________________
२५-६७)
महापुराण
नखांशवस्तवाताम्राः प्रसरन्ति दिशास्वमी । त्वदघ्रिकल्पवृक्षापात्प्ररोहा इव निःसृताः ॥६१ शिरःसु नःस्पृशन्त्येते प्रसादस्येव तेंऽशकाः । त्वत्पादनखशीतांशुकराः प्रह्लादिताखिलाः ॥ ६२ त्वत्पादाम्बुरुहच्छायासरसोमवगाहते । दिव्यश्रीकलहंसीयं नखरोचिर्मणालिकाम् ॥ ६३ मोहारिमर्दनालग्नशोणिताच्छटामिव । तलच्छायामिदं धत्ते त्वत्पादाम्बुरुहद्वयम् ॥ ६४ त्वत्पादनखभानीरसरसि प्रतिविम्बिताः। सुराङगनाननच्छयास्तन्वते पङकजश्रियम् ॥ ६५ स्वयम्भुवे नमस्तुभ्यमुत्पाद्यात्मानमात्मनि । स्वात्मनैव तथोद्भूतवृत्तयेऽचिन्त्यवृत्तये ॥ ६६ नमस्ते जगतां पत्ये लक्ष्मीभत्रे नमोऽस्तु ते । विदांवर नमस्तुभ्यं नमस्ते वदतां वर ॥ ६७
हे जिनप्रभो, आपल्या नखांचे तांबूस असे हे किरण या सर्व दिशात पसरत आहेत व ते आपल्या पायरूपी कल्पवृक्षाच्या अग्रापासून बाहेर पडलेले जणु अंकुर सर्वत्र पसरत आहेत असे वाटते ॥ ६१ ।।
हे भगवंता, ज्यांनी सर्वाना आनंदित केले आहे अशी आपल्या पायांची नखे हेच कोणी चन्द्राचे किरण ते जणु आपल्या प्रसन्नतेचे-प्रसादाचे जणु काही अंशच-अंकुरच आहेत असे वाटते, ते आमच्या मस्तकाला स्पर्श करीत आहेत ।। ६२ ।।
हे भगवंता, ही दिव्य लक्ष्मीरूपी मनोहर हंसी नखांच्या कान्तिरूपी कमलाचे जे दांडे त्यांनी शोभणारी जी आपल्या चरणकमलाची छायारूपी सरसी (सरोवर) त्यात अवगाहन-प्रवेश करीत आहे ॥ ६३ ॥
हे जिननाथा, आपली दोन चरणकमले ज्या तळव्याच्या कान्तीला धारण करीत आहेत ती कान्ति जणु मोह-शत्रूचे मर्दन करीत असता चिकटलेल्या रक्ताच्या ओलसर छटांना जणु धारण करीत आहे असे वाटते ।। ६४ ॥
आपल्या पायांच्या नखांची जी कान्ति हीच जणु सरोवर आहे व त्यात प्रतिबिम्बित झालेल्या ज्या देवांगनांच्या मुखांच्या छाया या जणु कमलांची शोभा तिला चोहीकडे पसरित आहेत ।। ६५ ॥
हे प्रभो, आपण आपल्या आत्म्यात आपल्याद्वारेच आपणास उत्पन्न केले आहे व अशा रीतीने आपण स्वयंभू झालेले आहात. म्हणून तसे बनलेल्या आपणास अर्थात् स्वयंभूस आमचा नमस्कार असो. आपण स्वयंभू कसे बनला याचे वर्णन आमच्या चिन्तनाच्या बाहेर आहे म्हणून आपणास आमचा नमस्कार असो ॥ ६६ ।। ।
जगाचा पति असलेल्या आपणास आमचा नमस्कार असो. आपण अन्तरंग अनन्त चतुष्टयरूपी लक्ष्मीचे पति आहात म्हणून आपणास नमस्कार असो. हे विद्वच्छष्ठा, आपणास आमचे वन्दन असो व आपण श्रेष्ठ वक्ते आहात म्हणून आपणास नमस्कार असो ॥ ६७ ॥ म.२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org