसला आणि सुखावतीच्या प्रभावाने मी आपणाकडे क्षेमाने आलो असे त्याने त्याना सांगितले. बरोबरच आहे की, उपकार करणाऱ्याची सज्जन स्तुति करतात तो त्यांचा जन्मजात गुण आहे ।। १६४-१६६ ॥ वसुपाल महाराजाच्या प्रश्नाचे उत्तरात जे काही भगवंतानी सांगितले होते त्याला अनुसरून त्या श्रीपालाने विद्याधराच्या श्रेणीत राहून पुष्कळ लाभ प्राप्त करून घेतले व सात दिवसानीच सुखाने त्याने आपल्या नगरीत प्रवेश केला. ज्यानी पूर्वजन्मी फार मोठे पुण्य संचित केले आहे त्याना आपत्ति संपत्तिरूपाच्या होतात. अर्थात् या सर्व आपत्ती संपत्तीरूपच बनल्या ।। १६७ - १६८ ।। वसुपाल कुमाराचा वारिषेणा वगैरे अनेक राजकन्याबरोबर मोठ्या व अनेक प्रकारच्या वैभवाने युक्त असा विवाह झाला ।। १६९ ।। तो श्रीपालकुमार देखिल जयावती आदिक चौ-याऐंशी आवडत्या कन्याबरोबर विवाहित झाला व त्यामुळे तो शोभू लागला ।। १७० ।। सूर्य व चन्द्र जसे आपल्या कान्तीनी सर्व दिशांच्या तटाना व्यापून टाकतात, तसे आपल्या कान्तीने ज्यानी सर्व दिशाना व्यापून टाकिले आहे अशा त्या दोन राजानी दीर्घकालपर्यन्त पृथ्वीचे रक्षण केले व त्यानी सुखांचा अनुभव घेतला ।। १७१ ।। श्रीपाल राजापासून जयावती राणीला गुणानी उज्ज्वल असा गुणपालनामक पुत्र झाला व श्रीपालाच्या आयुधशाळेत चक्ररत्न उत्पन्न झाले || १७२ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy